भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड

भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील विद्युत उपकरणे उत्पादन करणारी कंपनी.
(भेल या पानावरून पुनर्निर्देशित)

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (बी.एस.ई.500103, एन.एस.ई.BHEL; संक्षेप: बी.एच.इ.एल.) ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली बी.एच.इ.एल. वीजनिर्मिती केंद्रासाठी आवश्यक असलेल्या सर्व सामग्रीचे उत्पादन करते. अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये देखील बी.एच.इ.एल.ने मुसंडी मारली असून भारतामध्ये व जगभर अनेक नवे प्रकल्प उभारण्यात बी.एच.इ.एल. सहाय्य करते. १९६४ साली स्थापन झालेली बी.एच.इ.एल. १९७१ सालापासून सतत नफा कमवत आहे.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड
प्रकार सरकारी कंपनी
संक्षेप बी.एस.ई.500103
एन.एस.ई.BHEL
बी.एस.ई. सेन्सेक्स सदस्य
एस.&पी. सी.एन.एक्स. निफ्टी सदस्य
उद्योग क्षेत्र विद्युत साधने
स्थापना इ.स. १९६४
मुख्यालय भारत नवी दिल्ली, भारत
महत्त्वाच्या व्यक्ती बी.पी. राव
महसूली उत्पन्न भारतीय रूपया ५०,१५६ कोटी
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
भारतीय रूपया ६,६१५ कोटी
कर्मचारी ४८,३९९ (मार्च् २०१३)
संकेतस्थळ www.bhel.com

विद्युतनिर्मितीसाठी लागणारे सर्व प्रकारचे टर्बाईन, बॉयलर, स्वीचगियर इत्यादी बी.एच.इ.एल.ची प्रमुख उत्पादने आहेत. त्याच बरोबर बी.एच.इ.एल. भारतीय रेल्वेसाठी विद्युत इंजिने देखील बनवते.

प्रमुख उत्पादन केंद्रे

संपादन

भारतामधील खालील शहरांमध्ये बी.एच.इ.एल.चे प्रमुख कारखाने आहेत.

बाह्य दुवे

संपादन