हरीण (लेखनभेद: हरिण) हे खुरधारी वर्गातील शाकाहारी जंगली प्राणी आहेत. हरणात दोन मुख्य प्रकार आहेत. एक सारंग हरीण (Cervidae) किंवा खरे हरीण आणि दुसरे कुरंग हरीण (Antelope).

हरिण
हरिण
हरिण
शास्त्रीय वर्गीकरण
जीवसृष्टी: प्राणी
वंश: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: खुरधारी
गण: युग्मखुरी
कुळ:  • गवयाद्य,

 •  सारंगाद्य,

सारंग हरीण उर्फ सारंगाद्य कुळ, यात सांबर, चितळ, कस्तुरी मृग, बाराशिंगा, भेकर, थामिन, रेनडियर, मूस, काश्मिरी हंगूल, भुंकरे सारंग, पारा हरीण (Hogdeer) तसेच पिसोरी इत्यादी हरणाचे प्रकार मोडतात. यांच्यात जवळपास सर्वच हरणांची दरवर्षी जुनी शिंगे गळून त्यांना नवीन शिंगे उगवतात.[][]

कुरंग हरीण हे गवयाद्य कुळातील उप कूळ आहे. यात काळवीट, नीलगाय, चिंकारा, चौशिंगा, पिसूरी हरीण, इंफाळा हरीण तसेच ग्रे ऱ्हिबॉक हरीण इत्यादी प्रकार मोडतात. यांच्यात एकदा आलेली शिंगे गळून पडत नाहीत.

हरीण, हा एक शाकाहारी सस्तन प्राणी एक आहे. हरणांच्या प्रत्येक पायाला सम संख्येत खुर असतात, त्यामुळे हरणांचा समावेश युग्मखुरी या गणात झाला आहे. जगातील विविध प्रांतातील वातावरणानुसार आणि हवामानानुसार हरणात विविध आकार आणि रंगसंगती आढळते. हरिण हे सहसा घनदाट अरण्य, वाळवंट, मैदानी जंगले व पर्वतरांगा वर दिसून येतात.

बहुतेक सर्व नर हरणांना शिंगे असतात. अपवादात्मक जातींच्या माद्यांना शिंगे असतात. परंतु माद्यांची शिंगे नरांच्या शिंगापेक्षा लहान आणि नाजूक असतात. हरिण हा प्राणी सहसा कळपाने राहतो. नर व माद्याचे कळप वेगवेगळे असून मिलन काळात ते एकत्र येतात.

संदर्भ

संपादन
  1. ^ Kingdon, J. (2015). The Kingdon Field Guide to African Mammals (2nd ed.). London, UK: Bloomsbury Publishing. p. 499. ISBN 978-1-4729-2531-2.
  2. ^ Jameson, E. W.; Peeters, H. J., Jr. (2004). Mammals of California (Revised ed.). Berkeley, USA: University of California Press. p. 241. ISBN 978-0-520-23582-3.