स्वागत संभाजीराजे, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन संभाजीराजे, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५०६ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्य संपादकात समाविष्ट करा या ड्रॉपडाउन मेनुवरून छायाचित्रे (मिडिया), साचे (टेंप्लेट) आणि सारणी (टेबल) या सुविधांशिवाय 'छायाचित्र दिर्घीका, 'आलेख' (ग्राफ) इत्यादी सुविधा सुद्धा उपलब्ध होतात.

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)

  • दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

Nice user name :-)

अभय नातू 19:26, 7 जून 2006 (UTC)

धन्यवाद

घडामोडी

संपादन

संभाजीराजे,

एखादी घडामोड त्या वर्षाच्या लेखात घालताना तोच मजकूर त्या दिवशीच्या लेखातही घालावा, म्हणजे cross-referencing सुलभ होते.

आपण लिहीलेले लेख detailed व माहितीदायक असतात. मराठी विकिपिडीयावर आपल्यासारखे सदस्य असणे हे त्याच्या विकासाचे महत्त्वाचे कारण आहे.

क.लो.अ.

अभय नातू 18:35, 9 जून 2006 (UTC)

अभय नातू, आपल्या सुचनांचे पालन आम्ही जरूर करू.आमच्या लेखांमुळे मराठी विकिपेडियामध्ये मोलाची भर पडत आहे हे कळल्याने बरे वाटले.आमच्या लेखांना योग्य स्वरूपात मांडल्याबद्द्ल आणि त्यांना उपयुक्त म्हटल्याबद्दल आभार. --- संभाजीराजे

जुलै २७

संपादन

संभाजीराजे,

जुलै २७चा साचा तयार आहे.

अभय नातू 15:18, 27 जून 2006 (UTC)

आदरार्थी बहुवचन

संपादन

संभाजीराजे,

Your comment was at the right place and I saw it right away. Now, if only I can get you to end your comments with ~~~~... :-)


We had a big discussion about आदरार्थी बहुवचन some time ago. The qustion is, who differentiates between individuals that need to be addressed with आदर or not!?! While a majority of cases would not be contentious, a significant number of others will draw ire from one section of audience or another.


An example I had cited was, do you use आदरार्थी बहुवचन for Hitler? Mohammend Ghauri? Auranzeb? Pol Pot? The umpteen kings of umpteen kingdoms? Each of these individuals were आदरणीय to some part of the populace (some still are!!!) How does a person cross the line to become आदरणीय or otherwise? It is highly subjective and the point-of-view depends solely on the person writing an article.


My argument for using singular for most individuals (except for some genereally accepted ones, such as छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, or other lumanaries from the Indian socio-political scene) is that doing so keeps it simple. There is less subjectivity involved.


Of course, if a section of our audience feels that a particular person must be elevated to the 'आदरणीय' status, they can propse it and after a suitable debate/exchange of views or information, required changes can be made.


I (and all contributors) must accept and agree that by addressing these individuals in the singular form, *no* disrespect is meant.


Hope that was clear!

अभय नातू 20:02, 3 ऑगस्ट 2006 (UTC)

गौरव चिन्ह

संपादन

संभाजीराजे,

 
मराठी विकिपिडीयावरील 'भारतीय राजकारण' संबंधित योगदानाबद्दल

आपल्या मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल, विशेषतः 'भारतीय राजकारण' विषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.

--कोल्हापुरी ०३:३९, १४ मार्च २००७ (UTC)

मधु दंडवते

संपादन

मधू दंडवते लेख मधु दंडवते यात मिसळला.

अभय नातू १६:५७, २ डिसेंबर २००९ (UTC)

पुनर्निर्देशन

संपादन

एखाद्या लेखाकडे दुसर्‍या नावाने पुनर्निर्देशन करण्यासाठी मी असे करतो --

१. नवीन नावाचा (अनंतशयनम अय्यंगार) शोध घ्या (डावीकडील शोधपेटीतून)

२. त्या नावाने लेख सापडला नाही असे पान येईल. त्यावर ००००(अनंतशयनम अय्यंगार) नावाने लेख तयार करा असा लाल दुवा असतो, त्यावर टिचकी देऊन संपादन पानावर जा.

३. असलेले नाव घालून (एम.ए. अय्यंगार) त्यावर #REDIRECT [[एम.ए. अय्यंगार]] असे लिहा. हे करण्यासाठी संपादनपेटीच्या वरील बटनांमधील सगळ्यात शेवटचे बटन मी वापरतो.

४. जतन करा.

