म्युलुझ
म्युलुझ (फ्रेंच: Mulhouse; जर्मन: Mülhausen) हे फ्रान्स देशामधील एक शहर आहे. हे शहर फ्रान्सच्या पूर्व भागातील अल्सास प्रदेशाच्या ओत-ऱ्हिन विभागात जर्मनी व स्वित्झर्लंड देशांच्या सीमांजवळ वसले आहे. सुमारे १.१ लाख लोकसंख्या असलेले म्युलुझ अल्सास विभागातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (स्त्रासबुर्ग खालोखाल) आहे.
म्युलुझ Mulhouse |
|||
फ्रान्समधील शहर | |||
| |||
देश | फ्रान्स | ||
प्रदेश | अल्सास | ||
विभाग | ओत-ऱ्हिन | ||
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व ५८ | ||
क्षेत्रफळ | २२.१८ चौ. किमी (८.५६ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ७९० फूट (२४० मी) | ||
लोकसंख्या (२००८) | |||
- शहर | १,१०,५१४ | ||
- घनता | ४,९८३ /चौ. किमी (१२,९१० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
http://www.ville-mulhouse.fr |
म्युलुझ येथील प्रसिद्ध वाहन व रेल्वे संग्रहालये फ्रान्समधील सर्वात मोठी आहेत. येथील अनेक कारखाने व उद्योगांमुळे म्युलुझला फ्रेंच मॅंचेस्टर हे टोपणनाव पडले आहे.
संदर्भ
संपादन
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ (इंग्रजी) (फ्रेंच) (जर्मन)
- पर्यटन
- स्वागत कक्ष Archived 2011-11-26 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील म्युलुझ पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत