इंद्रायणी नदी
इंद्रायणी नदी भारतातील महाराष्ट्र राज्यातील नदी आहे. ही नदी पुणे जिल्ह्यात लोणावळ्याच्या कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर नागफणीजवळ उगम पावते.[१] पुढे टाटा धरणामुळे नदी लुप्त होते आणि धरणापासून परत सुरू होते.
इंद्रायणी | |
---|---|
उगम | लोणावळा, पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
प्रवाह
संपादनलोणावळा शहरातील इंद्रायणीचा प्रवाह साधारणपणे सुमारे ४ किलोमीटर लांबीचा आहे. शहरातले नदीपात्र अत्यंत अरुंद आहे. कामशेत रेल्वे स्टेशनजवळ ते पात्र बऱ्यापैकी रुंद आहे. आळंदी गावातून वहात वहात पुढे जाऊन इंद्रायणी नदी ही भामा नदीला घेऊन तुळापूर गावाजवळ भीमा नदीस मिळते.[२] कुंडलिका नदी (किंवा कुंडली) ही इंद्रायणीची उपनदी आहे. त्यांचा संगम वडिवळे या गावाजवळ होतो. त्या संगमापासूनच इंद्रायणी नदी वाहती होते, वडिवळे धरण कुंडलिकावर आहे. कुंडलिका (कुंडली) व इंद्रायणी यांच्या संगमावर शंकराचे प्राचीन मंदिर आहे. शिवरात्रीला या मंदिरात भाविकांची खूप गर्दी होते.
इंद्रायणीच्या वरच्या बाजूला धरणाजवळ कुबेरगंगा नावाची एक लहान नदी इंद्रायणीला मिळते. तेथे एक बेट झाले आहे, हेच सिद्धबेट म्हणून पुढे प्रसिद्ध झाले.[ संदर्भ हवा ]
राम झरा
संपादनराम झरा हा या इंद्रायणी नदीला मिळणारा मुख्य नाला आहे. या झऱ्याचा उगम पुणे जिल्ह्यातील चिखलीजवळच्या हरगुडे वस्ती येथे होतो व कुदळवाडीतून वाहत वाहात चिखली-मोई फाट्याजवळ तो इंद्रायणीत विलीन होतो. या झऱ्याचा उल्लेख तुकारामांच्या गाथांत आला आहे. हा झरा बाराही महिने वाहत असे, त्यामुळे या झऱ्यात जलचरांचा मोठा वावर होता. संत तुकाराम जेव्हा आळंदीला पायी वारी करायचे त्यावेळेस ते चिखली गावाजवळील ह्या झऱ्यावर आराम करून तेथे पाणी पिऊन पुढे जायचे. झऱ्याच्या दोन्ही बाजूला पोटखराबा जमीन आहे.
हळूहळू या झऱ्याला गटारगंगेचे स्वरूप आले. चिखली, कुदळवाडी, जाधववाडी, हरगुडे वस्ती व तेथील बंदिस्त गोदामात रसायने साठविणारे सर्व व्यापारी, त्रिवेणी नगर व तेथील पावडर कोटिंग व्यवसाय करणारे यांचे रिकामे रसायन कंटेनर, पोती, बॅगा वगैरे गोष्टी भंगाराचा व्यवसाय करणारे व्यापारी घेतात व राजरोजपणे त्या वस्तू धुऊन त्यांतले घातक रसायनयुक्त पाणी बेधडकपणे राम झऱ्यात सोडून देतात. रासायनिक कंपनीतील रसायनांचे रिकामे बॅरेल्स नाल्याशेजारच्या भंगार शेडमध्ये धुऊन पुन्हा विकले जातात.
