Vvparab
स्वागत | Vvparab, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Vvparab, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५३४ लेख आहे व १४६ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
नजिकच्या काळापासून विकिपीडियावर दोन संपादन पद्धती उपलब्ध असतील यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हि नवी संपादन पद्धती नुसतेच 'संपादन' म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप वाली संपादन पद्धती 'स्रोत संपादन' पद्धती म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे. 'दृश्य संपादन' कडून 'स्रोत संपादन' अथवा 'स्रोत संपादन' कडून दृश्य संपादकाकडे जाणे
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
गौरव
संपादनVvparab,
आपल्या मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल, विशेषतः मराठी भाषा आणि संस्कृती विषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.
क.लो.अ.
Mahitgar 10:57, 30 सप्टेंबर 2006 (UTC)
इंग्लिश लेख
संपादनश्री. परब,
सर्वप्रथम, मराठी विकिपिडीयावरील आपल्या योगदानाबद्दल धन्यवाद.
गेल्या काही दिवसांत आपण काही लेख लिहिले आहेत, ज्यांचा मथळा इंग्लिशमध्ये आहे. कृपया लेखांचा मथळा ही मराठीतच लिहावा अन्यथा असे लेख एखाद्या सदस्याने निरुपयोगी म्हणून काढून टाकण्याची शक्यता असते.
याच बरोबर प्रत्येक लेख categorize करावा अथवा लेखात सुरुवातीला दोन ओळींची तरी प्रस्तावना लिहावी म्हणजे अन्य सदस्य ही वाचून लेखाला योग्य category बहाल करतील.
आपले योगदान उत्तरोत्तर वाढो ही अपेक्षा आहे.
क.लो.अ.
अभय नातू 15:22, 11 ऑक्टोबर 2006 (UTC)
Vaidic Prarthana नक्की कुठली?
संपादनपरब, तुम्ही लिहिलेल्या Vaidic Prarthana या लेखातली प्रार्थना नक्की कुठल्या सूक्तातील/ उपनिषदातील (किंवा अन्य कुठल्या संहितेतील) आहे? प्रश्नाचे कारण असे की मला त्या लेखाचे शीर्षक चपखल आणि नेमके वाटले नाही. तसे म्हटले तर मंत्रपुष्पांजलीसारख्या बर्याच प्रार्थना 'Vaidic Prarthana' नावाने लेखात समाविष्ट करता येतील. पण तसे करणे हे माहितीच्या वर्गीकरणातला नेमकेपणा घालवणारे ठरेल असे मला वाटते.
थोडक्यात, या लेखाला नेमक्या, चपखल नावाने स्थानांतरित करावे अशी विनंती. तसेच वैदिक वाङ्मयाविषयी नवीन लेख लिहिताना शीर्षकाच्या नेमकेपणाबरोबरच त्याचे विभागवार वर्गीकरणदेखील (Categorization) करावे. --संकल्प द्रविड 08:39, 6 नोव्हेंबर 2006 (UTC)
पानाचे शीर्षक बदलणे
संपादननमस्कार परब,
आपण याबद्दल प्रश्न येथे विचारला आहे.
- how to edit title?
- कृपया कोणीतरी ह्याचे टायटल वैदिक प्रार्थने एवजी राष्ट्र प्रार्थना असे करावे. तसेच कसे केले ते देखिल सांगावे. (step by step)
पानाचे शीर्षक बदलणे याला "स्थानांतरण करणे" (page move करणे) म्हणतात. त्यासाठी असे करा:
१. जे पान स्थानांतरीत करायचे आहे त्या पानावर जाऊन "Move this page" (किंवा "स्थानांतरण") या दुव्यावर टिचकी द्या.