झाले!

अभय नातू १६:३१, ३ डिसेंबर २००९ (UTC)

लोकसभा सदस्य वर्ग

संपादन

संभाजीराजे,

येथे लोकसभा सदस्य या वर्गात अनेक लोकसभा सदस्यांचे वर्गीकरण आहे. तेच वापरता येईल का?

अभय नातू १९:२८, ३ डिसेंबर २००९ (UTC)

सगळ्या लेखांत बदल करण्यापेक्षा वर्गांचे पुनिर्देशन करणे सोपे ठरेल. उदा. १०व्या लोकसभेचे सदस्य हा वर्ग १० वी लोकसभा सदस्य येथे पुनर्निर्देशित केले असता इच्छित परिणाम मिळतो आहे. उदाहरणादाखल कारिया मुंडा लेखातून मी हा बदल केला आहे.
सध्या हे करुन मग नंतर एखाद्या सांगकाम्याकरवे लेख बदलून घेउयात.
अभय नातू २०:०६, ३ डिसेंबर २००९ (UTC)

उ. विकिवरील खाते बंद करण्यासंबंधी

संपादन

नमस्कार संभाजीराजे,

मराठी विकिपीडियावरील तुमचे योगदान महत्त्वाचे खचितच आहे. आपण लिहिलेल्या लेखांचे औचित्यही वादातीतच आहे.
सध्या मराठी विकिपीडियाच्या वाढत्या विस्तारासोबत लेखांतील आशय व गुणवत्ता आधिकाधिक सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. 'विकिकरण', 'अशुद्धलेखन' हे साचे आवश्यक त्या-त्या लेखामध्ये या कामांचे स्मरण सर्वांना क‍ऊन देण्यासाठी मार्कर म्हणून वापरण्यामागे तोच दृष्टिकोन आहे. यामागे एखाद्या सदस्याच्या लेखाणावर ताशेरे ओढण्याचा हेतू अर्थातच नसतो.

>>>संबंधीची चर्चा चर्चापानावर असणे तर सोडाच तर चर्चापान तयारच नाही.<<< तो संदेश मुळात थोडा दुरुस्त करायला हवा होता, जो काल रात्री उशिरापर्यंत काम करताना माझ्याकडून अचूक लिहिला गेला नव्हता; तो मी आता 'या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.' असे लिहून दुरुस्त केला आहे. यामागचा विचार असा : एखाद्या लेखात काही टायपो / शुद्धलेखनाच्या किंवा व्याकरणाच्या काही चुका राहिल्या असल्यामुळे 'अशुद्धलेखन' साचा त्या लेखात डकवला जाईल. मूळ लेखक / योगदात्यांव्यतिरिक्त अन्य सदस्यांनीही अशा लेखाच्या मजकुराचे शुद्धलेखन / व्याकरण तपासून जमेल तितके अधिकाधिक सुधारावे. यासाठी सदस्य ऑनलाइन व ऑफलाइन (पुस्तके वगैरे) संदर्भ वापरू शकतात. जर काही शंका / प्रश्न किंवा लेखातील मजकूर शुद्धच असल्याचा प्रतिवाद करायचा असल्यास चर्चापानावर चर्चा आरंभावी.

तात्पर्य, या साच्याचा संकल्पित वापर गुणवत्तावर्धनाच्या सामायिक उद्दिष्टप्राप्तीसाठी आहे. तुम्ही काम करत असलेल्या (व ज्यांत कदाचित इतर सदस्यांनीही योगदान दिले असेल, अशा) काही लेखांमध्ये 'मंत्रीमंडळ', 'मंत्रीपद' यासारख्या काही चुका सामायिक असल्याचे आढळले; त्या संदर्भाने शुद्धलेखन-तपासणी सुचवण्यासाठी यथायोग्य साचा वापरला. असे करताना त्या - त्या लेखाचा इतिहास अभ्यासून कुठल्या सदस्याने काय लिहिले, शुद्धलेखनाचा दर्जा आवृत्तीगणिक / सदस्यागणिक बदलला आहे का, एवढे सूक्ष्म-विश्लेषण न करता, लेखाचे विद्यमान स्वरूप बघून संदेशचौकट डकवली. तरीही तुम्ही हा मुद्दा वैयक्तिक पातळीवर घेतला हे पाहून मला आश्चर्य वाटले. विकिपीडिया सार्वजनिक / सामायिक प्रकल्प असल्यामुळे त्याची गुणवत्ता, उपयुक्तता, यशस्विता सामायिक प्रयत्नांचे फलित असेल. त्यात कुठले लेख कोणी लिहिले, कोणी तपासले, कोणी सुधारले हे मुद्दे गैरलागू असल्यामुळे तुम्ही तुमच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे मी सुचवू इच्छितो. निर्णय घेण्यास आपण स्वतंत्र आहातच, परंतु या सर्व बाबींचा साकल्याने, सुज्ञपणे विचार कराल अशी आशा बाळगतो.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:१५, १२ डिसेंबर २००९ (UTC)

