चर्चा:महाराष्ट्रात कोविड-१९ महामारी

@अभय नातू: सध्याच्या करोना रोगाच्या साथीबद्दलचा हा लेख सतत अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतात महाराष्ट्र राज्य हॉट स्पॉट झालेले असल्यामुळे हा विषय महत्त्वाचा आहे. मराठी विकीवर कुठेतरी ठळकपणे हा लेख दाखवण्याचा जरूर विचार करावा, ही विनंती. त्या दृष्टीने अजून काही बदल करणे आवश्यक असल्यास सुचवावे. जमेल / वेळ मिळेल त्यानुसार सूचना अंमलात आणण्याचा प्रयत्न करेन. इतरही सक्रिय सदस्य या कामात सहभागी होतील, अशी आशा आहे. धन्यवाद!
संदर्भातील एक त्रुटी कशामुळे आली, लक्षात आले नाही. त्यासाठी मदत करावी, ही विनंती. --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १७:५३, ५ एप्रिल २०२० (IST)Reply

तुमच्याशी सहमत आहे परंतु असा विषय ठळकपणे दाखविण्याआधी त्यातील मजकूर वैद्यकीय दृष्ट्या एकदा पडताळणे आवश्यक आहे. एखाद्या डॉक्टरांनी हा नजरेखाली घातल्यास, किंवा सगळ्या वैद्यकीय मजकूरास संदर्भ असल्याचे पडताळल्यावर हा लेख मुखपृष्ठावर आणता येईल.
अभय नातू (चर्चा) २१:३६, ५ एप्रिल २०२० (IST)Reply
ता.क. लेखात संदर्भ असल्याने मुखपृष्ठावर उदयोन्मुख लेख येथे आणीत आहे.
झाले.
या लेखात वैद्यकीय मजकूर फारसा नसून घटनाक्रम आणि सांख्यिकी आहे.उदयोन्मुख लेख म्हणून आणल्याबद्दल धन्यवाद!

संदर्भातील त्रुटी काढल्याबद्दलसुद्धा धन्यवाद! --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) ०९:४७, ६ एप्रिल २०२० (IST)Reply

@अभय नातू: या लेखात एका व्यक्तीने लॉग इन न करता आकडेवारीत काही बदल केल्याचे दिसते. तरी लेख योग्य त्या पातळीला संरक्षित करावा ही विनंती. धन्यवाद! --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १०:१७, ९ एप्रिल २०२० (IST)Reply

झाले. -- अभय नातू (चर्चा) १०:२३, ९ एप्रिल २०२० (IST)Reply

@Sachinvenga: आपण या लेखात उपयुक्त भर घालत असल्याबद्दल धन्यवाद! लेखाचा विषय संवेदनशील असल्यामुळे सगळी विधाने संदर्भांसह जोडण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत केलेला आहे.आपणही आपल्या विधानांना संदर्भ द्यावेत.नंतर संदर्भ शोधून जोडणे कठीण जाते.'निदान आणि तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळा' या यादीला संदर्भ जोडण्याची विनंती आहे. धन्यवाद! --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १०:२२, ९ एप्रिल २०२० (IST)Reply

@Sachinvenga: कोरोनाव्हायरस हा एक स्वतंत्र लेख आधीच लिहीलेला असून त्यातील माहिती या लेखात पुन्हा लिहीण्याची गरज नाही, असे वाटते. या लेखातील आलेख अद्ययावत करण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे. आपल्याला शक्य असल्यास ते करावे, ही विनंती. धन्यवाद! --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) ०९:१९, ११ एप्रिल २०२० (IST)Reply

तक्ता

@Sachinvenga आणि Tiven2240:, लेखाच्या या आवृत्तीतील तक्ता नीट दिसत आहे. आत्ताचा तक्ता दुरुस्त होईपर्यंत हा पूर्ववत करायला हवे असे वाटते. वाचकाला सोयीचे होईल. --सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:२९, १७ एप्रिल २०२० (IST)Reply

@सुबोध कुलकर्णी: असे करता येते का ते माहीत नाही.--Sachinvenga (चर्चा) १२:३४, १७ एप्रिल २०२० (IST)Reply
हे एक मीडियाविकी बग आहे. त्रुटी संदेश काढता येईल परंतु जर असे केले तर साचा झाकता येणार नाही. ते खूप लांब दिसून येते --Tiven2240 (चर्चा) १२:५१, १७ एप्रिल २०२० (IST)Reply

