संजीव अभ्यंकर

हिंदुस्तानी गायक

संजीव अभ्यंकर (ऑक्टोबर ५, इ.स. १९६९ - हयात) हे लोकप्रिय हिंदुस्तानी गायक आहेत.

संजीव अभ्यंकर

संजीव अभ्यंकर
उपाख्य पंडित
आयुष्य
जन्म ऑक्टोबर ५, इ.स. १९६९
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी, हिंदी भाषा
पारिवारिक माहिती
आई डॉ.शोभा अभ्यंकर
वडील विजय अभ्यंकर
जोडीदार आश्विनी संजीव अभ्यंकर
संगीत साधना
गुरू डॉ.शोभा अभ्यंकर(आई), गंगाधरबुवा पिंपळखरे, पंडित जसराज
गायन प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत,
घराणे मेवाती घराणे
संगीत कारकीर्द
कार्य शास्त्रीय खयाल गायन,
नाट्यसंगीत,
मराठी अभंग, मराठी भावगीत
व हिंदी चित्रपटांतून पार्श्वगायन.
पेशा गायन
गौरव
गौरव मध्य प्रदेश शासनाने ‘कुमार गंधर्व पुरस्कार’
पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार गॉडमदर' चित्रपटातील गाण्यासाठी
बाह्य दुवे
संकेतस्थळ

अभ्यंकरांचा जन्म ऑक्टोबर ५, इ.स. १९६९ रोजी झाला. वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांचे हिंदुस्तानी संगीताचे शिक्षण सुरू झाले. त्यांना सुरुवातीचे सांगीतिक धडे घरातून, आई शोभा अभ्यंकर यांच्याकडून मिळाले. पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडूनही संजीव यांनी मार्गदर्शन घेतले. हिराबाई बडोदेकर आणि वसंतराव देशपांडे यांनी त्यांना जसराजांकडे शिकायला पाठविण्याची शिफारस केली. जसराजांचे शिष्यत्व स्वीकारल्यानंतर त्यांची संगीत दिनचर्या संपूर्णतः बदलली. गुरू-शिष्य परंपरेनुसार त्यांचे शिक्षण चालू झाले. जसराजांच्याबरोबर भारतभर दौरे, संगीत मैफिलींमध्ये त्यांना साथ-संगत आणि त्याचवेळी हिंदुस्तानी संगीतातील अभिजात स्वरांचे धडे, अशा नानाविध मार्गांनी त्यांची सांगीतिक प्रगती होत होती. अकराव्या वर्षी संगीताची पहिली मैफल गाजविणाऱ्या संजीव अभ्यंकरांनी त्यानंतर देशभरातील विविध महोत्सवांमध्ये आपल्या गायकीची छाप पाडली.

जसराज यांच्याकडील दिनक्रम

संपादन

ते जसराजांकडे राहत होते. आपले आपण उठून शिष्यांनी रियाजाच्या खोलीत रियाज सुरू करावा, अशी जसराजांची शिकवण होती. त्यांच्या घराच्या गच्चीत रियाजाची छोटी खोली होती. तिथे जाऊन ते गायला बसायचे, त्यांना मनात येईल तेव्हा जसराज यायचे आणि शिकवायचे. त्यांनी शिकवलेले सकाळ, दुपार, संध्याकाळ असे तीन वेळा गायचे असा नियम होता. त्या त्या वेळचे राग म्हणायचे. मग मधल्या वेळात संजीव क्रिकेट खेळायला मामाकडे जायचे. रोज तेव्हा चार ते साडेचार तास गायन व्हायचे. त्यावेळी गळा तयार करायचा होता त्यामुळे सगळे राग गळ्यावर चढवायचा रियाज असायचा.

कारकीर्द

संपादन

देशभरातील प्रख्यात संगीत महोत्सवच नाहीत, तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व पूर्व आफ्रिका या भागांतही संजीव अभ्यंकरांची गायकी पोचली.. अभिजात शास्त्रीय संगीताबरोबर पार्श्वगायन, भावसंगीत आणि भक्तिसंगीताच्या प्रांतांतही त्यांनी स्वतःची नाममुद्रा उमटवली.. हिंदी-मराठी भजने आणि बंदिशींच्या अनेक कॅसेट आणि सीड्यांच्या माध्यमांतून देशभरातील संगीतरसिकांच्या घरांत त्यांचे नाव पोचले आहे. स्वतःच्या काही बंदिशी रचून स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्‍नही त्यांनी केला..

'माचिस', 'निदान', 'दिल पे मत ले यार' अशा चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. 'गॉडमदर' चित्रपटातील गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पं. जसराज जीवनगौरव पुरस्कार, सूररत्‍न यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मध्य प्रदेश शासनाने ‘कुमार गंधर्व पुरस्कार’ देऊन त्यांना गौरवले आहे.

बाह्य दुवे

संपादन
  • "पं. संजीव अभ्यंकर". १२ ऑगस्ट, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
  • मीनाक्षी हर्डीकर. "संजीव अभ्यंकर यांची मुलाखत". १२ ऑगस्ट, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  • "व्यक्तिवेध : संजीव अभ्यंकर". १२ ऑगस्ट, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  • संजीव अभ्यंकर - संकेतस्थळ