नमस्कार संभाजीराजे,
गेल्या काही तासांत नक्की काय घडले हे मला नेमके माहिती नाही. अलीकडील बदल पाहून मला अंदाज बांधता येईल पण त्याने फक्त बदल कळतील, तुमच्या मनातील गोम कळणार नाही असे वाटते, तरी अंदाज बांधून त्यावरून काहीतरी action घेण्यापेक्षा तुम्हाला मी प्रामाणिकपणे विचारू इच्छितो की नेमके काय घडले ज्याने तुमचा इतका विरस झाला? या प्रश्नात बिलकूल खोचकपणा नाही, तर तुमची अडचण समजून घेउन ती दूर करण्याचा हेतू आहे. जर तुम्ही याबद्दल मला कळवलेत तर मी अधिक सांगू शकेन.
मराठी विकिपीडियावर संपादकांची वानवाच आहे आणि त्याचमुळे मराठीपेक्षा इंग्लिश विकिपीडियावर मराठी संस्कृती, इ. बद्दल जास्त माहिती आहे. जर आपण असेच एकमेकांशी भांडलो तर ही स्थिती बदलणार तर नाहीच नाही. आपल्या लेखांवर बदल, इ. साचे लावण्यात आले ही जर का मुख्य तक्रार असली तर त्या त्या लेखांच्या चर्चा पानावर किंवा हे साचे लावणार्‍याशी संवाद साधल्यास ही तक्रार खचितच दूर होईल. जर तुम्हाला वाटत असेल की एखादा सदस्य मुद्दामहून खोडसाळपणे तुम्हाला निशान बनवित आहे तर त्याच्याशी बोलून प्रश्न/गैरसमज मिटवावा ही विनंती. जर असे करुनही तुमची तक्रार कायम असली तर जरुर माझ्या लक्षात आणून द्या, प्रचालक/प्रबंधक या नात्याने मी मध्यस्थी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.
असे वैतागून जाउन विकिपीडियावर योगदान करणे सोडून दिल्याने आपल्या सगळ्यांचेच नुकसान आहे यात शंका नाही. तरी आपण कोणताही निर्णय असा तडकाफडकी घेउ नये ही विनंती.
क.लो.अ.
अभय नातू ०६:०१, १२ डिसेंबर २००९ (UTC)
तुम्हा दोघांची चर्चा कोणत्या विशीष्ट लेखाच्या संदर्भाने चालू असल्यास कल्पना नाही, परंतु साचांमध्ये सुधारणांची आवश्यकता आहे याबाबत सहमत आहे.
अजून सुधारणा विषयक सूचना लावलेल्या बहूसंख्य साचांचा उद्देश त्या लेखाचे संबधीत लेखाचे सुधारणा घडवून आणणार्‍या विशीष्ट प्रक्ल्पा संबधीत वर्गीकरणाचा असतो. या सुधारणा काळाच्या ओघात होणे अपेक्षीत असते आणि हे सहसा सार्वत्रिक सहयोगाचे अवाहन असते. पण बर्‍याचदा खासकरून नवीन सदस्य या सूचना साचे व्यक्तिगत टिपण्णी वाटत असावेत असे मला आढळून आले आहे. असा गैरसमज होऊ नये याकरिता काही तरी करावयास हवे पण नेमके काय करता येईल ते ठरवता येत नाही आहेत. काही सूचना असतील तर त्या कळवाव्यात.
विस्तार साचात काहितरी तांत्रीक अडचण आहे कि ज्यामुळे तो बर्‍याचदा तुटल्या सारखा दिसतो.
लेखांवर साचे लावण्याचे कारण बर्‍याचदा त्याचे आपोआप ज्या प्रकारची सुधारणाहवी आहे त्या वर्गात आणि प्रक्ल्पात वर्गीकरण होते.लेख पानावंर साचांची गर्दी होऊ नये म्हणून लेख प्रकल्पान्वये चर्चा पान साचे असावयास हवेत. पण हे सर्व करण्यास पुरेसे संपादन (सक्रीय सदस्य) बळ हवे या मुद्द्यावर गाडी येऊन अडते खरी.
व्यक्तिगत प्रोत्साहनात्मक मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू/मार्गदर्शक प्रकल्पाची योजना आखली आहे पाहू कसा काय रिस्पॉन्स मिळतो ते.
शुद्धलेखन विषयक बर्‍याच साचांची मी रचना केली आहे ते संबधीत प्रकल्पात पाहून सुधारता येतील पण खास करून विकिपीडिया:शुद्धलेखनाचे नियम/आमाआका साचात योगदान आणि त्याचा वापर सदस्यांकडून चर्चा पानावर वाढवून हवा आहे . तो कसा वाढवता येईल याबद्दलही प्रतिसादाची अपेक्षा आहे.माहितगार ०७:२८, १२ डिसेंबर २००९ (UTC)

मा.संभाजीराजे, सादर नमस्कार

मी प्रथमतः विकिवर काम करणे सुरु केले तेंव्हा माझाही असाच गैरसमज झाला होता.कालांतराने,चर्चा व प्रश्न विचारुन आणि येथील नियम समजुन घेउन मग मलाच कळले कि तो निव्वळ माझा गैरसमज होता.मला वाटते कि, कोणाचीही अशी भावना नाही कि आपण लिखाण करु नये. याउलट, येथील जुने सदस्य कोणासही सर्वतोपरी मदतच करतात. अडचणीत साथ देतात.मार्गदर्शन करतात.अहो! आधीच मराठीत लिखाण करणार्‍यांची वानवा. त्यातच आपल्यासारखे सुजाण रागावले तर कसे होणार? नका रागावु.बर्‍याच दिवसांनी येथे राजकारण व राजकिय व्यक्तिंबद्दल समर्थपणे लिहिणारा आला आहे.आमचे माहितगार सतत कितीतरी तास खपुन सतत प्रयत्न करीतात,लोकांनी यावे म्हणुन,लिहावे म्हणुन. राजकारणाशी संबंधीत म्हणुन आणि नाव संभाजीराजे म्हणुन थोडी गंमत करतो. सत्तेत असुन विरोधी पक्षात असल्यासारखे रागावु नका असाच माझा वडिलकीचा सल्ला.(वरील लिखाणात व्यक्त झालेले विचार माझे वैयक्तिक आहेत)

वि. नरसीकर (चर्चा) ०८:०१, १२ डिसेंबर २००९ (UTC)

मंत्रीमंडळ, मंत्रीपद

संपादन

संभाजीराजे,

आपल्या सर्वांच्या उत्तराबद्दल धन्यवाद. माझा गैरसमज दूर झाला आहे. वेळ मिळेल त्याप्रमाणे मराठी विकीवर भारतीय राजकारण विषयक लेख लिहायला आवडतील.

याने मला किती आनंद झाला आहे याचे मला वर्णन करता येत नाही. मराठी विकिपीडियावरील प्रत्येक सदस्य/संपादक अमोल आहे व त्यांच्या साहाय्यानेच हा गोवर्धन उचलला जाईल याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यात तुमच्यासारख्या संपादकाने मनातील किल्मीष काढून टाकून पुन्हा एकदा मराठी विकिपीडियावर योगदान देण्याचे ठरवल्याने हा भार अधिकच हलका झाल्याचे वाटले. तुम्ही ही खात्री बाळगा की येथील बहुतांश सदस्य केवळ मायमराठीची सेवा करण्यासाठीच झटत आहेत. व्यक्तिगत हेव्यादाव्यांना येथे स्थान नाही. प्रबंधक/प्रचालक या नात्याने मी ही जबाबदारी गेली चार वर्षे पार पाडत आलो आहे व पुढेही शक्य तितका काळ करण्याचा मनसुबा आहे. तुम्हाला काही अडचण आली तर निःसंकोचपणे ती माझ्यापर्यंत पोचवावी, योग्य ती कारवाई करण्याचे मी तुम्हाला (आणि विकिपीडियावरील सगळ्याच सदस्यांना) वचन देत आहे. याशिवाय तुम्हाला कोणतीही मदत लागली तर येथील सदस्य ती देण्यासाठी तत्पर आहेत याची मला खात्री आहे.

अवांतर: मंत्रीमंडळ आणि मंत्रीपद या शब्दांमध्ये चुकीचे काय आहे? मराठी वर्तमानपत्रांमध्ये हे दोन शब्द सर्रास वापरले जातात.

