ए.टी.पी. वर्ल्ड टूर मास्टर्स १०००

(ए.टी.पी. मास्टर्स टेनिस स्पर्धा या पानावरून पुनर्निर्देशित)

ए.टी.पी. वर्ल्ड टूर मास्टर्स १००० ही टेनिस खेळामधील असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्सचा भाग असलेल्या ९ पुरुष एकेरी व दुहेरी स्पर्धांची एक वार्षिक शृंखला आहे. ४ ग्रॅंड स्लॅमए.टी.पी. वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धांखालोखाल ह्या मास्टर्स स्पर्धा महत्त्वाच्या व मानाच्या समजल्या जातात. टेनिस श्रेणीमध्ये उच्च स्थानावर असणाऱ्या सर्व पुरुष टेनिस खेळाडूंना ह्या स्पर्धांमध्ये भाग घेणे अनिवार्य आहे.

२५ अजिंक्यपदे जिंकणारा रफायेल नदाल सध्या ह्या स्पर्धांमध्ये आघाडीचा एकेरी तर २५ वेळा जिंकणारा डॅनियेल नेस्टर हा दुहेरी टेनिस खेळाडू आहेत.

स्पर्धा संपादन

स्पर्धा देशा स्थान सुरुवात कोर्ट पृष्ठभाग मुख्य कोर्टची आसनक्षमता ड्रॉ गतविजेता बक्षीस रक्कम
इंडियन वेल्स मास्टर्स   अमेरिका इंडियन वेल्स, कॅलिफोर्निया 1987 हार्ड 16,100 96   रफायेल नदाल $5,244,125
मायामी मास्टर्स   अमेरिका मायामी, फ्लोरिडा 1985 हार्ड 13,300 96   अँडी मरे $5,185,625
मोंटे-कार्लो मास्टर्स   मोनॅको रोकूब्रुन-कॅप-मार्तिन, फ्रान्स 1897 क्ले 10,000 56   नोव्हाक जोकोविच €2,750,000
माद्रिद मास्टर्स   स्पेन माद्रिद 2002 क्ले 12,500 56   रफायेल नदाल €2,835,000
रोम मास्टर्स   इटली रोम 1930 क्ले 10,400 56   रफायेल नदाल €2,227,500
कॅनडा मास्टर्स   कॅनडा मॉंत्रियाल / टोरॉंटो 1881 हार्ड 11,700 / 12,500 56   रफायेल नदाल $3,218,700
सिनसिनाटी मास्टर्स   अमेरिका सिनसिनाटी 1899 हार्ड 11,600 56   रॉजर फेडरर $3,200,000
शांघाय मास्टर्स   चीन शांघाय 2009 हार्ड 15,000 56   नोव्हाक जोकोविच $3,240,000
पॅरिस मास्टर्स   फ्रान्स पॅरिस 1968 हार्ड (i) 14,000 48   दाविद फेरर €2,227,500

विक्रम संपादन

एकेरीमधील सर्वाधिक वेळा जिंकणारे १० टेनिस खेळाडू

# खेळाडू अजिंक्यपदे
1   रफायेल नदाल २५
2   इव्हान लेंडल २२
3   रॉजर फेडरर २१
4   जॉन मॅकएन्रो १९
5   जिमी कॉनर्स १७
6   आंद्रे अगासी १७
7   ब्यॉन बोर्ग १५
8   नोव्हाक जोकोविच १४
9   बोरिस बेकर १३
10   पीट सॅम्प्रास ११