सुयोग कुंडलकर

भारतीय संवादिनी वादक

सुयोग कुंडलकर (जन्म : ३१ ऑगस्ट १९७९, पुणे) हे संवादिनी (हार्मोनियम) वादक आहेत.

सुयोग कुंडलकर
आयुष्य
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
मूळ_गाव पुणे
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
आई अर्चना कुंडलकर
वडील सुभाष कुंडलकर
जोडीदार आरती ठाकूर-कुंडलकर
नातेवाईक सचिन कुंडलकर
संगीत साधना
गुरू डॉ. अरविंद थत्ते
गायन प्रकार संवादिनी वादन
घराणे जयपूर-अत्रौली
संगीत कारकीर्द
पेशा संवादिनी वादक
बाह्य दुवे
संकेतस्थळ

पूर्वायुष्यसंपादन करा

अर्चना आणि सुभाष कुंडलकर हे सुयोग कुंडलकर यांचे आई- वडील. [१]त्यांचे शालेय शिक्षण महाराष्ट्र विद्या मंडळ, पुणे येथे तर महाविद्यालयीन शिक्षण सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे येथे झाले. पुढे त्यांनी पुणे विद्यापीठाच्या ललित कलाकेंद्रातून पदवी घेतली. चित्रपट दिग्दर्शक सचिन कुंडलकर हे त्यांचे वडील बंधू आहेत. त्यांच्या पत्नी आरती ठाकूर-कुंडलकर या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका आहेत.

शिक्षणसंपादन करा

कुंडलकर यांनी वयाच्या सहाव्या वर्षापासून रंजना गोडसे यांच्याकडून संवादिनी शिकण्यास सुरुवात केली. [२]१९९७ पासून ते एकल संवादिनीवादक डॉ. अरविंद थत्ते यांच्याकडे संवादिनीचे शिक्षण घेत आहेत. कुंडलकर यांनी शास्त्रीय गायनाचे शिक्षणसुद्धा घेतले असून श्रीराम देवस्थळी, सुहास दातार, ललिता खाडीलकर आणि मोहनराव कर्वे हे त्यांचे गुरू आहेत. तसेच संवादिनी एकल वादनासाठी त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी पुणे विद्यापीठाच्या ललित कलाकेंद्रातून पदवी घेतली आहे. कुंडलकर हे ऑल इंडिया रेडीओ आणि दूरदर्शनचे ‘बी हाय‘ दर्जाचे कलाकार आहेत. पंडित बाळासाहेब पूंछवाले आणि पंडित वसंतराव राजूरकर यांनी आयोजित केलेल्या ‘टप्पा’ कार्यशाळांमध्ये ते सहभागी झाले होते. ते आता पुणे विद्यापीठाच्या ललित कलाकेंद्रामध्ये गुरू म्हणून ज्ञानदानाचे काम करतात.

साथसंगतसंपादन करा

कुंडलकर यांनी किशोरी आमोणकर यांना २००० पासून २०१७ पर्यंत संवादिनीची साथ केली. तसेच डॉ. प्रभा अत्रे यांना ते गेली अनेक वर्षे साथ करत आहेत. त्याशिवाय त्यांनी गंगूबाई हनगल, पंडित संगमेश्वर गुरव, पंडित यशवंतबुवा जोशी, मालिनी राजूरकर, पद्मा तळवलकर, वीणा सहस्रबुद्धे, अश्विनी भिडे- देशपांडे, उस्ताद रशीद खान, पंडित उल्हास कशाळकर, पंडित कैवल्यकुमार गुरव, आनंद भाटे , शौनक अभिषेकी, जयतीर्थ मेवुंडी, कलापिनी कोमकली, आरती अंकलीकर- टिकेकर, पंडित संजीव अभ्यंकर, कौशिकी चक्रवर्ती, पंडित रघुनंदन पणशीकर अशा अनेक गायकांना संवादिनीची साथ केली आहे.

त्यांनी भारताबरोबरच स्वित्झर्लंड, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, युएई, बांगलादेश अशा अनेक देशात आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे.

संवादिनी एकल सादरीकरणसंपादन करा

पुणे, मुंबई, कोल्हापूर, बेंगलोर, इंदौर, बनारस, गोवा, बोस्टन, सिंगापूर इ. ठिकाणी कुंडलकर यांनी एकल संवादिनी वादनाचे कार्यक्रम केले आहेत.

संगीतकारसंपादन करा

कुंडलकर यांनी यमन, भूप, पूरिया, भैरवी, अडाणा, तोडी अशा अनेक रागात बंदिशी रचल्या आहेत. रागचित्र या पुस्तकरूपाने या बंदिशी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

पुरस्कारसंपादन करा

पुस्तकसंपादन करा

  • रागचित्र[६]


संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ "अजून खूप मोठा पल्ला गाठायचाय... (सुयोग कुंडलकर) | eSakal". www.esakal.com. 2020-01-08 रोजी पाहिले.
  2. ^ "Maharashtra Times". maharashtra230.rssing.com. 2020-01-09 रोजी पाहिले.
  3. ^ "संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News". News18 Lokmat. 2020-01-08 रोजी पाहिले.
  4. ^ "'गानसरस्वती महोत्सवा'मध्ये तीन वर्षांनी किशोरीताईंची सकाळच्या रागांची मैफल". Loksatta. 2020-01-08 रोजी पाहिले.
  5. ^ author/lokmat-news-network. "उदयोन्मुख कलाकारांचा रियाझ कमी : अशोक पत्की; पुण्यात वि. वि. द. स्मृती समारोह". Lokmat. 2020-01-08 रोजी पाहिले.
  6. ^ "RaagChitra (रागचित्र)". Suyog Kundalkar. 2020-01-09 रोजी पाहिले.