दोन्ही शब्दांना वेगवेगळा context आहे. माझ्या मते मंत्रीमंडळ हे मंत्र्यांच्या एकाचवेळच्या गटाला संबोधतात (विलासराव देशमुख मंत्रीमंडळ, इंदिरा गांधी १९८० मंत्रीमंडळ) तर कोणत्याही काळी मंत्री असलेल्या व्यक्तीला मंत्रीपद होते/आहे असे म्हणता येईल.

पुन्हा एकदा मनापासून स्वागत!!

अभय नातू ०७:३०, १३ डिसेंबर २००९ (UTC)

नमस्कार

संपादन

लय बरं वाटलं आपणास परत पाहून.कृपया ज्योती बसू च्या लेखात मला मदत करा विनोद रकटे २०:११, २८ जानेवारी २०१० (UTC)

मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख

संपादन

नमस्कार! विकिपीडिया:चावडी#मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख येथे 'उदयोन्मुख लेख' या नव्या संकल्पित मुखपृष्ठ सदराबद्दल सर्व विकिकर सदस्यांना जाहीर आवाहन लिहिले आहे. त्या आवाहनाला आपणही सकारात्मक व उत्साही प्रतिसाद द्यावा, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:३२, २ फेब्रुवारी २०१० (UTC)

तेलुगू देसम

संपादन

संभाजीराजे, नुकत्याच संपादलेल्या काही लेखांमध्ये तुम्ही 'तेलुगु देसम' असे लेखन साच्यांमध्ये, वर्गांमध्ये, मजकुरात केले आहे. ते योग्य नाही; योग्य लेखन 'तेलुगू देसम' (गू दीर्घ) असे हवे. कृपया दुरुस्त्या कराव्यात.

अजून एक सूचना : इसवी सनांचे दुवे लिहिताना असे लिहावेत : [[इ.स. २००९|२००९]] => असे दिसेल : २००९

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:०५, ४ फेब्रुवारी २०१० (UTC)

भारतीय राजकारणी

संपादन

नमस्कार संभाजीराजे!

आपण भारतीय राजकारण्यांविषयीच्या लेखांमध्ये भर घालत असल्याचे पाहून सदर लेखांबद्द्ल जाणवलेली एक उणीव आपल्या निदर्शनास आणून द्यावीशी वाटते - भारतीय राजकारण्यांच्या बहुसंख्य लेखांच्या सुरुवातीस त्या-त्या व्यक्तीची ओळख करून देणारे वाक्य या ढंगाचे दिसत आहे :

अमुक ढमुक तमुक (जन्मदिनांक - मृत्युदिनांक/हयात) हे ह्या-किंवा-त्या पक्षाचे राजकारणी आहेत.

या वाक्यात खरे पाहता त्या-त्या व्यक्तीच्या राष्ट्रीयत्वाची अथवा राष्ट्रकत्वाची माहिती प्रथम नोंदवून, मग पक्षाबद्द्लची ओळख नोंदवणे अधिक योग्य ठरेल. उदा. : अमुक-तमुक' (जन्मदिनांक - मृत्युदिनांक/हयात) हे अबक देशातील ह्या-किंवा-त्या पक्षाचे राजकारणी आहेत

असे लिहिण्याचे प्रयोजन असे की, आपण मराठी विकिपीडियावरील वाचक भारतीय राष्ट्रीयत्वाचे/नागरिकत्वाचेच मराठी भाषक असतील असे गृहित धरणे योग्य ठरणार नाही. इस्राएलातील मराठी भाषक बेने-इस्राएली किंवा मॉरिशसातले मराठी भाषक हे आंतरराष्ट्रीय मराठी भाषक समाजाचा महाराष्ट्रीय / भारतीय मराठी भाषकांप्रमाणेच महत्त्वाचा हिस्सा आहेत आणि मराठी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे, ही वस्तुस्थिती दुर्लक्षिणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे मराठी विकिपीडियावरील लेखांमध्ये देशाचा (= राष्ट्रीयत्वाचा) किंवा राष्ट्रकत्वाचा उल्लेख करण्याचा संकेत पाळणे उत्तम! अर्थात ही तुमच्या लेखनातील त्रुटी असण्यापेक्षा आधीच्या संपादकांच्या लेखनातील उणीव असू शकते.. फक्त आपण सध्या त्या विषयावरील लेखांमध्ये भर घालत आहात, म्हणून ही विनंती/सुचवणी.

धन्यवाद!

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:४१, १२ नोव्हेंबर २०१० (UTC)

धन्यवाद

संपादन

आपल्या योगदानाकडे सहज लक्ष गेले. उत्कृष्ट योगदानासाठी धन्यवाद. मराठी विकीपेडिया उद्याच्या महाराष्ट्रासाठी आहे, जेव्हा आपली खेडी संगणक वापरू लागतील. गणेश धामोडकर ०३:४४, १५ ऑक्टोबर २०१० (UTC)

निःसंदिग्धीकरण

संपादन

नमस्कार संभाजीराजे!

तुम्ही अभय नातू यांच्या चर्चापानावर पुसलेल्या निःसंदिग्धीकरणाच्या दृष्टीने माहिती द्यायचा प्रयत्न करतो - मला वाटते इम्तियाझ अहमद या नावाचा लेख मुख्य निःसंदिग्धीकरण करणारा लेख ठेवावा, ज्यावर अन्य विवक्षित संदर्भांतील लेखांची सूची असेल (उदाहरणार्थ en:Imtiaz Ahmed ह इंग्लिश विकिपीडियावरील लेख पाहावा. त्यवरून निःसंदिग्धीकरणाची कल्पना येईल.). खालील पायर्‍यांनुसार काम करता येईल :

  1. इम्तियाझ अहमद (क्रिकेट खेळाडू) या नावाचा लेख बनवून सध्याच्या क्रिकेटपटूविषयक लेखातील मजकूर तिथे हलवावा.
  2. इम्तियाझ अहमद (राजकारणी) या नावाचा लेख तयार करून तिथे राजकारणी असलेल्या इम्तियाझ अहमदाविषयीचा मजकूर नोंदवावा.
  3. नंतर इम्तियाझ अहमद या लेखात वरील दोन लेखांचे दुवे नोंदवावेत व त्या-त्या दुव्यापुढे संदर्भपर एका ओळीत व्याख्या/माहिती नोंदवावी. या लेखाचे वर्गीकरण वर्गःनिःसंदिग्धीकरण या वर्गात करावे (या वर्गातील अन्य लेख चाळल्यास निःसंदिग्धीकरण प्रक्रियेची सर्वसाधारण पद्धत सहजगत्या कळेल.).
  4. वरील पहिल्या दोन लेखांमध्ये साचा:हा लेख हा साचा वापरून निःसंदिग्धीकरणाविषयीची सूचना लेखाच्या माथ्यावर लावावी.

धन्यवाद.

ता.क. : भारतीय राजकारण्यांविषयीच्या आधीच्या लेखांमध्ये राष्ट्रीयत्व/ राष्ट्रकत्व यांची नोंद भरण्याविषयीची आपली सूचना ध्यानात आहे.. मात्र सांगकाम्या वापरताना रेगेक्स वापरून थोडे जटिल स्क्रिप्टिंग करावे लागेल, असे वाटते.. त्यासाठी थोडा वेगळा वेळ काढून किडे करावे लागतील.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:२७, १६ नोव्हेंबर २०१० (UTC)

एक-हजारी बार्नस्टार

संपादन
  एक-हजारी बार्नस्टार
संभाजीराजे, तुम्ही मराठी विकिपीडियावर १,०००पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.

विकिपीडियावरील तुमच्या अथक परिश्रमांची दखल घेऊन मराठी विकिपीडियाच्या वतीने हा एक-हजारी बार्नस्टार गौरव तुम्हांला प्रदान करण्यात येत आहे.


 वि. आदित्य (चर्चा) १४:४४, ३ डिसेंबर २०१० (UTC)

आगमनाचे स्वागत

संपादन

बर्‍याच दिवसांनी परत विकिवर आल्याबद्दल आपले स्वागत. आशा करतो लोकसभा सदस्य, राजकारणी लोकांच्या माहितीचे व आपल्या आवडीचे योगदान विकिपीडियावर चालूच ठेवाल. संतोष दहिवळ २३:२१, १९ फेब्रुवारी २०१२ (IST)Reply

Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)

संपादन
Keyboard input Converted to
rya र्य
rrya ऱ्य
rha र्ह
rrha ऱ्ह
nja
nga
a^
shU/// शूऽऽ
Ll
Lll
hra ह्र
hR हृ
R
RR
ka` क़
k`a क़
\.
\.\

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

संपादन

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया आशियाई महिना २०२३

संपादन
 

प्रिय विकिसदस्य,

विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संतोष गोरे , संदेश हिवाळे किंवा टायविन यांना संपर्क करावा.

धन्यवाद.

आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.