कोइंबतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ

(कोईंबतूर विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

कोइंबतूर विमानतळ (आहसंवि: CJBआप्रविको: VOCB) हा भारताच्या तामिळनाडू राज्यातील कोईंबतूर येथे असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ह्यास आधी पिलामेडू विमानतळ म्हणुन ओळखले जायचे. हे शहराच्या मध्ध्यापासुन १६ किमी अंतरावर आहे.

कोइंबतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ
கோயம்புத்தூர் பன்னாட்டு வானூர்தி நிலையம்
आहसंवि: CJBआप्रविको: VOCB
CJB is located in तमिळनाडू
CJB
CJB
तमिळनाडूमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा कोइंबतूर व लगतचे जिल्हे
स्थळ कोइंबतूर, तामिळनाडू, भारत
समुद्रसपाटीपासून उंची १,३२४ फू / ४०४ मी
गुणक (भौगोलिक) 11°01′48″N 077°02′36″E / 11.03000°N 77.04333°E / 11.03000; 77.04333
संकेतस्थळ एरपोर्टसैंडियाचे संकेतस्थळ(इंग्लिश मजकूर)
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०५/२३ ९,७६० २,९९० डांबरी धावपट्टी
सांख्यिकी (२००९ एप्रिल ते जुलै)
आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक ३३,०४३[]
आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक २८४[]
देशांतर्गत प्रवासी वाहतूक ३,४४,७९०[]
देशांतर्गत विमान वाहतूक ४,७६६[]
स्रोत: वर्ल्ड एरो डाटा[]

इतिहास

संपादन

कोइंबतूर विमानतळाने प्रथमतः १९४० च्या दशकात नागरी विमानतळ म्हणून काम सुरू केले.इंडियन एरलाइन्सने तेथे फोकर एफ२७, डग्लस डिसी-३,हॉकर सिडली या विमानांसह उड्डाणे केलीत.पूर्वीच्या दिवसात तेथे फक्त चेन्नई व मुंबई यासाठीच सेवा होती.कोचिन व बंगलोर उड्डाअणे नंतर सुरू करण्यात आलीत.१९८० च्या दशकाचे सुरुवातीस,तो विमानतळ बोइंग ७३७एरबस ए३२० अश्या अत्याधुनिक जेट विमानांना सोईचे व्हावे म्हणुन, धावपट्टी वाढविण्यासाठी बंद ठेवण्यात आला.तात्पुरत्या स्वरूपात,विमाने सुलुर विमानतळ वपरीत होती.धावपट्टीवाढविण्याचे काम झाल्यावर, १९८७ मध्ये,नवीन अग्रीय(टर्मिनल)सह सेवा पुर्ववत् करण्यात आली.१९९५ मध्ये, शारजा सेवा सुरू करण्यात आली व कोलंबोसिंगापूरसाठी २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय सेवा पुरविण्यात येउ लागली.

विमानतळ वास्तू

संपादन

कोइंबतूर विमानतळास सध्या एक विमानतळ अग्रीय (टर्मिनल) व दुसरे निर्माणाधीन आहे.[]

तेथे दोन विमानघरे आहेत- एक खाजगी वाहकांसाठी व दुसरे कोइंबतुर फ्लाईंग क्लब साठी. विमानतळ थांब्यातील गाळे हे जास्तीत जास्त सहा विमाने सामावू शकतात. तेथे एक अग्निशमन केंद्रही आहे.

विमानतळाची एक धावपट्टी ९,७६० फूट (२,९७० मी) लांबीची आहे. पूर्वी ती धावपट्टी ८,५०० फूट (२,६०० मी) लांबीची होती. धावपट्टीची लांबी वाढविल्यामुळे बोइंग ७३७एरबस ए३२०सारख्या अत्याधुनिक विमानांना सामावून घेणे शक्य आहे. येथे सध्या उपकरणाधारित अवतरण प्रणाली (इंस्ट्रुमेंट लॅंडिंग सिस्टीम) उभारण्यात येत आहे.[]

याशिवाय येथे धावपट्टीस समांतर खेचमार्ग (टॅक्सी-वे) बांधण्याचे प्रस्तावित आहे. याने विमानाचा धावपट्टी व्यापण्याचा कालावधी कमी होऊन धावपट्टीचा उपयोग अधिकाधिक विमानांच्या आवागमनासाठी करता येईल. सध्या विमानांना धावपट्टीवरच प्रथम चालवून मग उडविण्यात येते. या अधिक विमानाच्या थांब्यासाठी दोन गाळे अधिक वाढविण्याचाही बेत आहे. नवीन अग्रीयात सरक-दरवाजे, हवाई-पूल व सामान हाताळणीसाठीची आधुनिक प्रणाली, इ. आधुनिक सुविधा असतील.[]

विमानतळाचे आधुनिकीकरण व विस्तार

संपादन

विस्तारीत व आधुनिक केलेले विमानतळ अग्रीय आतापासून दोन वर्षांनी तयार होईल.

