वीणा सहस्रबुद्धे (जन्मदिनांक : १४ सप्टेंबर, इ.स. १९४८; - पुणे, २९ जून, इ.स. २०१६) या एक लोकप्रिय हिंदुस्तानी गायिका होत्या. त्यांचे वडील शंकरराव बोडस. बंधू काशीनाथ आणि चुलत बंधू नारायणराव बोडस हे तिघेही शास्त्रीय गायक होते. संगणक क्षेत्रातले हरी सहस्रबुद्धे हे वीणाताईंचे पती होत.

वीणा सहस्रबुद्धे
आयुष्य
जन्म १४ सप्टेंबर, १९४८
जन्म स्थान कानपूर, (भारत)
मृत्यू २९ जून, २०१६
मृत्यू स्थान पुणे
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
वडील शंकरराव बोडस
नातेवाईक काशीनाथ (भाऊ), नारायणराव (चुलत भाऊ)
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

मूळच्या ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका असलेल्या वीणा सहस्रबुद्धे किराणा आणि जयपूर घराण्याच्या गायकीतील सौंदर्यस्थळांनाही सामावून घेत. रागसंगीताचा प्रचंड व्यासंग असलेल्या गायिका म्हणून त्यांचा लौकिक होता. गायन शिकवण्याची त्यांची हातोटी जबरदस्त होती. य्तुसंगीतावर्त्यांनी केलेल काम वाखाणले गेले.

पूर्वायुष्य

संपादन

वडिलांच्या आग्रहाखातर वीणाताई लहानपणी कथ्थक नृत्य शिकल्या..

सांगीतिक कारकीर्द

संपादन

वीणा सहस्रबुद्धे यांच्या शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मध्यपूर्वेतील देश, युरोप या देशांतील शहरांसह संपूर्ण भारतातील शहरांत झाले आहेत.

वीणा सहस्रबुद्धे एस.एन.डीटी विद्यापीठात संगीत विभागाच्या काही वर्षे प्रमुख होत्या.

संगीत ध्वनिमुद्रिका/आल्बम्स/सीडीज

संपादन
  • One Thousand Minds (अमेरिकेतून प्रकाशन)

पुरस्कार व सन्मान

संपादन
  • ‘आकाशवाणी’ने घेतलेल्या शास्त्रीय कंठ संगीताच्या राष्ट्रीय स्पर्धेत पहिला क्रमांक (१९७२)
  • उत्तर प्रदेश सरकारचा संगीत नाटक पुरस्कार (१९९३)
  • भारत सरकारकडून संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)

वीणा सहस्रबुद्धे यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन