श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१४
मानधनाच्या वादावरून वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने दौरा अर्धवट सोडल्यानंतर श्रीलंका क्रिकेट संघ ३० ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर २०१४ दरम्यान पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला.[१] भारताने मालिका ५-० अशी जिंकली आणि एकदिवसीय इतिहासातील त्याचा चवथा ५-० असा व्हाईटवॉश दिला. ०-५ ने हा श्रीलंकेचा पहिलाच व्हाईटवॉश.
श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा २०१४-१५ | |||||
भारत | श्रीलंका | ||||
तारीख | ३० ऑक्टोबर २०१४ – १६ नोव्हेंबर २०१४ | ||||
संघनायक | विराट कोहली | अँजेलो मॅथ्यूज | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | विराट कोहली (३२९) | अँजेलो मॅथ्यूज (३३९) | |||
सर्वाधिक बळी | अक्षर पटेल (११) | अँजेलो मॅथ्यूज (४) | |||
मालिकावीर | विराट कोहली (भारत) |
चवथ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने २६४ धावा केल्या, आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा नवा विक्रम केला. त्याने डावात ३३ चौकार मारले, हा सुद्धा एक विश्वविक्रम आहे. ॲलिस्टर ब्राउनचा लिस्ट अ सामन्यातील २६८ धावांचा विक्रम त्याच्याकडून फक्त चार धावांनी हुकला.[२]
संघ
संपादनएकदिवसीय सामने | |
---|---|
भारत[३][४] | श्रीलंका[५][६] |
दौरा सामने
संपादनलिस्ट अ: भारत अ वि. श्रीलंका
संपादन
एकदिवसीय मालिका
संपादन१ला एकदिवसीय सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : श्रीलकां, गोलंदाजी
- लाहिरू गमाजेचे (श्री) एकदिवसीय पदार्पण.
- सुरेश रैनाचा (भा) २०० वा एकदिवसीय सामना.
१ला एकदिवसीय सामना अगदी एकतर्फी झाला. शांत सुरुवात केल्यानंतर पहिला पॉवरप्ले संपल्यावर आणि दुसरा पॉवरप्ले लवकर घेतल्यावर २१ ते ३० षटकांदरम्यान भारताने १०५ धावा केल्या. अजिंक्य रहाणे (१११) आणि शिखर धवन (११३) या दोन्ही सलामीवीरांनी ३५ षटकांत २३१ धावांची भक्कम सलामी दिल्यानंतर सुरेश रैनाच्या झटपट ५० धावांमुळे भारताने श्रीलंकेसमोर ३६३ धावांचा डोंगर उभा केला. श्रीलंकेच्या सलामीवीरांनीसुद्धा सावध सुरुवात केली, परंतु सलामीवीर दिलशान बाद झाल्यानंतर ठराविक अंतरावर श्रीलंकेचे गडी बाद होत गेले आणि त्यांचा डाव १९४ धावांत आटोपला. भारताने सामना १६९ धावांनी जिंकला. इशांत शर्माने त्याची एकदिवसीय गोलंदाजीतील सर्वोच्च कामगिरी नोंदवली. चवथ्या षटकात स्नायू दुखावला गेल्यामुळे वरुण आरोनला मैदान सोडावे लागले.[८][९]
२रा एकदिवसीय सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
दुसरा एकदिवसीय सामना सुद्धा आणखी एक एकतर्फी सामना होता. पहिल्याच षटकात श्रीलंकेने कुशल परेराचा विकेट गमावला, त्यानंतर दिलशान आणि संगाकाराच्या आक्रमक फलंदाजीनंतरही भारताने सामना आपल्या अधिपत्याखाली ठेवला होता. परंतू, थिसारा परेराने शेवटी केलेली फटकेबाजी आणि कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने केलेल्या नाबाद ९२ धावांच्या जोरावर श्रीलंकेने निर्धारित ५० षटकांत २७४ धावा केल्या. पाठलाग करताना अजिंक्य रहाणे लवकर बाद झाला, परंतु २ऱ्या आणि ३ऱ्या गड्यासाठी झालेल्या १००+ भागीदारीच्या जोरावर भारताने ४४.१ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात सहज विजय मिळवला. अंबाती रायडूने (१२१) त्याचे पहिलेवहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक झळकावले. [१०][११]
३रा एकदिवसीय सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
श्रीलंकेच्या डावाची सुरुवात खुपच खराब झाली, पहिल्याच षटकात उमेश यादवने कुशल परेराला बाद केले. महेला जयवर्धने आणि तिलकरत्ने दिलशानच्या १०५ धावांच्या भागीदारीमुळे श्रीलंकेच्या डावाला आकार मिळाला. परंतु पॉवरप्ले मध्ये अक्षर पटेलच्या तीन षटकांमधील तीन बळींमुळे श्रीलंकेच्या डावाची गती मंदावली. जयवर्धनेचे शानदार शतक आणि दिलशानच्या ५० धावांमुळे श्रीलंकेने २४२ धावा केल्या. भारताने उत्तरादाखल सकारात्मक सुरुवात केली आणि शिखर धवनच्या ७९ चेंडूंतील ९१ धावांमुळे भारताच्या विजयाचा पाया रचला गेला. कर्णधार विराट कोहलीच्या ५३ धावांच्या खेळी दरम्यान त्याने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद ६००० धावांचा टप्पा ओलांडला. उमेश यादवने कारकिर्दीत प्रथमच ४ गडी बाद करण्याचा पराक्रम केला. या विजयासह भारताने मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली.[१२][१३]
४था एकदिवसीय सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
- कर्ण शर्माचे भारतातर्फे एकदिवसीय पदार्पण
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात दोन द्विशतके झळकाविणारा रोहित शर्मा पहिलाच फलंदाज.
- रोहित शर्माच्या २६४ धावा ही एकदिवसीय क्रिकेट मधील एका डावातील सर्वोच्च धावसंख्या होय.
मालिकेतील चवथा सामना हा एकाच व्यक्तिचा होता, ती व्यक्ती म्हणजे रोहित शर्मा. ऑगस्ट २०१४ मध्ये इंग्लंडविरूद्ध खेळताना बोटाला झालेल्या फ्रॅक्चर नंतर संघाबाहेर असलेल्या रोहितचा हा त्यानंतरचा पहिलाच सामना, ज्यात त्याने ९ षट्कार आणि ३३ चौकारांसहीत १७३ चेंडूंत २६४ धावांची स्फोटक खेळी केली. आणि भारताने निर्धारित ५० षटकांत ४०४ धावांचा डोंगर उभा केला. त्याने कर्णधार विराट कोहलीसोबत ३ऱ्या गड्यासाठी २०२ धावांची तर ५व्या गड्यासाठी रॉबिन उथप्पासोबत १२८ धावांची भागीदारी केल, ज्यात उथप्पाने फक्त १६ धावांचे योगदान दिले. श्रीलंकेचे पहिले ४ फलंदाज अवघ्या ४८ धावा काढून तंबूत परतले. अँजेलो मॅथ्यूज आणि लाहिरु थिरीमाने यांच्या अर्धशतकामुळे भारताचा विजय काहीसा लांबला. ४३.१ षटकांत २५१ धावांमध्ये श्रीलंकेचा संपूर्ण संघ बाद झाला आणि भारताने सामना जिंकून मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली. [१५]
५वा एकदिवसीय सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका , फलंदाजी
- केदार जाधव (भारत) आणि निरोशन डीक्वेल्ला (श्रीलंका) यांचे एकदिवसीय पदार्पण.
श्रीलंकेच्या डावाची सुरुवात आधीच्या सामन्यांप्रमाणेच झाली. ४५ धावांमध्ये दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर कर्णधार अँजेलो मॅथ्यूज (१३९) आणि लाहिरु थिरीमाने (५२) यांच्या १२८ धावांच्या भागीदारीने श्रीलंकेचा डाव सावरला. शेवटच्या १० षटकांत ११४ आणि शेवटच्या ५ षटकात श्रीलंकेने ७३ धावा केल्या, आणि श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी २८७ धावांचे लक्ष्य ठेवले. उत्तरादाखल फलंदाजीस उतरलेल्या भारताच्या डावाची सुरुवातही अडखळतच झाली. आधीच्या सामन्यातील द्विशतकवीर रोहित शर्मा अवघ्या ९ धावांवर बाद झाला, आणि भारताची अवस्था ४.३ षटकांत २ बाद १४ अशी झाली त्यानंतर अंबाती रायडू (५९) आणि विराट कोहलीच्या नाबाद १३९ धावांच्या जोरावर भारताने ४९ व्या षटकात ३ गडी राखून विजयी लक्ष्य पार केले. आणि श्रीलंकेला ५-० असे पराभूत करून व्हाईटवॉश दिला.