सांख्यिकी

रोज बदलणाऱ्या सांख्यिकी update करणे हे मोठे काम झाले आहे. या संदर्भात इंग्लिश विकि प्रमाणे - {As of|12 April 2021|post=,} साचे करता आले तर काम सोपे होइल असे वाटते. तरी याचा या विषयातील तज्ञांनी आभ्यास करुन असे साचे मराठीत लावण्याचा विचार करावा असे वाटते. [en:Coronavirus disease 2019] येथे असे साचे आहेत.--Sachinvenga (चर्चा) १९:०३, १७ एप्रिल २०२० (IST)Reply

@Sachinvenga: हे साचे आपोआप चालत नाही त्यालाही update करायला लागते. सध्या मी {{Cases in 2019–20 coronavirus pandemic}} आयात केले आहे त्याला लेखात वापरता येईल. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) २१:४३, १७ एप्रिल २०२० (IST)Reply

चित्र

File:Symptoms of coronavirus disease 2019 3.0.svg मराठीत भाषांतर करता आली तर आधिक चांगले होइल, हिंदी भाषेत आहे.--Sachinvenga (चर्चा) १९:१५, १७ एप्रिल २०२० (IST) cc: @Tiven2240: cc: @Usernamekiran:Reply

@Sachinvenga: मेडिकल शब्द असल्यामुळे काही अडचणी येतात. भाषांतर दिल्यावर लवकर तयार करण्यात येणार. @, अभय नातू, आणि Sandesh9822: कृपया मदत करावे अशी विनंती --Tiven2240 (चर्चा) २१:४९, १७ एप्रिल २०२० (IST)Reply
  • Common Symptoms -
  • Fever - ताप ८८ %
  • Dry cough - कोरडा खोकला ६८ %
  • Fatigue - थकवा ३८%
  • UnCommon Symptoms -
  • Headache - डोकेदुखी %
  • Loss of smell- गंध कमी होणे
  • Sore Throat - घसा खवखवणे
  • Coughing up sputum - ओला खोकला
  • Shortness of breath - धाप लागणे
  • Pain in muscles - स्नायू वेदना
  • chills - थंडी वाजून येणे
  • Nauses & or vomiting - मळमळ आणि उलट्या
  • Diarrhea - अतिसार

In severe disease-

  • Difficulty waking - जागे होण्यास त्रास.
  • Confusion - गोंधळुन जाणे.
  • Bluish face or lips - चेहरा किंवा ओठ निळे होणे
  • Coughing up blood - रक्त खोकला
  • Persistent chest pain - सतत छातीत दुखणे
  • Decreased white blood cells - पांढर्‍या रक्त पेशींची कमी
  • Kidney failure - मूत्रपिंड निकामी
  • high fever - जास्तीचा ताप

@Tiven2240:--Sachinvenga (चर्चा) २२:३४, १७ एप्रिल २०२० (IST)Reply

Social distancing

@अभय नातू:, @ज्ञानदा गद्रे-फडके:,@Tiven2240: @सुबोध कुलकर्णी: @:, @Aditya tamhankar:, @Vikrantkorde: , @Sandesh9822:, @आर्या जोशी:.

तांत्रिक साहाय्य हवे असले की आवश्यक साद द्या. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) २०:५७, १८ एप्रिल २०२० (IST)Reply

महाराष्ट्राला तीन झोन

@Tiven2240:

  • महाराष्ट्राला तीन झोनमध्ये वाटण्यात आले आहेत. असा नकाशा करता येते का पहा.
* रेड झोन: मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर, रायगड, सांगली आणि औरंगाबाद.
* ऑरेंज झोन: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम आणि गोंदिया.
* ग्रीन झोन: धुळे, नंदुरबार, सोलापूर, परभणी, नांदेड़, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरौली.--Sachinvenga (चर्चा) १५:१७, १९ एप्रिल २०२० (IST)Reply

नावात बदल

@अभय नातू:, @ज्ञानदा गद्रे-फडके:,@Phadke09:,@Tiven2240:

  • २०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक या लेखाचे नाव २०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना महामारी असे करावे का? en:2020 coronavirus pandemic in Maharashtra ला साजेसे होइल तसेच काल एका दिवसात ५५० रुग्ण वाढले असल्याने आता त्याला महामारी हा शब्द योग्य आहे असे वाटते. कृपया आपला अभिप्राय द्यावा.--Sachinvenga (चर्चा) ०९:४९, २० एप्रिल २०२० (IST)Reply

Pandemic साठी महासाथ हा शब्द योग्य वाटतो. तो अनेक ठिकाणी मराठीत वापरला जात आहे. पण राज्यात Outbreak या अर्थाने उद्रेक हा शब्द योग्य आहे. महामारी हा शब्द सध्या हिंदी माध्यमे वापरत आहेत असे शोध घेतले असता दिसते.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:४७, २० एप्रिल २०२० (IST)Reply

