मनमोहन सिंग
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
डॉ.मनमोहन सिंह (मराठीत : मनमोहनसिंह ) (जन्म : गाह-पंजाब, आता पाकिस्तान, २६ सप्टेम्बर १९३२) हे २२ मे २००४पासून २६ मे २०१४पर्यन्त) भारताचे पंतप्रधान होते. हे १४वे पंतप्रधान होते. ते काँग्रेस पक्षाचे सदस्य असून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करतात. यापूर्वी ते इ.स. १९९१ साली पी.व्ही. नरसिंहराव मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री होते. त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली.[१]
मनमोहन सिंग | |
कार्यकाळ मे १९, इ.स. २००४ – मे २६, इ.स. २०१४ | |
राष्ट्रपती | प्रतिभा पाटील |
---|---|
जन्म | २६ सप्टेंबर, १९३२ गाह, पश्चिम पंजाब, ब्रिटिश भारत |
राष्ट्रीयत्व | भारत |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
पत्नी | गुरूशरण कौर |
अपत्ये | ३ |
धर्म | शीख |
आरम्भिक जीवन
संपादनमनमोहनसिंहांच्या वडिलांचे नाव गुरुमुखसिंह आणि आईचे नाव अमृतकौर. मनमोहन सिंह हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून शिक्षण घेतले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास विभागात काम करीत असताना, भारताचे तत्कालीन विदेश व्यापारमन्त्री ललित नारायण मिश्रा यांनी मनमोहनसिंहांची आपल्या खात्यात सचिव म्हणून नियुक्ती केली.[ संदर्भ हवा ]
जीवनक्रम
संपादन- सन १९५७ ते १९६५ - चन्दीगडमधील पंजाब विद्यापिठ प्राध्यापक.
- इ.स. १९६९-१९७१ - दिल्ली स्कूल ऑफ इकाॅनॉमिक्स या संस्थेत आन्तरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक.
- इ.स. १९७६ - दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मानद प्राध्यापक.
- इ.स. १९८२ से १९८५ भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर.
- इ.स. १९८५ से १९८७ – भारताचा योजना आयोगाचे उपाध्यक्ष.
- इ.स. १९९० से १९९१ - भारतीय पन्तप्रधानाचे आर्थिक सल्लागार.
- इ.स. १९९१ - नरसिंह राव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारमध्ये अर्थमन्त्री.
- इ.स. १९९१ – आसाममधून राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले.
- इ.स. १९९५ – दुसऱ्या वेळी राज्यसभा सदस्य
- इ.स. १९९६ - दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक
- इ.स. १९९९ - दक्षिण दिल्लीमधून लोकसभा निवडणूक लढले पण त्यात हरले.
- इ.स. २००१ – तिसऱ्या वेळी राज्यसभा सदस्य आणि विरोधी पक्ष नेता
- इ.स. २००४ – भारताचे पन्तप्रधान
या शिवाय त्यांनी आन्तरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आशियायी विकास बँक यांच्या विकासांत महत्त्वाचे योगदान दिले आहे.[ संदर्भ हवा ]
पहा : भारताचे अर्थमन्त्री
मनमोहन सिंह यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके
संपादन- The Accidental Prime Minister : मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंह’ (मूळ लेखक : संजय बारू. The Accidental Prime Minister याच नावाने पुस्तकाचा मराठी अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे.)
- अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंह : प्रशासक ते पंतप्रधान ... एक वाटचाल (अनुवादित, अविनाश कोल्हे)
- डॉ. मनमोहनसिंह - एक वादळी पर्व (लेखक : सुजय शास्त्री; ग्रंथाली प्रकाशन)[ संदर्भ हवा ]
चित्रपट
संपादन- दि ॲक्सिडेण्टल प्राईम मिनिस्टर (हिंदी, दिग्दर्शक : विजय गुट्टे)[ संदर्भ हवा ] : या चित्रपटात अनुपम खेर यांनी मनमोहनसिंहांची भूमिका केली आहे. ह्या सिनेमात काँग्रेसवर आणि गान्धी घराण्यावर टीका केलेली असल्याने या सिनेमाच्या प्रदर्शनाला काँग्रेस पक्षाने विरोध केला होता.
काँग्रेसचे युवा नेते आणि महाराष्ट्र विधान परिषद आमदार सत्यजित तांबे यांनी या सिनेमाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता, परन्तु ११ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला व ५ मे २०१९ रोजी दूरचित्रवाणीवर आला.
संदर्भ
संपादन- ^ "जब मनमोहन सिंह को अचानक आया नरसिम्हा राव का फोन, बोले- वहां क्या कर रहे हो, घर जाओ और तैयार होकर राष्ट्रपति भवन आओ". २७ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.