भारतातील महिला मुख्यमंत्र्यांची यादी

भारतातील महिला मुख्यमंत्री

मुख्यमंत्री हे भारतीय राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. भारतीय संविधानानुसार, राज्यपाल एक राज्याचे विधित: अध्यक्ष असून, वास्तविक मुख्यमंत्रांना अधिकार देण्यात आले आहेत . विधानसभेच्या निवडणुकांनंतर, राज्याचे राज्यपाल सहसा बहुमत असलेल्या पक्षाला (किंवा आघाडीला) सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करतात. राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नेमणूक करतात, ज्यांचे मंत्री परिषद एकत्रितपणे विधानसभेत जबाबदार असते. विधानसभेत विश्वासदर्शक ठरल्यास, मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे आणि मुदतीची मर्यादा नाही. []

१९६३ पासून भारतात १६ महिला मुख्यमंत्री झाल्यात, त्यापैकी बहुतांश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या होत्या. मुख्यमंत्री होणाऱ्या पहिल्या महिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सुचेता कृपलानी होत्या, ज्यांनी २ ऑक्टोबर १९६३ रोजी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सर्वात जास्त काळ काम करणाऱ्या महिला मुख्यमंत्री शीला दीक्षित होत्या, ज्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेशाच्या मुख्यमंत्री म्हणून काम केले होते आणि त्यांनी पंधरा वर्षांहून अधिक काळ या पदावर काम केले. जे. जयललिता , ज्यांनी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघममधून तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे, त्यांचा दुसरा सर्वात मोठा कार्यकाळ आहे, त्यांनी२०१६ मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत हे पद सांभाळले आणि त्या कार्यालयात मरण पावणाऱ्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या, तर त्याच राज्याच्या आणि पक्षाच्या व्ही.एन. जानकीचा सर्वात कमी कालावधी (फक्त २३ दिवस) आहे. भारतात २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त १२ राज्यात आणि १ केंद्रशासित प्रदेशात महिला मुख्यमंत्री होत्या. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी या भारतातील एकमेव विद्यमान महिला मुख्यमंत्री आहेत.

कालक्रमानुसार यादी

संपादन
संकेतसूची

क्र. चित्र नाव

(जन्म–निधन)

राज्य/केंद्र शासित प्रदेश राजकीय पक्ष[a] पदाचा कार्यकाळ एकूण कार्यकाळ(दिवस)
सुचेता कृपलानी
(१९०८-१९७४)
उत्तर प्रदेश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २ ऑक्टोबर १९६३ १३ मार्च १९६७ 1258
  नंदिनी सतपथी
(१९३१-२००६)
ओडिशा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 14 June 1972 3 March 1973 1278
६ मार्च १९७४ १६ डिसेंबर १९७६[RES]
चित्र:Shashikala Kakodkar.jpg शशिकला काकोडकर
(१९३५–२०१६)
गोवा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष १२ ऑगस्ट १९७३ २७ एप्रिल १९७९ 2084
  सैय्यदा अनवरा तैमूर
(१९३६-२०२०)
आसाम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ६ डिसेंबर १९८० ३० जून १९८१ 206
  व्ही. एन. जानकी रामचंद्रन
(१९२३-१९९६)
तामिळ नाडू अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम ७ जनुकारी १९८८ ३० जनुकारी १९८८ 23
  जयललिता
(१९४८–२०१६)
तामिळ नाडू अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम २४ जून १९९१ १२ मे १९९६ 5238
१४ मे २००१ २१ सप्टेंबर २००१ [RES]
२ मार्च २००२ १२ मे २००६
१६ मे २०११ २७ सप्टेंबर २०१४
२३ मे २०१५ ५ डिसेंबर २०१६[†]
  मायावती
(१९५६–)
उत्तर प्रदेश बहुजन समाज पक्ष १३ जून १९९५ १८ ऑक्टोबर १९९५ 2562
२१ मार्च १९९७ २१ स्पेटम्बर १९९७[RES]
३ मे २००२ २९ ऑगस्ट २००३[RES]
१३ मे २००७ १५ मार्च २०१२
  राजिंदर कौर भट्ठल
(१९४५–)
पंजाब भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २१ नोव्हेंबर १९९६ १२ फेब्रुवारी १९९७ 83
  राबडी देवी
(१९५९–)
बिहार राष्ट्रीय जनता दल २५ जुलै १९९७ ११ फेब्रुवारी १९९९ 2746
९ मार्च १९९९ २ मार्च २०००[RES]
११ मार्च २००० ६ मार्च २००५
१०   सुषमा स्वराज
(१९५३-२०१९)
दिल्ली भारतीय जनता पक्ष १२ ऑक्टोबर १९९८ ३ डिसेंबर १९९८ 52
११   शीला दीक्षित
(१९३८-२०१९)
दिल्ली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ३ डिसेंबर १९९८ २८ डिसेंबर २०१३ 5504
१२   उमा भारती
(१९५९–)
मध्य प्रदेश भारतीय जनता पक्ष ८ डिसेंबर २००३ २३ ऑगस्ट २००४[RES] 259
१३   वसुंधरा राजे शिंदे
(१९५३–)
राजस्थान भारतीय जनता पक्ष ८ डिसेंबर २००३ ११ डिसेंबर २००८ 3659
८ डिसेंबर २०१३ १६ डिसेंबर २०१८
१४   ममता बॅनर्जी*
(१९५५–)
पश्चिम बंगाल अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस २० मे २०११ विद्यमान 4936
१५   आनंदीबेन पटेल
(१९४१–)
गुजरात भारतीय जनता पक्ष २२ मे २०१४ ७ ऑगस्ट २०१६ [RES] 808
१६   मेहबूबा मुफ्ती
(१९५९–)
जम्मू आणि काश्मीर जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी ४ एप्रिल २०१६ २० जून २०१८ 807

नोंदी

संपादन
  1. ^ या स्तंभात फक्त मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची नावे आहेत. तिने ज्या राज्य सरकारचे नेतृत्व केले आहे ते अनेक पक्षांची आणि अपक्षांची एक आघाडी असू शकते; हे येथे सूचीबद्ध नाहीत.

संदर्भ

संपादन

 

  1. ^ Durga Das Basu. Introduction to the Constitution of India. 1960. 20th Edition, 2011 Reprint. pp. 241, 245. LexisNexis Butterworths Wadhwa Nagpur. आयएसबीएन 978-81-8038-559-9