जे रोग संसर्गजन्य साथीचा असुन देशभर, खंडभर किंवा संपुर्ण जगभर पसरतात त्यांना en:Pandemic किंवा महामारी असे म्हणतात. जागतीक आरोग्य संधट्नेने सुद्धा ह्याला जागतिक महामारी घोषित केले आहे.[१], या एका दिवसात ५५० रुग्ण वाढले असताना याला महामारी शब्दच योग्य आहे.--Sachinvenga (चर्चा) १४:४५, २० एप्रिल २०२० (IST)Reply
'महामारी' हा शब्द सध्या मराठी माध्यमेसुद्धा काही प्रमाणात वापरताना दिसली तरीही हा हिंदी शब्दच आहे. शासन व्यवहारासाठी असलेल्या शासनाच्या मराठी विभागाच्या शब्दकोशात पाहिले असता pandemic या शब्दासाठी 'सार्वत्रिक साथ', 'जगद्व्यापी साथ', 'विश्वव्यापी साथ' असे मराठी प्रतिशब्द दिलेले आहेत. लेखाचे नाव बदलायचेच झाल्यास 'सार्वत्रिक साथ' हा शब्द योग्य वाटतो. [२]

--ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १६:२२, २० एप्रिल २०२० (IST)Reply

'महामारी' हा शब्द मराठी माध्यमे मोठ्या प्रमाणात वापरताना दिसतात यास कारण असे की महामारी हा फक्त हिंदी शब्द नसुन तो राजभाषेत नियमीत पणे वापरला जाणरा मराठी शब्द आहे. पत्र सुचना कर्यालय en:Press Information Bureau जी भारत सरकारची एक नोडल एजन्सी आहे व नॅशनल मीडिया सेंटर, नवी दिल्ली येथेल कर्यालयलयातुन भरतातील व जगातील सर्व इलेक्ट्रॉनिक आणि व्रत्तपत्र माध्यमांना सरकारी योजना, धोरणे, कार्यक्रमाच्या पुढाकार आणि यशाची माहिती प्रसारित करते. त्यांनी भारत सरकारचे जाहीर केलेले काही निर्णय पुढे देत आहे. पत्र सुचना कर्यालयाला मराठी भाषेतील शब्दांचे अज्ञान असेल अशी शक्यता वाटत नाही. तरी कृपया याकडे लक्ष द्यावे. व आपल्या निर्णयाचा विचार करावा. धन्यवाद!!--Sachinvenga (चर्चा) २०:५३, २० एप्रिल २०२० (IST)Reply
Pandemic यासाठी जागतिक साथ असे शब्द योग्य वाटते. --Tiven2240 (चर्चा) २३:३७, २० एप्रिल २०२० (IST)Reply
माझे मत काहीसे सुबोध कुलकर्णींशी जुळते आहे. ही (महा)साथ/महामारी जगभर पसरत आहे परंतु प्रादेशिक context[मराठी शब्द सुचवा]मध्ये उद्रेक हा शब्द चपखल आहे.
२०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना महामारी येथून २०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक असे पुनर्निर्देशन केले आहे.
जर महामारी हाच शब्दप्रयोग बरोबर वाटत असला तर हे पुनर्निर्देशन कधीही बदलता येईल.
अभय नातू (चर्चा) ०८:३६, २३ एप्रिल २०२० (IST)Reply

घटनाक्रम विभाग स्वतंत्र लेखात हलविणे

@ज्ञानदा गद्रे-फडके, अभय नातू, Sachinvenga, Tiven2240, जाधव प्रियांका, आणि आर्या जोशी: २०२० कोरोना महामारीचा महाराष्ट्रातील घटनाक्रम हा स्वतंत्र लेख तयार झाल्याने या लेखातील सदर विभाग तेथे समाविष्ट करावा असे वाटते.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:४५, २७ एप्रिल २०२० (IST)Reply

ये लेखात घटनाक्रमातील महत्वाचे टप्पे असलेल्या विभागात ठेवून २०२० कोरोना महामारीचा महाराष्ट्रातील घटनाक्रम या लेखात विस्तृत घटनाक्रम द्यावा. २०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक लेखातील घटनाक्रम विभागात {{मुख्य लेख}} साचा वापरुन २०२० कोरोना महामारीचा महाराष्ट्रातील घटनाक्रमकडे दुवा द्यावा.
अभय नातू (चर्चा) १७:०४, २८ एप्रिल २०२० (IST)Reply
"महाराष्ट्रात कोविड-१९ महामारी" पानाकडे परत चला.