यशवंत सिन्हा

भारतीय राजकारणी

यशवंत सिन्हा ( नोव्हेंबर ६, इ.स. १९३७) हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.त्यांनी इ.स. १९६० मध्ये भारतीय प्रशासनीय सेवेत (आय.ए.एस) प्रवेश केला आणि ते इ.स. १९८४ पर्यंत सेवेत होते. त्यानंतर त्यांनी सेवेचा राजीनामा देऊन जनता पक्षात प्रवेश केला. इ.स. १९८६ मध्ये त्यांची जनता पक्षाचे सरचिटणिस म्हणून नियुक्ती झाली. इ.स. १९८८ मध्ये जनता दलाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी त्या पक्षात प्रवेश केला.तसेच त्याच वर्षी ते राज्यसभेवर निवडून गेले. इ.स. १९९० मध्ये जनता दलात फूट पडल्यानंतर त्यांनी चंद्रशेखर यांच्या समाजवादी जनता दलात प्रवेश केला.त्यांनी चंद्रशेखर यांच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. इ.स. १९९३ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ते इ.स. १९९५-इ.स. १९९६ या काळात बिहार विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकींमध्ये त्यांनी झारखंड राज्यातील हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री म्हणून काम बघितले. जून इ.स. २००९ मध्ये पंधराव्या लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला पक्षाच्या केंद्रिय नेतृत्वाला जबाबदार ठरवत पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला.

यशवंत सिन्हा
मागील:
जसवंत सिंग
भारतीय परराष्ट्रमंत्री
जुलै १, इ.स. २००२मे २२, इ.स. २००४
पुढील:
नटवर सिंग