अल्सास (फ्रेंच: Alsace) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या पूर्वे भागात जर्मनीस्वित्झर्लंडच्या सीमेजवळ ऱ्हाईन नदीच्या पश्चिम काठावर वसला असून तो फ्रान्सच्या संलग्न २२ प्रांतांपैकी आकाराने सर्वात लहान आहे. स्त्रासबुर्ग ही अल्सासची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. म्युलुझ हे येथील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

अल्सास
Alsace
फ्रान्सचा प्रदेश
ध्वज
चिन्ह

अल्सासचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
अल्सासचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी स्त्रासबुर्ग
क्षेत्रफळ ८,२८० चौ. किमी (३,२०० चौ. मैल)
लोकसंख्या १८,१५,४८८
घनता २१९.३ /चौ. किमी (५६८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-6AE
संकेतस्थळ http://www.region-alsace.eu

अल्सास प्रदेश बास-ऱ्हिनहाउत-ऱ्हिन ह्या दोन प्रशासकीय विभागांमध्ये विभागला गेला आहे. २०१६ साली अल्सास, लोरेनशांपेन-अ‍ॅर्देन हे तीन प्रदेश एकत्रित करून ग्रांद एस्त नावाच्या नवीन प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.


गॅलरी संपादन

 
म्युलुझमधील सेंट स्टीफन्स चर्च.
म्युलुझमधील सेंट स्टीफन्स चर्च.  
 
स्त्रासबुर्ग.
 
Château du Haut-Kœnigsbourg हा अल्सासमधील एक ऐतिहासिक राजवाडा आहे.
Château du Haut-Kœnigsbourg हा अल्सासमधील एक ऐतिहासिक राजवाडा आहे.  


बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: