इंदापूर तालुका
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
इंदापुर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका पुणे जिल्ह्याच्या आग्नेय दिशेला वसलेला आहे.
इंदापुर तालुका | |
---|---|
राज्य | महाराष्ट्र, भारत |
जिल्हा | पुणे |
जिल्हा उप-विभाग | बारामती |
मुख्यालय | इंदापुर |
प्रमुख शहरे/खेडी | इंदापुर,भिगवण |
तहसीलदार | श्रीकांत पाटील |
लोकसभा मतदारसंघ | बारामती लोकसभा मतदारसंघ |
विधानसभा मतदारसंघ | इंदापूर विधानसभा मतदारसंघ |
आमदार | दत्तात्रय भरणे |
तालुक्यातील गावे
संपादनबाळपुडी बांबडवाडी बांदेवाडी बंडगरवाडी (इंदापूर) बावडा (इंदापूर) बेडशिंगे बेळेवाडी (इंदापूर) भाडळवाडी भांडगाव भरणेवाडी भाट निमगाव भावडी (इंदापूर) भवानीनगर (इंदापूर) भिगवण भिगवणस्टेशन भोडानी बिजवाडी (इंदापूर) बिरगुंडवाडी बोराटवाडी बोरी (इंदापूर) चकटी चंदगाव चव्हाणवाडी (इंदापूर) चिखली (इंदापूर) दळज नंबर १ दळज नंबर २ दळज नंबर ३ डिकसळ (इंदापूर) गागरगाव गाळंदवाडी नंबर१ गाळंदवाडी नंबर२ गणेशवाडी (इंदापूर) गांजेवळण घोलपवाडी (इंदापूर) घोरपडवाडी गिरवी गोखली गोंदी गोसावीवाडी गोतांडी हंगरवाडी हिंगणेवाडी हिंगणगाव (इंदापूर) जाचकवस्ती जाधववाडी (इंदापूर) जांब (इंदापूर) जंक्शन कचरेवाडी (इंदापूर) कडबनवाडी कळंब (इंदापूर) कळस कळशी काळेवाडी (इंदापूर) कळठण नंबर१ कळठण नंबर२ कांदळगाव (इंदापूर) कर्दनवाडी कारेवाडी (इंदापूर) काटी (इंदापूर) कौठळी कझाड खोरोची कुंभारगाव (इंदापूर) कुरवळी लाकडी लाखेवाडी (इंदापूर) लामजेवाडी लसुर्णे लोणी (इंदापूर) लुमेवाडी मदनवाडी माळेवाडी (इंदापूर) माळवाडी (इंदापूर) मानकरवाडी (इंदापूर) मरदवाडी म्हसोबाचीवाडी नरसिंगपूर (इंदापूर) नारुटवाडी न्हावी (इंदापूर) निंबोडी (इंदापूर) निमगाव केतकी निमसाखर निरगुडे नीरनिमगाव निरवांगी ओझरे (इंदापूर) पदस्थळ पळसदेव पांढरवाडी (इंदापूर) परीटवाडी पवारवाडी (इंदापूर) पिलेवाडी पिंपळे पिंपरीबुद्रुक (इंदापूर) पिंपरीखुर्द (इंदापूर) पिठेवाडी पितकेश्वर पोंदकुळवाडी पौंढावाडी राजवाडी (इंदापूर) रानमोडवाडी रेदा रेदाणी रूई (इंदापूर) सांसर सापकळवाडी सराफवाडी सारटी (इंदापूर) सरडेवाडी शाहा (इंदापूर) शेळगाव (इंदापूर) शेतफाळहवेली शेतफाळगाढे शिंदेवाडी (इंदापूर) शिरसाडी (इंदापूर) सिरसाटवाडी सुगाव सुरवाड टाकळी (इंदापूर) तक्रारवाडी टण्णू तरंगवाडी तरटगाव (इंदापूर) तावशी (इंदापूर) थोरातवाडी उधाट वाडापुरी वकीलवस्ती वनगळी वरकुटेबुद्रुक वरकुटेखुर्द वायसेवाडी व्याहाळी (इंदापूर) झगडेवाडी (इंदापूर)
माहिती
संपादनइंदापूर तालुका हा पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर असून पुणे जिह्याच्या पूर्वेस शेवटचा तालुका आहे. इंदापूर तालुका भीमा व नीरा नदीच्या परिसरात आहे. पौराणिक काळात इंदापूरचे नांव इंद्रपुरी असे होते. तालुक्याचा भाग पूर्वी मालोजीराजे भोसले यांचे जहागिरीमध्ये समाविष्ट होता.गोरे कुटुंबाकडे महसुल गोळा करण्याची जबाबदारी असल्याची इतिहासात नोंद आहे
इंदापूर हे तालुक्याचे मुख्यालय असून त्या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालये आहेत. इंदापूर तालुक्यामधून पुणे-हैद्राबाद हा [[राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 जात असून इंदापूर-पुणे हे अंतर १३५ कि. मी. आहे.
तालुक्याचे उत्तर सीमेवर भीमा नदी वाहत असून दक्षिणेस नीरा नदी आहे. भीमा नदीवर सुप्रसिद्ध उजनी धरण असून जलाशयात २२ गावे बुडाली आहेत.. धरणाच्या पाण्याचा फुगवटा सुमारे ५० कि. मी. असून त्या पाण्याचा उपयोग कृषिविकास व मत्स्यपालनासाठी होत आहे. तालुक्यातील भीमा व नीरा दोन नद्या, धरणाच्या पाण्याचा फुगवटा व नीरा कालवा यामुळे बहुतांशी भाग बागायती असून तालुक्याचा मध्यभागच्या पठारावरील भाग हा जिरायती आहे. प्रमुख व्यवसाय शेती असून ऊस हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. इंदापूर तालुक्यात सहकारी तत्त्वावर तीन साखर कारखाने आहेत. सर्वात जुना श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर असून त्यानंतर इंदापूर सहकारी आत्ताचा कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना, महात्मा फुले नगर बिजवडी व त्यानंतर नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना, शहाजीनगर हा आहे. तसेच एक खाजगी साखर कारखाना एक व खाजगी गुळाचा कारखाना आहे.
इंदापूर तालुक्यात शेतीसाठी प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या एकूण 305 सोसायट्या कार्यरत आहेत.
इंदापूर तालुक्यात एकूण 115 ग्रामपंचायती आहेत.
इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांचे सेवेत अग्रक्रमी काम करणारी कृषि उत्पन्न बाजार समिती, इंदापूर कार्यरत आहे. तसेच महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे व कृषि उत्पन्न बाजार समिती, इंदापूर यांचे संयुक्त विद्यामाने शेतमाल निर्यात सुवीधा केंद्र कार्यरत आहे. या सुवीधा केंद्रामधून केळी, डाळींब द्राक्षे निर्यात केली जातात.या तालुक्यात डाळिंब,द्राक्षे,ढोबळी मिरची,टोमॅटो,व इतर सर्व पिके घेतली जातात
संदर्भ
संपादन- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate