भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य

(भीमाशंकर अभयारण्य या पानावरून पुनर्निर्देशित)

सहल भीमाशंकर अभयारण्याची भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्यातील खेड तालुक्यात अभयारण्य आहे. महाराष्ट्राच्या मानचिन्हांपैकी एक असलेल्या शेकरू या सस्तन प्राण्याचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते.इथल्या सड्यांवर गवळी धनगर समाज तर डोंगर उतारांवर आदिवासी महादेव कोळी समाज राहतो.

भीमाशंकरचे पठार
भीमाशंकर पदभ्रमण

:अथर्व पारंबे

भौगोलिक तपशील संपादन

महाराष्ट्राच्या वन्यजीव विभागात सहय़ाद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पश्चिम घाटातील परिसरात भीमाशंकर अभयारण्याचा समावेश करण्यात आला आहे. या अभयारण्याचे संपूर्ण क्षेत्र १३ हजार ७८ हेक्टर इतके आहे. येथे वन्यजीव विभागाची स्थापना १९८५ मध्ये करण्यात आली व हे अभयारण्य संरक्षित करण्यात आले. भीमाशंकरचे अभयारण्य सुमारे तीन हजार फूट उंच कडय़ांनी दोन भागांत विभागले गेले आहे. भीमाशंकर अभयारण्य क्रमांक एकमध्ये श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आणि परिसरातील जंगलाचा भाग समाविष्ट होतो, तर भीमाशंकर अभयारण्य क्रमांक दोनमध्ये ठाणे, रायगड, जिल्हय़ातील जंगलाचा समावेश आहे.धसई, नारोली, म्हसा ही या जंगल परिसरातील प्रमुख गावे आहेत. हा परिसर गिरिभ्रमण आणि पदभ्रमण यासाठीही प्रसिद्ध आहे. विशेषतः पावसाळ्यात या परिसरात पदभ्रमण करण्यासाठी लोक येत असतात.[१]

जैवविविधता संपादन

भीमाशंकर अभयारण्य हे ‘डेसिडियस फॉरेस्ट’ या वनाच्या प्रकारात गणले जाते. अभयारण्य परिसरात दरवर्षी सुमारे सात हजार मिलिमीटर पाऊस पडतो. येथील जंगलात आंबा, जांभूळ, उंबर, अंजन, शेंद्री, पिसा, ऐन, साग, मोह, बांबू, हिरडा, करवंदे आणि आईन अशा वैविध्यपूर्ण वनस्पती आणि अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत. तसेच बिबटय़ा, वाघ, सांबर, हरीण, कोल्हा, साळिंदर, भेकर, लांडगा, वानर, तरस, काळवीट, मोर असे अनेक प्रकारचे वन्यजीवदेखील भीमाशंकरच्या अभयारण्यात पाहायला मिळतात.

 
प्राचीन मंदिर

धार्मिक महत्त्व संपादन

भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावे भीमाशंकर-ज्योतिर्लिंग हे पुण्यापासून १२७ कि.मी. अंतरावर वसले असून ते भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याच्या परिक्षेत्रात येते.

मानवी आक्रमणे व पर्यावरणीय समस्या संपादन

भीमाशंकर अभयारण्याच्या दक्षिणेचा पट्टा इनरकॉन कंपनीच्या पवनचक्क्यांमुळे गाजतो आहे. १९९२ साली भारतीय वन्य जीव मंडळाने सर्व अभयारण्यांच्या दहा किलोमीटर परिघात ईकोसेन्सिटिव्ह झोन जाहीर करावेत असा ठराव केला होता. पण या दृष्टीने वनविभागाने काहीही कारवाई केलेली नाही. उलट २००९ मध्ये भीमाशंकरमध्ये पवन चक्क्यांना परवानगी दिली आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली गेली आहे.ह्या पवनचक्क्यांसाठी निष्काळजीपणे बांधलेल्या रस्त्यांनी दरडी कोसळताहेत, गाळाने ओढे, नदी-नाले-धरणे भरताहेत आणि सुपीक शेतीची नासाडी होते आहे.फॉरेस्ट रेंजरचा प्रामाणिक अहवाल डावलून,बनावट ठराव सादर करून खोटी माहिती नोंदवत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पवन चक्क्यांना दिलेल्या परवानगीबद्दल माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या पश्चिम घाट परिसर तज्ञ गटाच्या अहवालातही कडक ताशेरे ओढले आहेत.[२]

बाह्य दुवे संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ खान आश्विन (१९. ५. २०१८). "say Hello to Shekaru (इंगजी)". Archived from the original on 2018-05-22.
  2. ^ "चंगळवादाचा फटका निसर्गाला". दैनिक महाराष्ट्र टाइम्स. ८ जुलै, इ.स. २०१२. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)