विजयवाडा जंक्शन रेल्वे स्थानक
विजयवाडा जंक्शन (तेलुगू: విజయవాడ జంక్షన్) हे आंध्र प्रदेशच्या विजयवाडा शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्रातील विजयवाडा विभागाचे मुख्यालय असलेले विजयवाडा देशातील सर्वात वर्दळीच्या व महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक आहे. कोलकाता-चेन्नई व दिल्ली-चेन्नई हे देशामधील दोन प्रमुख रेल्वेमार्ग विजयवाडामध्ये जुळतात. त्यामुळे विजयवाडामध्ये दररोज सुमारे २५० एक्सप्रेस गाड्या थांबतात.
विजयवाडा విజయవాడ జంక్షన్ पूर्व तटीय रेल्वे स्थानक | |
---|---|
फलक | |
स्थानक तपशील | |
पत्ता | विजयवाडा, आंध्र प्रदेश |
गुणक | 16°31′6″N 80°37′8″E / 16.51833°N 80.61889°E |
मार्ग |
हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग विजयवाडा-गुंटकल मार्ग |
फलाट | १० |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. १८८८ |
विद्युतीकरण | होय |
संकेत | BZA |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | दक्षिण मध्य रेल्वे |
स्थान | |
|
सिकंदराबाद हे जरी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय असले तरीही विजयवाडा विभाग हा दक्षिण मध्य रेल्वेचा सर्वाधिक महसूल मिळवणारा विभाग आहे.
महत्त्वाच्या रेल्वेगाड्या
संपादनभारतामधील हिमसागर एक्सप्रेस व दिब्रुगढ–कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस ह्या सर्वाधिक अंतर धावणाऱ्या दोन गाड्या विजयवाडामार्गे जातात.