भारताचे परराष्ट्रमंत्री

(परराष्ट्रमंत्री या पानावरून पुनर्निर्देशित)

भारताचा परराष्ट्रमंत्री किंवा भारताचा विदेशमंत्री हा भारत देशाच्या केंद्र सरकारमधील एक प्रमुख कॅबिनेट मंत्री व भारतीय परराष्ट्रमंत्रालयाचा प्रमुख आहे. भारत सरकारमधील सर्वात महत्त्वाच्या पदांपैकी एक असलेला परराष्ट्रमंत्री हा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी व देशाची परराष्ट्र धोरणे ठरवण्यासाठी जबाबदार आहे.

भारताचे परराष्ट्रमंत्री
Minister of External Affairs
विद्यमान
सुब्रमण्यन जयशंकर

३० मे, २०१९ पासून
परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार
नियुक्ती कर्ता राष्ट्रपती (पंतप्रधानाच्या सल्लानुसार)
निर्मिती २ सप्टेंबर १९४६
पहिले पदधारक जवाहरलाल नेहरू
संकेतस्थळ परराष्ट्र मंत्रालयाचे संकेतस्थळ

परराष्ट्रमंत्री हा संसदेच्या लोकसभा अथवा राज्यसभेचा विद्यमान सदस्य असणे बंधनकारक असून त्याची निवड पंतप्रधानाद्वारे व पदनियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते. जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले परराष्ट्रमंत्री होते. ते ह्या पदावर १७ वर्षे राहिले.

परराष्ट्रमंत्र्यांची यादी

संपादन
नाव चित्र कार्यकाळ राजकीय पक्ष
(आघाडी)
पंतप्रधान
जवाहरलाल नेहरू   २ सप्टेंबर १९४६ २७ मे १९६४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जवाहरलाल नेहरू
गुलझारीलाल नंदा २७ मे १९६४ ९ जून १९६४ गुलझारीलाल नंदा
(कार्यवाहू)
लाल बहादूर शास्त्री   ९ जून १९६४ १७ जुलै १९६४ लाल बहादूर शास्त्री
सरदार स्वरणसिंग १८ जुलै १९६४ १४ नोव्हेंबर १९६६ लाल बहादूर शास्त्री
इंदिरा गांधी
एम.सी. छगला १४ नोव्हेंबर १९६६ ५ सप्टेंबर १९६७ इंदिरा गांधी
इंदिरा गांधी   ६ सप्टेंबर १९६७ १३ फेब्रुवारी १९६९
दिनेश सिंग १४ फेब्रुवारी १९६९ २७ जून १९७०
सरदार स्वरणसिंग २७ जून १९७० १० ऑक्टोबर १९७४
यशवंतराव चव्हाण १० ऑक्टोबर १९७४ २४ मार्च १९७७
अटलबिहारी वाजपेयी   २६ मार्च १९७७ २८ जुलै १९७९ जनता पक्ष मोरारजी देसाई
श्याम नंदन प्रसाद मिश्रा २८ जुलै १९७९ १३ जानेवारी १९८० जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) चरण सिंग
पी.व्ही. नरसिंह राव   १४ जानेवारी १९८० १९ जुलै १९८४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इंदिरा गांधी
इंदिरा गांधी   १९ जुलै १९८४ ३१ ऑक्टोबर १९८४
राजीव गांधी   ३१ ऑक्टोबर १९८४ २४ सप्टेंबर १९८५ राजीव गांधी
बलीराम भगत २५ सप्टेंबर १९८५ १२ मे १९८६
पी. शिवशंकर १२ मे १९८६ २२ ऑक्टोबर १९८६
नारायण दत्त तिवारी २२ ऑक्टोबर १९८६ २५ जुलै १९८७
राजीव गांधी   २५ जुलै १९८७ २५ जून १९८८
पी.व्ही. नरसिंह राव   २५ जून १९८८ २ डिसेंबर १९८९
विश्वनाथ प्रताप सिंग   २ डिसेंबर १९८९ ५ डिसेंबर १९८९ जनता दल
(तिसरी आघाडी)
विश्वनाथ प्रताप सिंग
इंदर कुमार गुजराल   ५ डिसेंबर १९८९ १० नोव्हेंबर १९९०
विद्याचरण शुक्ला २१ नोव्हेंबर १९९० २० फेब्रुवारी १९९१ समाजवादी जनता पक्ष
(तिसरी आघाडी)
चंद्रशेखर
माधवसिंह सोळंकी २१ जून १९९१ ३१ मार्च १९९२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पी.व्ही. नरसिंह राव
पी.व्ही. नरसिंह राव   ३१ मार्च १९९२ १८ जानेवारी १९९३
दिनेश सिंग १८ जानेवारी १९९३ १० फेब्रुवारी १९९५
प्रणव मुखर्जी   १० फेब्रुवारी १९९५ १६ मे १९९६
सिकंदर बख्त २१ मे १९९६ १ जून १९९६ भारतीय जनता पक्ष अटलबिहारी वाजपेयी
इंदर कुमार गुजराल   १ जून १९९६ १८ मार्च १९९८ जनता दल
(संयुक्त आघाडी)
एच.डी. देवेगौडा
इंदर कुमार गुजराल
अटलबिहारी वाजपेयी   १९ मार्च १९९८ ५ डिसेंबर १९९८ भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
अटलबिहारी वाजपेयी
जसवंत सिंग   ५ डिसेंबर १९९८ २३ जून २००२
यशवंत सिन्हा   १ जुलै २००२ २२ मे २००४
नटवर सिंग   २२ मे २००४[] ६ नोव्हेंबर २००५[] भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(संयुक्त पुरोगामी आघाडी)
मनमोहन सिंग
मनमोहन सिंग   ६ नोव्हेंबर २००५ २४ ऑक्टोबर २००६
प्रणव मुखर्जी   २४ ऑक्टोबर २००६[] २२ मे २००९
एस.एम. कृष्णा   २२ मे २००९ २६ ऑक्टोबर २०१२
सलमान खुर्शीद   २८ ऑक्टोबर २०१२ २६ मे २०१४
सुषमा स्वराज   २६ मे, २०१४ ३० मे, २०१९ भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
नरेंद्र मोदी
सुब्रह्मण्यम जयशंकर   ३० मे, २०१९ विद्यमान भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
नरेंद्र मोदी

संदर्भ

संपादन
  1. ^ Rediff.com dated २२ मे २००४, accessed २५ ऑक्टोबर २००
  2. ^ BBC News[permanent dead link] dated ७ नोव्हेंबर २००५, accessed २५ ऑक्टोबर २००
  3. ^ The Hindu Archived 2006-11-09 at the Wayback Machine. dated २५ ऑक्टोबर २००६, accessed २५ ऑक्टोबर २००६.

बाह्य दुवे

संपादन