प्लॅटिनम

(प्लाटिनम या पानावरून पुनर्निर्देशित)

(Pt) (अणुक्रमांक ७८) रासायनिक पदार्थ.


प्लॅटिनम,  Pt
सामान्य गुणधर्म
साधारण अणुभार (Ar, standard)  ग्रॅ/मोल
प्लॅटिनम - आवर्तसारणीमधे
हायड्रोजन हेलियम
लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नत्रवायू प्राणवायू फ्लोरीन निऑन
सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन स्फुरद गंधक क्लोरिन आरगॉन
पोटॅशियम कॅल्शियम स्कॅन्डियम टायटॅनियम व्हेनेडियम क्रोमियम मँगेनीज लोखंड कोबाल्ट निकेल तांबे जस्त गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन
रुबिडियम स्ट्रॉन्शियम यिट्रियम झिर्कोनियम नायोबियम मॉलिब्डेनम टेक्नेटियम रुथेनियम ऱ्होडियम पॅलॅडियम चांदी कॅडमियम इंडियम कथील अँटिमनी टेलरियम आयोडिन झेनॉन
Caesium Barium Lanthanum Cerium Praseodymium नियोडायमियम Promethium Samarium Europium Gadolinium Terbium Dysprosium Holmium Erbium Thulium Ytterbium Lutetium Hafnium Tantalum Tungsten Rhenium Osmium Iridium Platinum सोने पारा Thallium Lead Bismuth Polonium Astatine Radon
फ्रान्सियम रेडियम ॲक्टिनियम थोरियम प्रोटॅक्टिनियम युरेनियम नेप्चूनियम प्लुटोनियम अमेरिसियम क्युरियम बर्किलियम कॅलिफोर्नियम आइन्स्टाइनियम फर्मियम मेंडेलेव्हियम नोबेलियम लॉरेन्सियम रुदरफोर्डियम डब्नियम सीबोर्जियम बोह्रियम हासियम मैटनेरियम Darmstadtium Roentgenium Copernicium Nihonium Flerovium Moscovium Livermorium Tennessine Oganesson


Pt

प्लॅटिनम
गण अज्ञात गण
भौतिक गुणधर्म
घनता (at STP)  ग्रॅ/लि
आण्विक गुणधर्म
इतर माहिती
संदर्भ | प्लॅटिनम विकिडेटामधे

१६ व १७ व्या शतकात स्पॅनिश लोकांनी ॲझटेक आणि इंका लोकांकडून टनावारी सोने, चांदी आणि हिरेमाणके जहाजात भरभरून आपल्या देशात नेले. त्यातच रुपेरी धातूचे काही कणही होते. त्यांचा वितळणबिंदू फारच उच्च असल्याने ते कण निरुपयोगी ठरले, सोने मिळविण्यास अडचणीचे ठरले. स्पॅनिश लोकांनी त्यास तिरस्काराने प्लॅटिनो म्हणजे हलक्या प्रतीची चांदी असे नाव दिले.

पुढे १८ व्या शतकाच्या अखेरीस रशियन रसायनशास्त्रज्ञ व सेंट पीटर्सबर्गच्या खनिकर्म महाविद्यालयाचे उपाध्यक्ष आपोलस म्युसिन-पुश्किन यांनी प्लॅटिनमच्या अभ्यासात महत्त्वाचे योगदान दिले. त्यामुळे प्लॅटिनमसह निसर्गतः:च येणाऱ्या अनेक धातूंचा शोध लागला, या सर्वांना मिळून प्लॅटिनम वर्गीय धातू असे नाव दिले गेले. यात १८०३ मध्ये पॅलॅडियमऱ्होडियम, १८०४ मध्ये ॲस्मियमइरिडियम तर १८४४ च्या सुमारास रुदेनियमचा शोध लागला. टंग्स्टनचा शोध लागेपर्यंत प्लॅटिनम-पोलाद हे सगळ्यात कठीण संयुग समजण्यात येई, त्यास डायमंड-स्टील असे म्हणत.

प्लॅटिनमच्या अंगी रासायनिक रोधकता आहे. तीव्र सल्फ्युरिक आम्लाचाही यावर परिणाम होत नाही म्हणून औद्योगिक क्षेत्रात प्लॅटिनमच्या मुशी, भांडी, चाळण्या, नळ्या वगैरे वापरतात. काचेवर प्लॅटिनमचा अत्यंत पातळ थर देऊन तयार केलेला आरसा दारा-खिडक्यांना लावतात त्यामुळे घरातील व्यक्तीला बाहेरचे नीट पाहता येते पण बाहेरील व्यक्तीला या काचेतून घरातील काहीही दिसत नाही.

१८८३ साली प्लॅटिनमच्या सहाय्याने प्रमाणित मानके (किलोग्रॅम, मीटर वगैरे) तयार करण्यात आली. या मानकांचे वेळोवेळी परीक्षण केले असता लक्षात आले की १२५ पेक्षा जास्त वर्षे होऊनही यांच्यात काहीच फरक पडलेला नाही, त्यांची झीज झालेली नाही.

प्लॅटिनमची नाणी पाडतात, त्यापासून दागिने, शोभेच्या वस्तू, कलाकुसरीचे साहित्य घडविले जाते.

प्लॅटिनम सोन्यापेक्षा कितीतरी महाग धातू असून याच्या किमती स्थिर राहत नसल्याने अनेक क्षेत्रांतून वापर कमी जास्त होत असतो. पण उच्च वितळणबिंदू व रासायनिक रोधकता या गुणांमुळे वैद्यकीय क्षेत्रासह अनेक क्षेत्रात प्लॅटिनमचा उपयोग होतो.