आकडेवारी
संपादनफलंदाजी
संपादन- सर्वाधिक धावा[१६]
देश | खेळाडू | डाव | धावा | चेंडू | स | स्ट्रा.रे. | सर्वोच्च | १०० | ५० | ४ | ६ |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
अँजेलो मॅथ्यूज | ५ | ३३९ | ३३१ | ११३.०० | १०६.३९ | १३९* | १ | २ | २९ | १२ | |
विराट कोहली | ५ | ३२९ | ३१६ | ८२.२५ | १०६.३९ | १३९* | १ | २ | २६ | ६ | |
शिखर धवन | ३ | २८३ | २६६ | ९४.३३ | १०६.६३ | ११३ | १ | २ | २९ | ५ | |
रोहित शर्मा | २ | २७३ | १८५ | १३६.५० | १४७.५६ | २६४ | १ | ० | ३४ | ९ | |
अंबाती रायडू | ५ | २५० | २७२ | ६२.५० | ९१.९१ | १२१* | १ | १ | २४ | ५ |
गोलंदाजी
संपादन- सर्वाधिक बळी[१७]
देश | खेळाडू | डाव | बळी | सरासरी | धावा | स्ट्रा. रे. | इकॉनॉमी | सर्वोत्तम | ४ब | ५ब |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
अक्षर पटेल | ५ | ११ | १८.०९ | १६९ | २३.५ | ५.०७ | ३/४० | ० | ० | |
उमेश यादव | ४ | १० | १५.७५ | १६९ | २४.०० | ५.०७ | ४/५३ | १ | ० | |
धवल कुलकर्णी | ३ | ८ | १८.०२ | १४९ | २७.०० | ४.७७ | ४/३४ | १ | ० | |
रविचंद्रन अश्विन | ४ | ६ | ३३.३३ | २०० | २७.०० | ७.४० | २/४९ | ० | ० | |
इशांत शर्मा | ३ | ४ | २६.५० | १०१ | ३८.०० | ५.३१ | ४/३४ | १ | ० |
बाह्यदुवे
संपादनसंदर्भयादी
संपादन- ^ "वेस्ट इंडीज ऐवजी श्रीलंका पाच एकदिवसीय सामने खेळणार" (इंग्रजी भाषेत).
- ^ "रोहित शर्मा: भारतीय फलंदाजाचा एकदिवसीय क्रिकेटमधील धावांचा विश्व विक्रम" (इंग्रजी भाषेत).
- ^ "भारताचा १-३ एकदिवसीय संघ" (इंग्रजी भाषेत).
- ^ "भारताचा ४-५ एकदिवसीय संघ" (इंग्रजी भाषेत).
- ^ "श्रीलंकेचा १-३ एकदिवसीय संघ" (इंग्रजी भाषेत).
- ^ "श्रीलंकेचा ४-५ एकदिवसीय संघ" (इंग्रजी भाषेत).
- ^ a b c d "श्रीलंकेचा शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी संघात बदल" (इंग्रजी भाषेत).
- ^ "धवन आणि रहाणेच्या फलंदाजीमुळे श्रीलंकेचा पराभव" (इंग्रजी भाषेत).
- ^ "वरुण आरोनचा पाय दुखावला" (इंग्रजी भाषेत).
- ^ "रायुडुच्या शतकामुळे भारताची २-० अशी आघाडी" (इंग्रजी भाषेत).
- ^ "मॅथ्यूज २०१४ सालातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज" (इंग्रजी भाषेत).
- ^ "कोहली आणि धवनमुळे मालिका विजय" (इंग्रजी भाषेत).
- ^ "कोहली आणि धवनने मोडले मोठे विक्रम" (इंग्रजी भाषेत).
- ^ "रोहितचा हल्ला" (इंग्रजी भाषेत).
- ^ "रोहित २६४, श्रीलंका २५१" (इंग्रजी भाषेत).
- ^ "सर्वाधिक धावा – भारत वि. श्रीलंका एकदिवसीय मालिका".[permanent dead link]
- ^ "सर्वाधिक बळी– भारत वि. श्रीलंका एकदिवसीय मालिका".[permanent dead link]
श्रीलंका क्रिकेट संघाचे भारत दौरे | |
---|---|
१९८२ | १९८६-८७ | १९९० | १९९४ | १९९७ | २००५ | २००७ | २००९ | २०१४ | २०१६ | २०१७-१८ | २०१९-२० |