महादेव कोळी
अखंड भारतवर्षात सर्वत्र अढळणारा टोळी पासून अपभ्रंश झालेला कोळी हा समुह आहे कोळी म्हणजे कुटूंब किंवा कुल यात आनेक जाती जमाती उपजमाती कुळे उपकुळे गट उपगट आहेत
भारताच्या वेगवेगळ्या राज्यात कोळी समुहाच्या जळपास 2000 हजार जाती जमाती आहेत ज्या त्या राज्यात वेगवेळ्या नावानी त्यांची ओळख आहे
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हात कोळी च्या जवळपास 220 जाती व पाच जमाती आहेत (1) कोळी ढोर (1) कोळी महादेव (3) कोळी डोंगर (4) कोळी मल्हार (5) कोळी टोकरे यांना भारतीय संविधाना प्रमाणे अनूसुचित जमातीचे आरक्षण आहे कोळी महादेव जमातीचे आनादी काला पासुनचे मुळ वसतिस्थान पुर्वीचे भाग्यनगर आजचे हैद्राबाद राज्यातील बालाघाट महादेव डोंगर आहे म्हणजे पुर्वी चे मिटपल्ली जिल्हा आजचा बिदर जिल्हा त्यातील महाराष्ट्रात समाविष्ट केलेली कांही जिल्हे आहेत महाराष्ट्रात कोळी समुहाचे शासनाने तिन वर्ग निर्माण कोलेले आहेत ST 1)कोळी ढोर २) कोळी महादेव ३) डोंगर कोळी ४) कोळी टोकरे ५) कोळी मल्हार SBC १) मच्छिमार कोळी, २) अहीर कोळी, ३) खानदेशी कोळी,४) पानकोळी, ५) ख्रिश्चन कोळी,६) चुंबळे कोळी,७) पानभरे कोळी,८) कोळी सुर्यवंशी,९) कोळी मांगेला, १०) सोनकोळी, ११) कोळी वैती, १२) खारवा किंवा खारवी कोळी, १३) कोळी माच्छी,मिटना,रान कोळी OBC कोळी इसाई कोळी चुंबळे कोळी गाबीत कोळी खारवी खारवा कोळी मांगेला कोळी मच्छीमार कोळी पानभरे कोळी सोनकोळी पानकोळी सुर्यवंशी कोळी वैती कोळी खानदेश कोळी OPN आग्री, अहीर, बंद, भिल्ल, भिलावे, भिरले, चंची, दोर अगर टोकरे, हेलमार, कब्बेर, कराडे, खार, कोकण, राज, अगर कुनुम, चुमली, पान अगर पानभरी, मराठा, माखी, मेंदाले, मेता अगर धनगर, मुसळे अगर बंधू, नेहरे, राहताडकर, शिंग तोकी, सोन,सोलेसी (काष्टी अगर लाल लंगोटी),तायडे, ठाणकर अगर ख्रिस्ती व वली कोळी महादेव जमातीचे परंपरागत (मूळ) वसतिस्थान
निजाम कालीन वऱ्हाड/बेरार प्रांतात म्हणजेच वर्तमान अमरावती महसूल विभागात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आदिवासी कोळी महादेव जमात ही जमात प्रामुख्याने आढळते. तसेच सह्रयाद्रीच्या पूर्व भागात मुळशी नदीपासून ते नाशिक जिल्हयातील त्र्यंबकेश्वरपर्यंत जवळपास १२० मैल प्रदेशामध्ये ही जमात वसलेली आहे, पुणे, अहमदनगर, खानदेश,सोलापूर या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. जमात उत्तर क्षेत्रात जव्हार भागातही ही जमात आढळते. कालंतराने ह्या जमातीने उदरनिर्वाहासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये स्थानांतर केले. जव्हार चे राजे हे कोळी महादेव जमाती असून ते सुद्धा निजामांच्या देशातून आल्याचा उल्लेख आहे. (संदर्भ –IMPERIAL GAZETTEER OF INDIA VOL-XV)
कालंतराने ह्या जमातीने उदरनिर्वाहासाठी संपूर्ण महाराष्ट्र भर स्थलांतर केले यामुळे आदिवासी कोळी महादेव जमात ही संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये आढळून येते. परंतु सन १९५० पूर्वीच्या जनगणना आयुक्तांनी खालील नियम केल्यामुळे तसेच स्वातंत्र पूर्व काळात बाहेर ठिकाणावरून आलेल्या शिक्षकांनी,कर्मचाऱ्यांनी नेमकी जातीची नोंद न करता केवळ कोळी या ( Generic Term) ने तसेच अशिक्षितपणामुळे व बोलण्याच्या किंवा हाक मारण्याच्या प्रघातामुळे कोळी आढळून येतात.
Sppplemenary Rule 8- In the case of Hindus and Jains you should record the main caste or tribal name in column 8, thus-Koli,Lohar, Bhil,Kumbhar, Teli. Do not enter sub-divisions. Thus you need not enter the kind of Koli or Bhil such as Chunvalya Koli or Patelia Bhil, if the person enumerated states he is a Koli or Bhil.
वरील नियमामुळे वरील करणामुळे महाराष्ट्रातील ९९.९९ टक्के आदिवासी कोळी महादेव जमातीच्या १९५० पूर्वीच्या नोंदी ह्या कोळी आढळून येतात. १९५०पूर्वीच्या नोंदी ह्या Aboriginal, Aborigines Hill Tribes, Forest Tribes, Primitive tribes, Tribal animists ,People Having a tribal form of religion या सदराखाली घेण्यात आल्याचे दिसून येते. या सदरा खाली नोंद घेतलेले कोळी म्हणजे आदिवासी कोळी महादेव,राज कोळी,मल्हार कोळी,टोकरे कोळी,आहेत हे सिद्ध होते.
वरील ठिकाणी असलेली कोळी महादेव जमात ही हे पूर्वेकडील निजाम राज्यातील बालाघाट किंवा महादेव डोंगर येथूनच आलेली आहे. हे खालील संदर्भावरून सिद्ध होते- पूर्वेकडील निजाम राज्यातील बालाघाट किंवा महादेव डोंगर म्हणजेच महादेव किंवा पचमढी टेकडी हे आताच्या मध्य प्रदेश मध्ये आहे- महादेव किंवा पचमढी टेकडी या वरूनच कोळी महादेव या जमातीचे नाव पडले- (संदर्भ- The Tribes And castes of the Central Provinces of India-1916)
महादेव किंवा पचमढी टेकडी या ठिकाणी मोठा महादेव, छोटा महादेव, गुप्त महादेव आहे हे ठिकाण सातपुडा पर्वतात आहे. याच भागाला लागून अमरावती जिल्ह्यात मोर्शीपासून पच्शिमेस ९ किमी अंतरावर सालबर्डी हे धार्मिक स्थळ महादेवाचे जागृत ठिकाण आहे. येथे महाशिवरात्रीला यात्रा राहते दुरदूरून भक्त दर्शनाला येतात महाराष्ट्राच्या सीमेवर असलेलं व सातपुडा पर्वत रांगा मध्ये वसलेलं भुयार अतिशय देखणीय व निसर्गरम्य स्थळ आहेत. महादेव महाराज देवस्थान आहे.
तसेच अमरावती जिल्ह्याला आगून अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या रेल(रेलेश्वर) या गावी महादेव आणि माता पार्वतीचे थाटामाटात लग्न लावण्याची प्रथा हजारो वर्षा पासून आहे.
तसेच याच भागात हजारो वर्षा पासून महादेवाच्या कावड यात्रेची प्रथा सुरू आहे. यावरून तसेच खालील ऐतिहासिक पुराव्यावरून असे सिद्ध होते कि, पूर्वेकडील निजाम राज्यातील बालाघाट किंवा महादेव डोंगर म्हणजेच वर्तमान काळातील महादेव किंवा पंचमढी टेकडी (आताच्या मध्य प्रदेशातील महादेव किंवा पंचमढी हिल )- हेच आदिवासी कोळी महादेव जमातीचे परंपरागत (मूळ) वसतिस्थान आहे.
