आकाशगंगा (स्टार ट्रेक कथानकातील दीर्घिका)

आकाशगंगा ही स्टार ट्रेक कथानकामधल्या काल्पनिक व अफाट अंतराळविश्वातील तारकांची एक दीर्घिका आहे. जीन रॉडेनबेरी यांनी इ.स. १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व स्टार ट्रेक कथानक बनवले.

स्टार ट्रेक कथानकातील दीर्घिका

अधिक माहिती

संपादन

स्टार ट्रेक कथानकातील आकाशगंगा एक वर्तुळाकार दीर्घिका आहे, जिचा व्यासलक्ष प्रकाशवर्ष इतका आहे व जिच्यात ४०० अब्ज तारे आहेत. या दीर्घिकेचे तीन मुख्य भाग आहेत पहिला आकाशगंगेचा गाभा. दुसरा ज्यात सर्वे तारासमूह व तारकांमधली धूळ आहे व जिच्यामुळे आकाशगंगेला तिचे चक्राकार रूप मिळते अशी आकाशगंगेची तबकडी आणि तिसरा ह्या आकाशगंगेच्या भोवती असलेले एक भीमकाय शक्तिक्षेत्र. या क्षेत्राला गॅलॅक्टिक बॅरियर असे म्हणले आहे. हे गॅलॅक्टिक बॅरियर म्हणजे एका प्रकाराच्या नकारात्मक शक्तीमुळे तयार झालेले कुंपण आहे, याच्यामुळे आकाशगंगेच्या बाहेरील अंतराळात प्रवास करणे अशक्य होते.[]

स्टार ट्रेक कथानकातील इ.स. २२६९ मध्ये या आकाशगंगेचा गाभेच्या प्रदेशात प्रवास करून शोध लावण्यात आला की या विश्वातील सर्व गोष्टींची निर्मिती या गाभेतून झाली आहे.[] या आकाशगंगेच्या ताऱ्यांसंबंधीच्या नकाशात या आकाशगंगेला ४ भागांत विभागले गेले आहे व प्रत्येक भागाला ते क्वाड्रंट असे म्हणतात. प्रत्येक क्वाड्रंट हा आकाशगंगेच्या संपूर्ण वर्तुळाचा एक चतुर्थांश भाग आहे. अल्फा क्वाड्रंट, बीटा क्वाड्रंट, गॅमा क्वाड्रंटडेल्टा क्वाड्रंट ही त्या भागांची नावे आहेत.

इ.स. २०६४ ते इ.स. २३६४ या ३०० वर्षांत आकाशगंगेचा फक्त ११ टक्के भागाचा शोध घेण्यात आला आणि नंतर फेडरेशन तर्फे एकाच वर्षात अजून ८ टक्के भागाचा शोध घेण्यात आला, असे स्टार ट्रेक कथानकात म्हणले आहे. फेडरेशन शास्त्रज्ञांच्या मते या आकाशगंगेतील ४३,००० पैकी फक्त एका ग्रहावर सजीव सृष्टी असू शकते. फेडरेशनचे शास्त्रज्ञ डॉक्टर लीयोनर्ड मकॉय यांच्या मते, या आकाशगंगेच्या ग्रह मोजणी गणित संभवनीयतेच्या गणनेनुसार एकूण ग्रहांपैकी फक्त ३० लक्ष ग्रह जगण्याला योग्य आहेत.[]

क्वाड्रंट

संपादन

स्टार ट्रेक कथानकात आलेल्या या आकाशगंगेच्या ताऱ्यांसंबंधीच्या नकाशात ह्या आकाशगंगेला ४ भागांत विभागले गेले आहे व प्रत्येक भागाला ते क्वाड्रंट असे म्हणतात. प्रत्येक क्वाड्रंट हा आकाशगंगेच्या संपूर्ण वर्तुळाचा एक चतुर्थांश भाग आहे व एका ठराविक अंशावर विभागला गेला आहे. स्टार ट्रेकमधील मानव प्रजातीचे मूळ ग्रह पृथ्वी आहे, व पृथ्वी ग्रहाची सूर्यमाला अल्फा क्वाड्रंट मध्ये येते.

अल्फा क्वाड्रंट

संपादन

अल्फा क्वाड्रंट हे स्टार ट्रेकमधल्या आकाशगंगेच्या ताऱ्यांसंबंधीच्या नकाशातला एक चतुर्थांश भाग आहे. हा भाग आकाशगंगेच्या संपूर्ण वर्तुळातील १८० ते २७० अंशापर्यंतचा असा एक चतुर्थांश भाग आहे[]. या भागात मानव, क्लिंगॉन, व्हल्कन, फिरंगीकारडॅसियन यांसारख्या प्रजातीच्या साम्राज्याचे ग्रह आहेत.

बीटा क्वाड्रंट

संपादन

बीटा क्वाड्रंट हे स्टार ट्रेक कथानकातल्या आकाशगंगेच्या नकाशातला एक चतुर्थांश भाग आहे. हा भाग आकाशगंगेच्या संपूर्ण वर्तुळाचा ९० ते १८० अंशापर्यंतचा असा एक चतुर्थांश भाग आहे[]. या भागात क्लिंगॉनरॉम्यूलन प्रजातीच्या साम्राज्याचे ग्रह आहेत.

गॅमा क्वाड्रंट

संपादन

गॅमा क्वाड्रंट हा स्टार ट्रेक कथानकात उल्लेखिलेल्या आकाशगंगेच्या नकाशातला एक चतुर्थांश भाग आहे. हा भाग आकाशगंगेच्या संपूर्ण वर्तुळाचा २७० ते ३६० अंशापर्यंतचा असा एक चतुर्थांश भाग आहे[]. मुख्यतः या भागात चेंजलिंग्स प्रजातीच्या प्राण्यांच्या डोमीनियन या नावाच्या संस्थेचे साम्राज्य आहे.

डेल्टा क्वाड्रंट

संपादन

डेल्टा क्वाड्रंट हा आकाशगंगेचा एक चतुर्थांश भाग आहे. हा भाग आकाशगंगेच्या संपूर्ण वर्तुळाचा ० ते ९० अंशापर्यंतचा असा एक चतुर्थांश भाग आहे[]. या भागात बॉर्ग, ओकांपा, टलॅक्झियन, विडीयन, केझोन, हिरोजन, क्रेनिमहाकोनियन सारख्या प्रजातीच्या साम्राज्याचे ग्रह आहेत.

हे सुद्धा पहा

संपादन
  1. स्टार ट्रेक

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c "स्टार ट्रेक कथानकातील आकाशगंगेच्या बद्द्लची माहिती - स्टार ट्रेक वेबसाइटवर". 2010-01-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-25 रोजी पाहिले.
  2. ^ मेंडेल, जीयोफ्री. स्टार ट्रेक आकाशगंगेच्या अल्फा क्वाड्रंटचे नकाशे.
  3. ^ मेंडेल, जीयोफ्री. स्टार ट्रेक आकाशगंगेच्या बीटा क्वाड्रंटचे नकाशे.
  4. ^ मेंडेल, जीयोफ्री. स्टार ट्रेक आकाशगंगेच्या गॅमा क्वाड्रंटचे नकाशे.
  5. ^ मेंडेल, जीयोफ्री. स्टार ट्रेक आकाशगंगेच्या डेल्टा क्वाड्रंटचे नकाशे.

बाह्य दुवे

संपादन
  1. स्टार ट्रेक वेबसाइट