आयएनएस अरिहंत (S-73) ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी व्हेसल या गटातील मोडणारी ही भारतीय बनावटीची आण्विक पाणबुडी आहे. भारताची ही पहिलीच आण्विक पाणबुडी असून यापूर्वी भारताने रशिया कडून आण्विक पाणबुडी भाडेतत्त्वावर घेतली होती.

आय.एन.एस. अरिहंतचे रेखाचित्र

अरिहंतचा अर्थ शत्रूचा नाश करणारी असा होतो. भारतीय नौदलाला अशा आण्विक पाणबुडीची जागतिक स्तरावर ठसा उमटवण्यासाठी तीव्र गरज होती. सुमारे तीस हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प यासाठी १९८० मध्ये सुरू झाला. दोन दशके या पाणबुडीची उभारणी चालू होती. ही उभारणी विशाखापट्टणम येथील गोदीत करण्यात आली.[]

अरिहंतची क्षमता

संपादन
  • क्षमता - ६,००० टन
  • लांबी - ११० मीटर
  • रुंदी - १२ मीटर
  • आण्विक प्रक्रियक - ८५ मेगावॉट
  • वेग - २२ ते २८ किमी प्रति तास
  • शिबंदी - ९५-१०० खलाशी व अधिकारी
  • क्षेपणास्त्रे - १२

प्रगती

संपादन

भारतीय बनावटीच्या आय.एन.एस. अरिहंतवरील आण्विक प्रक्रियक ९ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी रात्री कार्यान्वित करण्यात आला. नौदलामध्ये दाखल करून घेण्याआधी आणखी काही चाचण्या करण्यात येतील.[]

हे सुद्धा पहा

संपादन


संदर्भ आणि नोंदी

संपादन