कामशेत, वडिवळे, पाथरगांव, नाणे, नानोली, पारवडी या गावोगावच्या सांडपाण्यामुळे प्रदूषित झालेली इंद्रायणी नदी, राम झऱ्यात सोडल्या जाणाऱ्या घातक रसायनांमुळे आणखीनच प्रदूषित होत आहे. राम झऱ्यामधे भिंती बांधूनही त्यावर व्यावसायिकांचे आक्रमण चालू आहे.[ संदर्भ हवा ]
पहा : राम नदी
राम नदी
संपादनपहा : राम नदी
इंद्रायणी नदीकाठची गावे
संपादनदेहू आळंदी मोई निघोजे
भूशास्त्रीय रचना
संपादनइतिहास
संपादनपुरातत्त्वीय
संपादनऐतिहासिक घटना
संपादनधार्मिक वैशिष्ट्ये
संपादनइंद्रायणी नदीच्या काठी वसलेले श्रीक्षेत्र आळंदी हे देवस्थान संत ज्ञानेश्वर यांच्या समाधी मंदिरामुळे विशेष प्रसिद्ध आहे.[३][४] निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही भावंडे आपल्या कुटुंबीयांसह आळंदी येथे राहत असल्याने या गावाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.[५]
सांस्कृतिक वैशिष्ट्ये
संपादनइंद्रायणी नदीच्या काठी आळंदी येथे पंढरपूरला आषाढी वारीला जाणाऱ्या वारकरी समूहाचे सदस्य दरवर्षी एकत्रित होतात. या काळात इंद्रायणी नदीचा घाट आणि परिसर सर्व आलेल्या वारकरी मंडळींच्या गर्दीने भरलेला असतो.[६]
जल व्यवस्थापन
संपादनधरणे
संपादनबंधारे
संपादनकालवे
संपादनअर्थशास्त्रीय वैशिष्ट्ये
संपादनउपजीविका
संपादनशेती
संपादनमासेमारी
संपादनउद्योग
संपादनपर्यटन
संपादनपायाभूत सुविधा
संपादनपूल
संपादनदळणवळण
संपादनसांडपाणी व्यवस्थापन
संपादनजल वाहिन्या
संपादनव्यावसायिक वापर
संपादनतीर्थक्षेत्र (घाट, इ.)
संपादनसंत ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधी मंदिर इंद्रायणी नदीच्या किनारी असल्याने येथील नदीकाठाला व त्यावर बांधलेल्या घाटांना पवित्र मानले गेले आहे.[३]
पर्यावरण
संपादनपरिसंस्था
संपादनजैव विविधता
संपादनवनस्पती
संपादनप्राणी
संपादनबाहेरचे / आक्रमक वनस्पती व प्राणी
संपादनपाण्याची गुणवत्ता
संपादनप्रदूषण
संपादनमैलापाणी वहन
संपादनसांडपाणी
संपादनघन कचरा
संपादनराडारोडा
संपादनउद्योगांद्वारे सोडलेले उत्सर्जन
संपादनशेतीद्वारे होणारे उत्सर्जन
संपादनउघड्यावर शौच
संपादनसण, उत्सव, धार्मिक विधींमुळे होणारे प्रदूषण
संपादनसमाजावर होणारे परिणाम
संपादनअतिक्रमणे
संपादनघातक उद्योग
संपादननैसर्गिक आपत्ती
संपादनकार्यरत लोक चळवळी, संस्था, इ.
संपादननदी आणि तिचे होणारे प्रदूषण याविषयी लोकजागृती करण्याच्या हेतूने इंद्रायणी नदीमधून पंढरपूरपर्यंत जलदिंडी आयोजित केली जाते. बारा दिवसात ही जलदिंडी पंढरपूर येथे पोहोचते.[७] आषाढ महिन्यातील पंढरपूर वारीसाठी दरवर्षी इंद्रायणी नदी आणि तिच्या घाटांची स्वच्छता स्वयंसेवी संस्थांच्या आणि ग्राम पंचायतीच्या माध्यमातून केली जाते.[८]
शासकीय परिपत्रके, अहवाल, न्यायालयीन आदेश, इ.
संपादनसाहित्य
संपादनकला
संपादननाटक
संपादनचित्रपट
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ Mahārāshṭa paricaya, arthāt, Sãyukta Mahārāshṭrācā jñānakośa. Prasāda Prakāśana. 1954.
- ^ Abhinava marathi jna.
- ^ a b Khole, Vilāsa (1996). Bāpa Jñāneśvara samādhistha. Pratimā Prakāśana.
- ^ Ranade, Prabha Shastri. States of our Union- Maharashtra (इंग्रजी भाषेत). Publications Division Ministry of Information & Broadcasting. ISBN 9788123023120.
- ^ Nāmadeva (1999). Nāmā mhaṇe: Śrīnāmadeva-gāthetīla tīnaśe sahāsashṭa nivaḍaka abhāṅgāñce nirūpaṇa. Snehala Prakāśana.
- ^ "संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा तयारी". २३. ६. २०१९. 2019-08-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३. ८. २०१९ रोजी पाहिले.
|access-date=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Chatterjee, Sukumar (2016-11-18). Grandpa's Tales of Ahmednagar – Part 1 (इंग्रजी भाषेत). Notion Press. ISBN 9781946280213.
- ^ "पाचशे फिरती स्वच्छतागृहे". ३. ७. २०१८. ३. ८. २०१९ रोजी पाहिले.
|access-date=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |