शिशुमार वर्गाच्या पाणबुड्या
शिशुमार वर्गाच्या पाणबुड्या भारतीय आरमाराच्या पाणबुड्यांचा प्रकार आहे. या पाणबुड्या जर्मनीत बांधल्या गेल्या. या वर्गातील पाणबुड्या पाण्याखाली असताना विद्युत शक्ती तर पाण्याच्या वर असताना डीझेल इंधनावर चालविल्या जातात. इ.स. १९८१ मध्ये भारत व जर्मनी यांच्यात झालेल्या करारांतर्गत यांची बांधणी केली गेली व इ.स. १९८६ ते इ.स. १९९४ दरम्यान या पाणबुड्या भारतीय आरमाराला दिल्या गेल्या.
या वर्गात एकूण चार पाणबुड्या आहेत. याशिवाय अधिक दोन पाणबुड्या बांधायचा करार असताना इ.स. १९९८मधील पोखरण २ अण्वस्त्र चाचणीनंतर जर्मनीने या पाणबुड्या भारतास देण्यास नकार दिला.[१]