References –
1) Transactions of the Bombay geographical Society- 2) Ahmadnagar Gazetteer- 3)The Tribes And castes of the Central Provinces of India-
4)The Tribes And castes of Bombay - 5)Report of the auxiliary And territorial forces committee. 6)The mahadev kolis
7) Imperial gazetteer of India 8 ) Census of India 1901
संकलकाचे निवेदन
विकिपिडीयावर यापूर्वी आदिवासी कोळी महादेव फक्त सह्याद्री मध्ये तसेच पुणे,नाशिक,अहमदनगर,ठाणे ह्याच जिल्ह्यामध्ये असल्याचे नमूद केले होते. परंतु माझ्या अल्पशा बुद्दीप्रमाणे ते संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये आहेत हे दिसून येये. परंतु मला महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील माहिती ज्ञात नसल्यामुळे मी त्या जिल्ह्यांचा उल्लेख केलेला नाही. कृपया कोळी महादेव बांधवांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज करू नये. कृपया माहितगार व अभ्यासू कोळी महादेव जमात बांधवांनी आप-आपल्या जिल्ह्यातील कोळी महादेव जमाती विषयी माहिती पुराव्यानिशी विकिपिडीयावर टाकावी ही विनंती. सदर माहिती वरून आपल्या आदिवासी कोळी महादेव जमातीचा खरा इतिहास जगा समोर येईल. एवढ्यासाठीच हा माझा छोटासा प्रयत्न आहे. कृपया कोळी महादेव बांधवांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज करू नये. विकिपिडीयावर कोणीही पुराव्यानिशी दुरुस्ती किंवा बदल करू शकते-
हर हर महादेव
प्रकृति ही जीवन धर्म पूर्व संस्कृती
संकलक - श्री-प्रकाश ना.पाटील (बेरार\वऱ्हाड)
कोळी महादेव परंपरेनुसार पश्चिम दख्खनमध्ये मूळ रूपात किल्ले-गडांच्या आसपास राहत. यांच्याबद्दल असे म्हणले जाते की, रावणाच्या दरबारात हे संगीतकार होते. गवळयांनी गडांशांवर(?) विजय मिळविला. गवळयांनी या प्रदेशाच्या राजाविरुद्ध युद्ध पुकारले. राजाने खानदेशातून कासरबारी घाटातून गवळयांना पराभूत करण्यासाठी सैन्य पाठविले. परंतु कासरबारी घाटाजवळच उठावकर्त्यांनी सैन्याला हरविले. या प्रदेशावर विजय मिळविण्यासाठी राजाने सरदारांना मोठे बक्षीस देण्याचे घोषित करूनसुद्धा एकही सरदार उठाव मोडण्यास तयार झाला नाही. अखेरीस सोनाजी गोपाळ या मराठा सरदाराने व्यंकोजी कोकाटा या कोळी महादवाच्या सहकार्याने गवळयांचा नाश केला. आणि या प्रदेशावर पूर्ववत महादेव कोळ्यांच राज्य आल. रुढीनुसा कोळी महादेव हे सह्याद्रीतच असल्याचा आणि हेच त्याचं राज्य असल्याचा सबळ पुरावा असा मिळतो की, पेशवे काळापूर्वी लिंगायताचे रावळ गोसावी हे कोळी महादेवाचे पुजारी म्हणून सह्याद्रीमध्ये रहात होते. यांचे वंशज सन १८३६मध्येसुद्धा छास (?) व मंचरमध्ये वास्तव्य करत होते.
देवदेवता
संपादनमहादेव कोळ्यांची गोत्रनावे व कुळांची नावे अनेक आहेत.पागोटे बांधणारे
महादेव कोळ्यांचे दैवत आहे. परंतु महादेव कोळ्यांची वरसूबाई ही रोग बरी करणारी विशेष देवता आहे. महादेव कोळी समाजाच्या धर्मविषयक कल्पना, सणवार आणि आचार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. वाघ्यादेव(वाघोबा), हिरवा, पांढरी, बयरोबा,काळोबा,वरसुआई,महादेव इत्यादी देव मानतात. सात, घट बसवणे,मोडा पाळणे,वाघ बारस, आखाजा चा पाडवा वगैरे सण पाळतात. कळमजाई देवीलाही पूजतात. कळसूबाई, जाकूबाई, सतूबाई, रानाई ,घोरपडाई,देवींला मानतात. शेतात खूप गवत माजले, तर ‘कणसरी’ ची प्रतिमा करून शेतात ठेवतात. हिंदू धर्माच्या संपर्कात आल्याने विठोबाचे माळकरीही समाजात आढळतात. परंतु आता बदल होत आहे. आपण धर्म संकल्पनेत येत नाही याची त्यांना जाण होऊ लागली आहे. त्यामुळे माळकरी टाळकरी यांच्यात घट होऊन आदिवासी तयार होत आहेत. नवस आणि मंत्रतंत्रावर फार विश्वास असला तरी शिकलेली पिढी यावर आता विश्वास करत नाही. समाजात भगताचे महत्त्व असाधारण आहे. आज शिक्षणामुळे काही प्रमाणात त्यांच्या बुवाबाजीत सकारात्मक बदल होत असल्याचे चित्र आहे.