२. तसे केल्यावर जे पान उघडेल त्यात असे काहीसे दिसेल:
- Move page: <original title>
- To new title: <text box>
- Reason: <text box>
- <checkbox> Move associated talk page
३. To new title: नवीन शीर्षक लिहा.
४. Reason: स्थानांतराचे कारण लिहा.
५. "Move associated talk page" हे निवडा (बहुदा ते आधीच निवडलेले असेल). तसे करण्याने पानासोबत त्याचे चर्चा पानही योग्य ठिकाणी आपोआप स्थानांतरीत होईल.
६. "Move page" या कळीवर टिचकी द्या. स्थानांतरण पूर्ण होईल.
अजून याबद्दल काही शंका असेल तर इथेच प्रतिसाद द्या.
तुम्ही सांगितलेले पान मी मुद्दामच स्थानांतरीत केलेले नाही. Step-by-step तुम्हीच करून पहा! :-)
पाटीलकेदार 11:43, 20 नोव्हेंबर 2006 (UTC)
शुक-रंभा संवाद Very nice article
संपादनशुक-रंभा संवाद Hi I am enjoying all your translations, शुक-रंभा संवाद is also quite different and nice.
Thanks Mahitgar 16:23, 22 नोव्हेंबर 2006 (UTC)
- रम्भा :
- 'मार्गे मार्गे नूतनं चूतखण्डं खण्डे खण्डे कोकिलानां विराब:।
रावे रावे मानिनीमानभड्गॊ भड्गे भड्गे मन्मथ: पञ्चबाण: ॥१॥'
मार्गा-मार्गा वर नवीन आंब्याची झाडे शोभून दिसत आहेत. प्रत्येक झाडावर कोकिळा सुमधुर कूजन करित आहेत. हे कूजन ऎकून मानी स्त्रियांचे गर्वहरण होत आहे आणि गर्व नष्ट होताच पाच बाणांना धारण करणारा कामदेव मनाला बेचैन करित आहे.॥१॥
- Requesting coments, if above format is ok for शुक-रंभा संवाद article or any other suggestion.
Mahitgar 07:05, 26 नोव्हेंबर 2006 (UTC)
Requesting your vote at Marathi Wictionary
संपादनविक्शनरी हा मराठी विकिपीडियाचा सहप्रकल्प आहे.विक्शनरी हा शब्दकोश प्रकल्प आहे.
विक्शनरी प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll
संपादन
- Nomination Request by User:Mahitgar in Marathi Language.:-
विकिपिडीयन्स,
मी (User:Mahitgar) मराठी विक्शनरीचा Administrator होवू इच्छितो. मी गेले काही महिने येथे नवीन लेख लिहिण्याचा, असलेले लेख संपादित करण्याचा व मराठी विकिपीडिया आणि विक्शनरी अधिकाधिक सुसंबद्ध करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे.
मी मराठी भाषेचे व्याकरण या विषयाबाबतीत मराठी विकिपीडियावर भर घातली आहेच .येत्या काळात मराठी विकिपीडियास लागणार्या भाषांतरांच्या संदर्भात विक्शनरीच्या सहकार्याची मोठी गरज भासणार आहे. यासंदर्भात माझ्याकडे पुरेशी पुस्तक स्वरूपात संसाधनेही उपलब्ध आहेत.
मी मराठी विकिपीडियावर १००० पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.माझे मराठी विकिपीडियावरील योगदान(My contributions on Marathi Wikipedia)
Administrator rights मिळाल्यास हे काम अधिक सुकर होईल. विकिपीडियाच्या नियमांनुसार मी विकि stewardsना माझी विनंती http://meta.wikimedia.org/wiki/Requests_for_permissions येथे करणार आहे. आता फक्त आपली (विकिपिडीयन्सची) संमती मिळवायची आहे. तरी आपले मी Administrator होण्या बद्दलचे मत (होय/नाही) व त्याची कारणे दिल्यास माझ्या विनंतीवर stewards विचार करून होय/नाही उत्तर देतील.
आशा आहे आपण लवकरच आपले मत Wiktionary:कौलयेथेच खाली stewards सोयी करिता इंग्रजीत नोंदवावे ही विनंती.
