भारतीय नौदल

भारतीय लष्कराचा नौदल विभाग
(भारतीय नौसेना या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतीय नौदल १७ व्या शतकातील मराठा सम्राट, छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना "भारतीय नौदलाचे जनक" मानले जाते.[ संदर्भ हवा ]

भारतीय नौदल

स्थापना १९३४
देश भारत ध्वज भारत
विभाग नौदल
आकार ५६००० खलाशी
ब्रीदवाक्य ' शं नो वरुण '
रंग संगती   
मुख्यालय नवी दिल्ली
सेनापती आर हरी कुमार
संकेतस्थळ [१]
ध्वज
ध्वज 2001-2004
ध्वज 1950-2001

इ.स. १९३४ मध्ये ब्रिटीशांनी स्थापलेल्या ‘रॉयल इंडियन नेव्ही’ (आरआयएन) या सेनेपासून सुरुवात झाली. इ.स. १९७१च्या भारतपाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाले. हा क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला तो दिवस ४ डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते.

भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौकांच्या तोफा आहे. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. २०० मरीन कमांडों नौदलात आहेत. तसेच भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. विराट, डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका तसेच संकुश पाणबुडी हे सुद्धा नौदलाचे भाग आहेत.

इतिहास

संपादन

इ.स. १९५३ मध्ये हवेत मारा करणारी शस्त्रे आणि इ.स. १९६७ मध्ये पाणबुडय़ा ताफ्यात समाविष्ट झाल्या.

युद्धनौका बांधणी

संपादन

युद्धनौका बांधणीचा प्रकल्प देशातच हवी या अनुषंगाने [गोदी] मध्ये इ.स. १९६६ वर्षी लढाऊ जहाजाच्या बांधणीचे काम सुरू झाले. या माध्यमातून आजतगायत ८० युद्धनौकांची बांधणी करण्यात आली आहे. त्यात टेहळणी जहाजांपासून विनाशिकेपर्यंत आणि लढाऊ जहाजे, पाणबुडी यांच्यासह युद्धनौकांचाही समावेश आहे.

युद्धनौका आणि पाणबुड्या

संपादन

भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंत ही सामील आहे. अण्वस्त्र आव्हानाला तोंड देण्याची क्षमता असलेल्या या आयएनएस अरिहंतची निर्मिती कलपक्कम येथील 'इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲंटोमिक रिसर्च' येथे 'भारतीय नौदल' आणि 'संरक्षण संशाधक आणि विकास ऑर्गनायझेशन'ने एकत्रित प्रयत्नांतून करण्यात आली आहे.

 
आयएनएस अरिहंत
 
आय एन एस सिंधुरक्षक


विमान वाहक

संपादन

विक्रमादित्य, विराट,

विनाशिका

संपादन

फ्रिगेट

संपादन

कॉर्वेट

संपादन

पाणबुड्या

संपादन

अनु इंधनावरच्या पाणबुड्या

संपादन

उभयचर युद्ध नौका

संपादन

गस्ती नौका / छोट्या युद्ध नौका

संपादन
 • सुकन्या वर्ग - सुकन्या, सुभद्रा, सुवर्णा, सावित्री, शारदा, सुजाता, सरयू, सुनयना, सुमेधा
 • बंगरम वर्ग - बंगरम, बित्र, बट्टी मल्व, बरतंग
 • त्रिंकट वर्गाच्या - त्रिंकट, तरस
 • सुपर द्वोरा-II वर्ग त्वरित आक्रमण नौका (फास्ट अटॅक क्राफ्ट) - एफएसी टी-८०, टी-८१, टी-८२, टी-८३, टी-८४
 • कार निकोबार वर्ग' त्वरित आक्रमण नौका (फास्ट अटॅक क्राफ्ट)
 • सर्वेक्षण नौका- मकर वर्ग, संधयक वर्ग- निरूपक, इन्वेस्टीगेटर, जमुना, सतलज, संधयक, निर्देशक, दर्शक, सर्वेक्षक

माईनस्वीपर

संपादन

सहायक नौका

संपादन
 • टैंकर- दीपक, ज्योति, आदित्य
 • तारपीडो रिकवरी पोत- अस्त्रवाहिनी (टीआरवी 71), टीआरवी 72
 • अन्य- मातंग, गज, निरीक्षक

ट्रेनिंग/शोध

संपादन

तीर, तरंगिनी, सुदर्शिनी, म्हादे, सागरध्वनि

आवाका

संपादन

अन्य राष्ट्रांच्या विनंतीवरून भारतीय नौदल त्या त्या राष्ट्रांच्या समुद्रसीमेतही तैनात होऊ लागले. इतर राष्ट्रांच्या बंदरांना भेटी, संयुक्त कवायत, प्रशिक्षण व आपत्कालीन मदत याद्वारे मैत्रीचे संबंध बळकट करण्यात आले आहेत. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, फ्रान्स, रशिया, चीन आदी राष्ट्रांबरोबर नौदलाने संयुक्त कवायतींमार्फत ज्ञानाचे आदानप्रदानही केले आहे. इ.स. २००४ मध्ये त्सुनामी संकटात श्रीलंका, इंडोनेशिया आणि मालदीव या देशांना तात्काळ मदतीचा हात दिला.

भारतीय नौदल दिन

संपादन

४ डिसेंबर इंडियन नेव्ही डे म्हणजे भारतीय नौदल दिन म्हणून ओळखला जातो. १९७१ साली भारताच्या नौदलानं पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात कराची बंदरावर हल्ला करण्यात आला , विशाखापट्टणमवरचा हल्ला परतवण्यात आणि पूर्व पाकिस्तानातल्या नेव्हीचं उच्चाटन करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. या कामगिरीचं नाव होतं ऑपरेशन ट्रायडण्ट. ४ डिसेंबरला ही कामगिरी यशस्वी झाली. या कामगिरीला सलाम म्हणून भारतीय नौसेना नेव्ही डे साजरा करते.[१]

नौदल भरती

संपादन
 • एमईआरएस, एनएमईआर आरटी फिसर अ‍ॅप्रॅण्टिसेसस (एए) आणि डायरेक्टर एण्ट्री डिप्लोमा होल्डर्स (डीइडीएच) या पदासाठी दरवर्षी फेब्रुवारी आणि ऑगस्टमधील रोजगार समाचार आणि सर्व आघाडीच्या राष्ट्र/ प्रादेशिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली जाते.
 • नौदल भरती संघटना नौदलाच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयामध्ये असणाऱ्या मनुष्यबळ नियोजन आणि भरती संचालनालयाअंतर्गत नौदल भरती संघटना काम करते. नौदलामध्ये कर्मचाऱ्यांची भरती करण्याची जबाबदारी या संघटनेवर असते. भारतीय नौदलात खलाशांची भरती वर्षातून दोन वेळा होते.

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन