डॅलस

(डॅल्लास, टेक्सास या पानावरून पुनर्निर्देशित)

डॅलस हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे व अमेरिकेमधील नवव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. सुमारे ११.९८ लाख लोकसंख्या असलेले हे शहर ६४.७७ लाख वस्तीच्या व अमेरिकेमधील चौथ्या क्रमांकाच्या डॅलस-फोर्ट वर्थ महानगरामधील प्रमुख शहर आहे.[][][] ३७४ अब्ज डॉलर इतकी उलाढाल असलेली डॅलसची अर्थव्यवस्था अमेरिकेमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.[]

डॅलस
Dallas
अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील शहर
ध्वज
चिन्ह
डॅलस is located in टेक्सास
डॅलस
डॅलस
डॅलसचे टेक्सासमधील स्थान
डॅलस is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
डॅलस
डॅलस
डॅलसचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 32°46′58″N 96°48′14″W / 32.78278°N 96.80389°W / 32.78278; -96.80389

देश Flag of the United States अमेरिका
राज्य टेक्सास
स्थापना वर्ष फेब्रुवारी २, इ.स. १८५६
क्षेत्रफळ ९९७.१ चौ. किमी (३८५.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४३० फूट (१३० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ११,९७,८१६
  - घनता १,४२७.४ /चौ. किमी (३,६९७ /चौ. मैल)
  - महानगर ६४,७७,३१५
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
www.dallascityhall.com


टेक्सासच्या ईशान्य भागात इ.स. १८४१ साली स्थापन झालेले डॅलस शहर खनिज तेलकापसाचे मोठे व्यापार व वाहतूक केंद्र म्हणून वर आले. सध्या बँकिंग, दूरध्वनी, उर्जा, आरोग्यसेवा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इत्यादी वैविध्यपूर्ण उद्योगांचे महत्त्वाचे केंद्र असलेले डॅलस एक जागतिक शहर आहे.

इतिहास

संपादन

भूगोल

संपादन

डॅलस शहर टेक्सासच्या ईशान्य भागात ९९७ वर्ग किमी एवढ्या क्षेत्रफळाच्या भागावर वसले आहे.

हवामान

संपादन

अमेरिकेच्या दक्षिण भागातील इतर स्थानांप्रमाणे येथील हवामान देखील उष्ण व रुक्ष आहे.

डॅलस/फोर्ट वर्थ विमानतळ साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °फॅ (°से) 88
(31)
95
(35)
97
(36)
100
(38)
103
(39)
112
(44)
111
(44)
111
(44)
110
(43)
100
(38)
89
(32)
89
(32)
112
(44)
सरासरी कमाल °फॅ (°से) 56.8
(13.8)
60.8
(16)
68.7
(20.4)
76.7
(24.8)
84.2
(29)
91.6
(33.1)
96.0
(35.6)
96.4
(35.8)
88.7
(31.5)
78.5
(25.8)
67.1
(19.5)
57.5
(14.2)
76.92
(24.96)
सरासरी किमान °फॅ (°से) 37.3
(2.9)
41.1
(5.1)
48.5
(9.2)
56.2
(13.4)
65.4
(18.6)
72.8
(22.7)
76.7
(24.8)
76.8
(24.9)
69.0
(20.6)
58.2
(14.6)
47.6
(8.7)
38.5
(3.6)
57.34
(14.09)
विक्रमी किमान °फॅ (°से) −3
(−19)
2
(−17)
11
(−12)
30
(−1)
39
(4)
53
(12)
56
(13)
57
(14)
36
(2)
26
(−3)
17
(−8)
1
(−17)
−3
(−19)
सरासरी वर्षाव इंच (मिमी) 2.06
(52.3)
2.59
(65.8)
3.49
(88.6)
3.07
(78)
4.92
(125)
4.11
(104.4)
2.21
(56.1)
1.87
(47.5)
2.84
(72.1)
4.79
(121.7)
2.88
(73.2)
2.74
(69.6)
37.57
(954.3)
सरासरी हिमवर्षा इंच (सेमी) 0.5
(1.3)
0.6
(1.5)
0.1
(0.3)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0.3
(0.8)
1.5
(3.9)
सरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.01 in) 6.7 6.5 7.8 6.6 9.5 7.9 4.8 4.5 5.4 7.6 6.7 6.8 80.8
सरासरी हिमवर्षेचे दिवस (≥ 0.1 in) 0.5 0.4 0.2 0 0 0 0 0 0 0 0.1 0.3 1.5
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 182.9 180.8 226.3 237.0 257.3 297.0 331.7 303.8 246.0 229.4 183.0 173.6 २,८४८.८
स्रोत #1: National Weather Service (normals from 1971–2000) [],
स्रोत #2: HKO (sun hr, 1961–1990) []

जनसांख्यिकी

संपादन
ऐतिहासिक लोकसंख्या
वर्ष लोक. ±%
इ.स. १८६० ६७८
इ.स. १८७० ३,००० +३४२%
इ.स. १८८० १०,३५८ +२४५%
इ.स. १८९० ३८,०६७ +२६७%
इ.स. १९०० ४२,६३९ +१२%
इ.स. १९१० ९२,१०४ +११६%
इ.स. १९२० १,५८,९७६ +७२%
इ.स. १९३० २,६०,४७५ +६३%
इ.स. १९४० २,९४,७३४ +१३%
इ.स. १९५० ४,३४,४६२ +४७%
इ.स. १९६० ६,७९,६८४ +५६%
इ.स. १९७० ८,४४,४०१ +२४%
इ.स. १९८० ९,०४,०७८ +७%
इ.स. १९९० १०,०६,८७७ +११%
इ.स. २००० ११,८८,५८० +१८%
इ.स. २०१० ११,९७,८१६ +०%
[][]

२०१० सालच्या जनगणनेनुसार डॅलसची लोकसंख्या ११,९७,८१६ इतकी होती. टेक्सासमधील इतर शहरांप्रमाणे येथे देखील मेक्सिकन संस्कृतीचा प्रभाव जाणवतो. येथील ३५.६ टक्के लोक लॅटिन अमेरिकन वंशाचे आहेत. डॅलस महानगरामध्ये अनिवासी भारतीय लोक देखील मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाले आहेत.

