SSK999
स्वागत | SSK999, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | SSK999, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७४५ लेख आहे व १६२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपण विकिपीडियावर अजून नवे आहात ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
छान
संपादननदी हा माझा आवडता विषय. तडीस नेत आहात, शुभेच्छा .माहितगार (चर्चा) १५:२४, ८ एप्रिल २०१२ (IST)
नदी प्रकल्प
संपादननमस्कार,
सद्य महाराष्ट्रातील नद्या ह्या संबंधित तुम्ही, मी, जे आणि इतरही बरेच सदस्य लिखाण करीत आहेत. आपण ह्याचा प्रकल्प सुरु करावा का ? कुपया आपले विचार कळवा. स्नेहांकित - अण्णा (चर्चा)
- नमस्कार, थोडे व्यस्त असल्याने मधात इकडे येणे झाले नाही म्हणून उशिराने उत्तर देतोय. आपण नदी प्रकल्पात काम करण्याची तयारी दाखवल्या बद्दल धन्यवाद. प्रकल्पाच्या अनुषंगाने मी कार्य पद्धती तयार करून आपणास कळवतो, धरणांना समाविष्ट करणे ही छान कल्पना आहे. - अण्णा (चर्चा) १२:४५, २२ एप्रिल २०१२ (IST)
Article requests
संपादनHi! Do you do article requests? If so, there is an article that I would like to be in Marathi. It is en:Peel District School Board, a Canadian school district. The Marathi website is at http://www.peelschools.org/marathi/home/, so it can help you use the proper terms for some things Thanks WhisperToMe (चर्चा) १५:१४, २५ एप्रिल २०१२ (IST)
पाचशे संपादने
संपादननवीन लेख
संपादननमस्कार ,
आपण नवीन लेख बनवत असल्याचे पहिले त्याबद्दल अभिनंदन. पण केवळ नवीन लेख सुरू करण्याचा सपाटा न लावता लेख परिपूर्ण करण्यावर जोर द्यावा हि विनंती.
- नवीन लेख सुरु केल्यास त्यात किमान ४-६ वाक्यात माहिती द्यावी,
- पहिल्या वाक्यात लेख नाव ठळक करावे,
- विषयास धरून माहिती चौकट लावावी,
- लेखास किमान एका वर्गात वर्गीकृत करावे,
- ह्याच लेखावर इंग्रजी अथवा इतर विकी वर लेख उपलब्ध असल्यास त्याचा दुवा टाकावा (इतर दुवे सांगकामे टाकतात),
- विषयास धरून कॉमन्स वरून चित्र लावावे,
- मार्गक्रमण साचे, आणि विस्तार साचे लावावे.
हि किमान स्वरुपाची कामे केल्यास लेखास इतर सदस्यांना विस्तार करणे सोपे जाईल.
- आपल्यासारख्या अनुभवी सदस्यांच्या मार्गदर्शनाची आम्हाला नक्कीच गरज आहे. मी बनविलेल्या नवीन लेखात नक्कीच भर घालेन. आपण ही यात आम्हाला नदी आणि धरण प्रकल्पासाठी मदत केल्यास उत्तमच !!! .... धन्यवाद.... SSK999 (चर्चा) १३:०२, १३ मे २०१२ (IST)
पुन्हा एकदा दर्जा!!!!!
संपादननमस्कार मंडळी!
गेल्या दोनेक दिवसांत बरेच नवीन आणि कोरे (एकही वाक्य नाही !) लेख बनवल्याचे दिसते. मराठी विकिपीडियावर आधीच वाचनीय आशयाच्या नावाने बोंब आहे, त्यात अश्या कोर्याख लेखांची भर घालण्याचे प्रयोजन कळले नाही. नवे लेख बनवताना त्यात कृपया दोन-तीन वाचनीय, माहितीपूर्ण वाक्ये लिहावीत. नाहीतर आपण लिहीत असलेल्या माहितीचे, करत असलेल्या श्रमाची किंमत शून्य ठरते, हे ध्यानात घ्यावे.
मराठी विकिपीडियाची लेखसंख्येबाबत कुणाशी स्पर्धा आहे काय ? असल्यास, असली स्पर्धा करण्यात काहीही हशील नाही, कारण पन्नास-साठ भाषांतले विकिपीडिया दर्जा आणि संख्या या दोन्ही पौलूंत मराठीच्या पुढे आहेत. सगळ्यांना गाठत ऊर धपापून घेण्यापेक्षा, मराठी विकिपीडियाने अगोदर स्वतःशी स्पर्धा करत स्वतःचा दर्जा अधिकाधिक उंचावावा, "मराठी भाषकांच्या कामी पडणारा, समृद्ध आणि आशयघन ज्ञानकोश' असा लौकीक कमवावा. अन्यथा मराठी विकिपीडिया 'फुसक्या लेखांचा ढिगारा' म्हणून कुख्यात होईल, यात शंका नाही. :)
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १२:०८, ३ मे २०११ (UTC)
विकिपीडिया दशक पूर्ती सोहळा
संपादनआपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहूमोलाचे आहे, आपण बर्याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते.
त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, कृपया आपले विचार जरूर कळवावे.
आपला नम्र AbhiSuryawanshi (चर्चा) ०७:१०, ११ जून २०१२ (IST)
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
संपादनप्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.