- At wictionary one needs to have a separate account to log in,if you do not have one already please do create one at Create wictionary account
क.लो.अ.
माहीतगार Mahitgar
प्रश्नोपनिषद भाषांतर छान चालू आहे धन्यवाद
संपादनप्रश्नोपनिषद भाषांतर छान चालू आहे.मन प्रसन्न होते.भाषांतरांकरिता धन्यवाद. Mahitgar 08:42, 25 डिसेंबर 2006 (UTC)
- परब, प्रश्नोपनिषदाचा लेख पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन! छान काम झाले. फक्त त्यात वैश्वकोशीय उपयुक्ततेच्या दृष्टीने एक-दोन गोष्टींची भर घालता येईल का? :-
- संदर्भ - लेखाच्या शेवटी 'संदर्भ' म्हणून वापरलेल्या संहिता, अनुवाद इतर साहित्य यांची लेखक, प्रकाशन, आवृत्ती, वर्ष या तपशिलाने नोंद करणे.
- प्रस्तावनेचा परिच्छेद - लेखाच्या सुरुवातीला जो परिच्छेद आहे त्यात प्रश्नोपनिषद् या विषयावर प्रस्तावना लिहिणे. सध्या अथर्ववेदाच्या त्यात पिप्पलाद ऋषींनी सहा शिष्यांना दिलेली उत्तरे अशी संक्षिप्त माहिती आहे. त्यात प्रश्नोपनिषदात चर्चिलेले विषय, त्यातील तत्वज्ञानाचा/विचारांचा इतर औपनिषदिक/ पौराणिक वाङ्मयाशी काही संबंध असल्यास त्याचे वर्णन ही माहितीही जोडता आली तर सर्वसामान्य, संस्कृत न जाणणार्या वाचकांच्या दृष्टीने उपयोगी ठरेल.
- --संकल्प द्रविड 08:39, 19 जानेवारी 2007 (UTC)
चांगदेव पासष्टी
संपादनचांगदेव पासष्टीच्या ५व्या, १७व्या २२व्या आणि २४व्या श्लोकात आणि त्यांच्या मराठी अर्थात द्र किंवा दृ ने सुरू होणारे जे शब्द आले आहेत त्यांच्यात काहीतरी मुद्रणदोष आहेत असे वाटते. खरे शब्द दृष्टमात्र, दृष्टत्वा/द्रष्टत्वा, द्रष्टृत्व असे असावेत. मूळ ग्रंथ बघून योग्य ती सुधारणा करावी. ४७व्या श्लोकात एक तून् आला आहे, तोपण चुकीचा वाटतो.--J--J १८:४७, २१ एप्रिल २००७ (UTC)
महोदय, माझ्याकडील प्रती प्रमाणें मी लिहिले आहे. आपणास ते चुकीचे वाटत असल्यास आणि तसा १००% विश्वास असल्यास कृपया आपण योग्य तो बदल करावा. आपल्या सूचनांबद्द्ल आभारी आहे.
विकास परब
आपण २२ आणि २४ व्या श्लोकात सुधारणा केलेली पाहिली. अजून खालील सुधारणा बाकी असाव्यात. १० व्या श्लोकातला शब्द "द्र्ई~ण्मात्र " १७ व्या श्लोकातला "दृष्ट्टत्वा" आणि मराठी गद्यातला "द्रष्टृत्व"(?) २२ व्या श्लोकाच्या भाषांतरात "द्रष्टुत्वाच्या" २४ व्या श्लोकात=== "द्र्ष्टत्व "=== आपल्याला उपरोल्लिखित दोष पटले तरच दुरुस्त करावे. मला कळवलेत तर आभारी होईन.---J--J १३:१९, २४ एप्रिल २००७ (UTC)
श्री. विकास परब.