अर्थव्यवस्था

संपादन

डॅलस हे टेक्सास व अमेरिकेतील एक मोठे आर्थिक केंद्र आहे. येथील अर्थव्यवस्था बहुरंगी असून सेवा क्षेत्रावर अधिक भर आहे. शून्य आयकर, व्यापारासाठी पोषक वातावरण इत्यादी टेक्सास राज्याच्या धोरणांमुळे तसेच स्वस्त मजूर वर्ग मुबलक प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे डॅलस क्षेत्राची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढली आहे. अमेरिकेच्या उद्योगाचा चेहरा अवजड उत्पादनापासून सेवेकडे बदलत चालला असल्यामुळे देशाच्या पूर्व व उत्तर भागातील अनेक शहरांचे महत्त्व कमी होत आहे व दक्षिण भागातील इतर शहरांप्रमाणे डॅलसला देखील ह्याचा लाभ झाला आहे.

अमेरिकेमधील सर्वात मोठ्या ५०० कंपन्यांपैकी १२ कंपन्यांची मुख्यालये डॅलस शहरात तर २० कंपन्यांची मुख्यालये डॅलस महानगर क्षेत्रात आहेत. एटी अँड टी, टेक्सास इंस्ट्रूमेंट्स, साउथवेस्ट एअरलाईन्स, एक्झॉनमोबिल इत्यादी बलाढ्य कंपन्यांची प्रमुख कार्यालये डॅलस परिसरात आहेत.

अमेरिकेतील १४ अब्जाधीश डॅलसमध्ये राहतात. ह्या बाबतीत डॅलसचा जगात सहावा क्रमांक लागतो.

वाहतूक

संपादन
 
डॅलसमधील पाच पदरी इंटरचेंज

अमेरिकेमधील इंटरस्टेट महामार्ग २०, इंटरस्टेट महामार्ग ३०, इंटरस्टेट महामार्ग ३५इंटरस्टेट महामार्ग ४५ हे चार प्रमुख व लांब पल्ल्याचे महामार्ग डॅलसमध्ये मिळतात. ह्यांव्यतिरिक्त डॅलसला इतर उपनगरांसोबत जोडणारे इतर २० द्रुतगती महामार्ग (फ्रीवे) डॅलसमध्ये आहेत.

डॅलस व फोर्ट वर्थ ह्यांच्या मध्यात असलेला डॅलस/फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळ हा टेक्सासमधील सर्वात मोठा जगातील सहाव्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे. अमेरिकन एअरलाईन्ससाउथवेस्ट एअरलाईन्स ह्या अमेरिकेमधील प्रमुख विमान कंपन्यांची मुख्य कार्यालये व वाहतूक केंद्रे येथेच आहेत.

खालील चार व्यावसायिक संघ डॅलस महानगरामध्ये स्थित आहेत. अमेरिकेमधील चारही मोठ्या खेळांमधील व्यावसायिक संघ असलेले डॅलस हे १२ पैकी एक शहर आहे.

संघ खेळ लीग स्थान स्थापना
डॅलस काउबॉईज अमेरिकन फुटबॉल नॅशनल फुटबॉल लीग काउबॉईज स्टेडियम १९६०
डॅलस मॅव्हेरिक्स बास्केटबॉल नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन अमेरिकन एअरलाईन्स सेंटर १९८०
डॅलस स्टार्स आइस हॉकी नॅशनल हॉकी लीग अमेरिकन एरलाइन्स सेंटर १९९३
टेक्सास रेंजर्स बेसबॉल मेजर लीग बेसबॉल रेंजर्स पार्क १९७२

शहर रचना

संपादन
डॅलस शहर
डॅलस शहर

जुळी शहरे

संपादन

खालील सात शहरे डॅलसची जुळी शहरे आहेत.

संदर्भ

संपादन
  1. ^ U.S. Census Bureau table of metropolitan statistical areas
  2. ^ Wikipedia article on metropolitan statistical areas en:Table of United States Metropolitan Statistical Areas#cite note-PopEstCBSA-2
  3. ^ "Census: DFW adds more than 146,000 people". 2010-05-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 1, 2010 रोजी पाहिले.
  4. ^ "Gross Metropolitan Product". Greyhill Advisors. 7 October 2011 रोजी पाहिले.
  5. ^ "Dallas/Fort Worth - Normal, Means, and Extremes". National Weather Service Fort Worth. 2018-08-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-04-16 रोजी पाहिले.
  6. ^ "Climatological Normals of Dallas". Hong Kong Observatory. 2010-08-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-05-12 रोजी पाहिले.
  7. ^ साचा:Handbook of Texas By Jackie McElhaney and Michael V. Hazel. 1860 & 1870 populations.
  8. ^ युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो - Dallas population in 1880 (pg.40), 1890 (pg.3), 1900 (pg.4), 1910 (pg.3), 1920 (pg.79), 1930 (pg.68), 1940 (pg.106), 1950 (pg.106), 1960 (pg.23), 1970 (pg.12), 1980 (pg.38), 1990 (pg.114), [१]. Retrieved 20 November 2006.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: