भीमा नदी

पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक
(भीमा या पानावरून पुनर्निर्देशित)
Disambig-dark.svg

भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा म्हणतात. ती महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात भीमाशंकरजवळ उगम पावते व अंदाजे ८३१ कि.मी. आग्नेयेस वाहून कर्नाटकात रायचूरजवळ कृष्णा नदीला मिळते.

भीमा
उगम भीमाशंकर
पाणलोट क्षेत्रामधील देश महाराष्ट्र, कर्नाटक
लांबी ८६१ किमी (५३५ मैल)
उगम स्थान उंची १,१०० मी (३,६०० फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ४८,६३१
ह्या नदीस मिळते कृष्णा
उपनद्या कुंडली घोड, नीरा, सीना, इंद्रायणी, मुळा, वेळ
धरणे उजनी धरण

भीमेला उजवीकडून भामा, इंद्रायणी, मुळा, निरा व माण तर डावीकडून वेळ, घोडसीना या नद्या येऊन मिळतात.

भीमा नदीची नीरा नदी ही उपनदी सोलापूर जिल्ह्यातील नरसिंगपूर-नीरा या गावाजवळ भीमेला मिळते. मुळा-मुठा आणि भीमा नदीचा संगम पुणे जिल्ह्यातील रांजणगाव सांडस येथे होतो.

भीमा नदीचे पाणलोट क्षेत्रफळ ४६,००० चौरस कि.मी.आहे.

महाराष्ट्राच्या पावसाळ्यात भीमेला अनेकदा पूर येतो.

भीमा नदीवर एकूण बावीस धरणे आहेत.

चंद्रभागासंपादन करा

चंद्रभागा नदी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधून वाहणारी नदी आहे. ही भीमा नदीच आहे. भीमा पंढरपुराजवळून वाहताना चंद्रकोरीप्रमाणे वळण घेते, म्हणून तिला पंढरपुरात चंद्रभागा म्हणतात. ही चंद्रभागा, अमरावती जिल्ह्यातली चंद्रभागा, हिमाचल प्रदेशातील चंद्रभागा आणि ओरिसातील चंद्रभागा या वेगळ्या नद्या आहेत. पंढरपूरमधून चंद्रभागा नदी पुढे सुस्ते, पळूज, पठाण गावाजवळून सोलापूर जिल्ह्यात जाते. सुस्ते गावातील शेतकरी शेती करता चंद्रभागेच्या पाण्याचा वापर करतात. सुस्ते गावातील देवी अंबाबाईचे मंदिर चंद्रभागेच्या तटावर आहे.

भीमा नदीच्या उपनद्यासंपादन करा

भामा (शेलपिंपळगाव येथे संगम), इंद्रायणी नदी (तुळापूर येथे संगम), मुळा, कुंडली, माण, नीरा वगैरे.

भीमा नदीकाठची मंदिरेसंपादन करा

भीमा नदीकाठची गावेसंपादन करा

कोरेगांव भीमा , निमगाव-दावडी,शेलपिंपळगाव, पंढरपूर, राजगुरुनगर, अरळी

सांस्कृतिक आणि साहित्यातले उल्लेखसंपादन करा

हे सुद्धा पहासंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.