उत्तराबद्दल धन्यवाद. मी चांगदेव पासष्टीची एखादी प्रत मिळ्वून मला वाटलेल्या शंकांचे निरसन करून घेईन.--J-J १५:३१, २७ एप्रिल २००७ (UTC)
वेदसारशिवस्तवः
संपादन'वेदसारशिवस्तवः' च्या ११ व्या श्लोकात 'जगन्मृड' असा शब्द आहे, त्यात 'मृड चा अर्थ अनुमानाने आनंदाने असा लागतो. त्या शब्दाच्या टंकलेखनात काही चूक तर नाही ना?---J=-J १२:५६, ३० एप्रिल २००७ (UTC)
महोदय, श्लोकातील शब्द 'जगन्मृड'असाच आहे आणि त्याचा अर्थ देखील आनंदाने असाच आहे. विकास
शीर्षक बदलण्याविषयी
संपादनपरब, वैदिक प्रतिक दर्शन हे शीर्षक तुम्हाला शुद्धलेखनाकरता बदलायचे आहे असे समजले. कुठल्याही लेखाचे शीर्षक बदलण्याकरता त्या लेखाच्या वरच्या बाजूस 'स्थानांतरण' नावाचा टॅब आहे (लेखाच्या डोक्यावर दिसणार्या 'चर्चा', 'संपादन', 'इतिहास' या टॅबच्या ओळीतच). तेथे माउस टिचकवून नवीन नाव द्यावे.
तसेच, सदस्यांच्या चर्चापानावर नवीन संदेश लिहिताना शक्यतो चर्चापानावर सर्वात खालती लिहिण्यास सुरु करावे.
--संकल्प द्रविड ०९:०६, २२ मे २००७ (UTC)
नमस्कार,
संकल्पने वर सांगितले आहेच. अधिक मदत लागल्यास निरोप ठेवा.
अभय नातू १४:५४, २२ मे २००७ (UTC)
आत्माराम
संपादनमौनं संमतीदर्शकम् । वि. नरसीकर (चर्चा) १७:१०, १५ जानेवारी २०१० (UTC)
नवीन मराठी विकिस्रोत प्रकल्पाकडे
संपादननमस्कार,
आपणास कदाचित कल्पना असेल की फेब्रुवारी २०१२ च्या सुरुवातीस लँग्वेज कमिटी आणि विकिमिडिया फाऊंडेशननने मराठी भाषेसाठी स्वतंत्र http://mr.wikisource.org विकिस्रोत प्रकल्पास मान्यता दिली आहे. हे केवळ आपल्या शुभेच्छा, सक्रिय योगदान आणि पाठिंब्याने शक्य झाले आहे; आणि आपल्या योगदान बद्दल समस्त मराठी बांधवांतर्फे धन्यवाद.
वस्तुतः ज्ञानेश्वरी आणि इतर मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा मराठी विकिस्रोत नावाने नवीन सहप्रकल्पात स्थानांतर केले जात आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन अथवा अशा मूळ संस्कृत ग्रंथांचे मराठी अनुवाद http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का ? याची खात्री करून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पास सहाय्य करा.
आपण आपले सक्रिय सहभाग, कार्य, पाठबळ http://mr.wikisource.org या प्रकल्पास देऊन मराठी भाषिकांचे हे मुक्त ग्रंथालय सर्व अंगाने समृद्ध करत रहावे म्हणून हे सादर निमंत्रण आणि नम्र विनंती.
आपण कॉमन विकिस्रोत प्रकल्पात,मराठी विकिबुक्स अथवा मराठी विकिपीडीया प्रकल्पात प्रताधिकार मुक्त साहित्याचे केलेले लेखन/अनुवाद नवीन मराठी विकिस्रोत प्रकल्पात व्यवस्थित स्थानांतर झाले आहे का हे तपासण्यात कृपया सहाय्य करावे.
आपला नम्र माहितगार (चर्चा) २०:२१, ५ मे २०१२ (IST)
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
संपादनप्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.