रूढी व परंपरा
संपादनसमाजातील संस्कार म्हणजे प्रथम ऋतुदर्शनात मुलीची खणा-नारळाने ओटी भरतात. गरोदर स्त्रीचे ओटीभरण करीत नाहीत. स्त्रीचे पहिले बाळंतपण सासरी होते. बाळंतीण बाज वापरीत नाही. जमिनीवरच झोपते. हलिंद(??) व बाळंतिणीला बाजरीचे पीठ कातबोळ्याबरोबर शिजवून देतात. त्याने तिला दूध येते, अशी समजूत आहे. पाचवीला सटवीची पूजा करतात. जमलेल्या आप्तेष्टांत पाच भाकऱ्या व चण्याच्या घुगऱ्या वाटतात. षष्ठीपूजनाच्या वेळी सावा धान्याच्या दोन राशी जमिनीवर ठेवतात. त्यांना देवता समजून हळद-कुंकू वाहतात. त्यांच्यापुढे भात आणि तीळ यांचे पाच लाडू ठेवतात. त्यांतला एक तीळ-तांदळाचा लाडू बाळंतीण घरातील मोरीला अर्पण करते. बाळंतिणीच्या खोलीत भिंतीवर अकरा मानवाकृती काढतात. त्यांत ‘बाहुला’ ऊर्फ ‘बळी’ नावाची एक आकृती असते. तिचे डोके शेंदराने काढतात आणि पूजा करतात. त्यांना दूध, दही, खेकडा यांचा नैवेद्य दाखवतात. मूल रांगू लागले, की पंचपावली करून कुळदेवतेची पूजा करतात. मुलाचे नाव दहाव्या दिवशी ठेवतात व जावळ काही महिन्यांनी काढतात. जावळ काढण्याचा मोठा समारंभ असतो. जावळ गुरुवार, शुक्रवार अगर रविवार या दिवशी काढतात. मूल पाऊल टाकू लागले, की पावलाच्या आकाराएवढ्या तांदळाच्या पिठाच्या पाच आकृत्या करून त्या उकडून काढतात व पाच शेजाऱ्यांना वाटतात. समाजात मृताला जाळतात किंवा काही भागात पुरतात. लग्न गोत्र पाहून होते. एवढेच नव्हे, तर विशिष्ट गोत्रांतच विवाह होतात.
या समाजामध्ये बालविवाह प्रचलित नव्हता, आताही होत नाहीत. परंतु एकंदरीत आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने मुलांना शिकविण्याऐवजी त्यांचे लग्न लवकरात लवकर लावण्याचाच प्रयत्न केला जातो. लग्न वडील माणसांमार्फत ठरते. मुलीचे द्याज देतात. प्रथम साखरपुडा होतो. लग्न मुलीच्या घरी मांडवात होते. लग्नात खूपच बारीकसारीक विधी असतात. आदिवासी महादेव कोळ्यांमध्ये हुंडा घेतला जात नाही व दिलाही जात नाही.
उपजीविका व व्यवसाय
संपादनमहादेव कोळी समाजातील लोकांचा व्यवसाय शेती व जंगलातला रान मेवा गोळा करण्याचा असतो. जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात हिरडा गोळा केला जातो. जंगलातून गोळा करून आणलेल्या वस्तू विकूनही पुरेसे पैसे मिळत नाही. जंगलातील वनोपजाचे व्यवस्थापन व वापराचे हक्क या समाजाला मिळाले तर दोहोंची समृद्धी शक्य आहे.[१] तसेच अकोले तालुक्यातील महादेव कोळी समाज देखील रानं मेव्यावर विशिष्ट भर देतो.
शिवाजी महाराजांच्या पुणे परिसरातील कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मोगलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्याचा थेट उपसर्ग होत नव्हता. त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला. ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मोगलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला असावा. मोगलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना परास्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली. शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्य मोगल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे १५०० महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला महादेव कोळी चौथरा म्हणतात. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर फारसीमधे दोन शिलालेखदेखील आहेत. दुर्दैवाने आज त्या महादेव कोळ्यांची किंवा त्यांच्या म्होरक्याची नावे उपलब्ध नाहीत. [२]
संदर्भ आणि नोंदी
संपादन
ठाणे गॅझेटीअर- 1882,
अहमदनगर गॅझेटीअर - 1881