या प्रकल्पाच्या निविदेचे काम पूर्ण झाले असून विस्तारीकरण व आधुनिकीकरणासाठी रु. ७८ करोडच्या कामांचे ठेके देण्यात आलेले आहेत.संदर्भांच्या अटीनूसार, ठेका देण्याच्या दिनांकापासून २४ महिन्यात बांधकाम पूर्ण करावयाचे आहे. विस्तारीकरण प्रकल्पात, दोन मजली लोखंड व काचेच्या चौकटीत,चटई क्षेत्र हे ६,००० चौ.मि. पासून १४,००० चौ.मि. पर्यंत वाढविणे अंतर्भूत आहे.या प्रकल्पात,हवाई पूलाची उभारणी,सरकते जीने व चार उद्वहनाचा समावेश आहे.एकवेळची प्रवासी हाताळणीही सध्याच्या ३५० वरून दुप्पट होईल. अतिरिक्त आधारभूत संरचनेमुळे,ज्याचा खर्च रु.१.५० कोटी अपेक्षित आहे,सध्याची एकवेळेस ४० टन माल हाताळण्याची क्षमताही दुप्पट होण्याची अपेक्षा आहे.त्याचे काम सुरूही झाले आहे. झालर(अॲप्रन) विस्तार प्रकल्प, ज्याचे गुंतवणूक मुल्य रु. १२.५० करोड इतके आहे,त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे.या व्यतिरिक्त,रु. ३२ करोडचा समांतर खेच-मार्ग तयार करण्यासाठी प्रकल्प अहवाल सादर करण्यात आलेला आहे.[]

विमानतळाची नवीन अग्रयी इमारत

संपादन

तेथील संचालकांनी सांगीतले कि येणारे व जाणारे प्रत्येकी १५० प्रवासी ही ईमारत हाताळेल.लवकरच,सध्याची प्रवासी दिर्घिका मोठी व आधुनिक करण्यात येईल.येथे येण्यास राज्य महामार्ग खात्यातर्फे,पोहोच मार्ग व सेवा मार्गांचेही बांधकाम करण्यात आले आहे.[१०][११]

एकात्मिक अग्रयी ईमारत

संपादन

भा वि प्राधिकरणाने,६१३ एकर जागेची मागणी राज्य सरकारकडे केलेली आहे.या ईमारतीद्वारे, १२०० प्रवासी हाताळता येतील व याचा खर्च रु. २५० करोड राहील.राज्य सरकारने ती जमिन लवकरच देण्याचे मान्य केले आहे.[१२]

विमानसेवा व गंतव्यस्थान

संपादन
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर अरेबिया शारजा
एर कोस्टा बंगळूर, हैदराबाद, तिरुपती, विजयवाडा, जयपूर
एर इंडिया दिल्ली, कोळिकोड, मुंबई
इंडिगो भुवनेश्वर, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, मुंबई
जेट एरवेझ बंगळूर, चेन्नई, मुंबई
सिल्कएर सिंगापूर
स्पाइसजेट अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, मुंबई

मालवाहतूक

संपादन
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर इंडिया कार्गो दिल्ली,मुंबई,कोलकाता,बंगलोर,हैद्राबाद
ब्ल्यू डार्ट एव्हीएशन दिल्ली,मुंबई,कोलकाता,बंगलोर,हैद्राबाद

१७ नोव्हें. २००७:पार्किंगच्या गाळ्यात, १३० प्रवासी असलेल्या, दिल्लीस जाणाऱ्या स्पाईसजेट विमानाचा एक पंख तेथे उभा असलेल्या एर डेक्कनच्या विमानास जवळ-जवळ लागलाच होता.ते विमान वेळीच थांबविण्यात आले व अपघात टळला.[१३]

संदर्भ

संपादन
  1. ^ एरपोर्टस इंडियाचे संकेतस्थळ(इंग्लिश मजकूर) Archived 2010-09-19 at the Wayback Machine.
  2. ^ एरपोर्टस इंडियाचे संकेतस्थळ(इंग्लिश मजकूर) Archived 2010-09-19 at the Wayback Machine.
  3. ^ "एरपोर्टस इंडियाचे संकेतस्थळ(इंग्लिश मजकूर)" (PDF). 2010-09-19 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2010-07-25 रोजी पाहिले.
  4. ^ "एरपोर्टस इंडियाचे संकेतस्थळ(इंग्लिश मजकूर)" (PDF). 2010-09-19 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2010-07-25 रोजी पाहिले.
  5. ^ विमानतळ माहिती VOCB वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.
  6. ^ कोइंबतूर विमानतळाची नविन दृष्यता Archived 2010-12-20 at the Wayback Machine.(इंग्लिश मजकूर)
  7. ^ विमानतळ विस्ताराबद्दल हिंदू मधील एक लेख (इंग्लिश मजकूर)
  8. ^ विमानतळ विस्ताराबद्दल हिंदू मधील एक लेख(इंग्लिश मजकूर)
  9. ^ http://www.business-standard.com/india/storypage.php?autono=316509
  10. ^ http://www.thehindu.com/2010/06/20/stories/2010062058030100.htm
  11. ^ http://www.skyscrapercity.com/showpost.php?p=57692653&postcount=29
  12. ^ "संग्रहित प्रत". 2010-08-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-07-25 रोजी पाहिले.
  13. ^ http://www.thehindubusinessline.com/2007/11/18/stories/2007111851440500.htm

बाह्य दुवे

संपादन

वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती सप्टेंबर १८, २००६ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)

वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती जुलै १७, २००६ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)