गोदावरी एक्सप्रेस भारतातल्या आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम ते तेलंगणाच्या हैदराबाद या शहरांदरम्यान धावणारी दक्षिण मध्य रेल्वेची एक प्रसिद्ध व लोकप्रिय रेल्वेगाडी आहे. आंध्र प्रदेशातील पूर्वपश्चिम गोदावरी जिल्ह्यांतील प्रदेशातून धावते म्हणून या रेल्वेचे नाव गोदावरी एक्सप्रेस ठेवलेले आहे.

गोदावरी एक्सप्रेस
माहिती
सेवा प्रकार जलदगती एक्सप्रेस
प्रदेश आंध्र प्रदेश, तेलंगणा
शेवटची धाव अद्याप सुरू
चालक कंपनी दक्षिण मध्य रेल्वे, भारतीय रेल्वेचा विभाग
मार्ग
सुरुवात हैदराबाद
थांबे १८
शेवट विशाखापट्टणम
अंतर ७१० किमी
साधारण प्रवासवेळ १२ तास ४५ मिनिटे
वारंवारिता रोज
प्रवासीसेवा
प्रवासवर्ग शयनयान, ए.सी. १,२,३
तांत्रिक माहिती
गेज ब्रॉडगेज
विद्युतीकरण पूर्ण मार्ग
नकाशा

इतिहास

संपादन

ही सेवा १ फेब्रुवारी, इ.स. १९७४ रोजी वाल्टेर–हैद्राबाद एक्सप्रेस नावाने सुरू झाली. तेव्हा या रेल्वेचे गाडी क्रमांक ७००७ व ७००८ होते. या गाडीस एक वाफेच्या इंजिन व १७ डबे जोडले जायचे. सन १९७५ साली या आगगाडी स्लीपरची सोय केली व जास्तीचे ५ डबे जोडले. या गाडीचा समळकोट ते राजमहेंद्री दरम्यानचा कमाल वेग ताशी ५० कि.मी. होता. त्यावेळी ही गाडी डीझेल इंजिनावर धावू लागली. सन १९९०मध्ये ही रेल्वे खूपच प्रसिद्ध झाल्याने या रेल्वेला आणखी दोन बोगी जोडल्या. त्या कारणाने २४ डबे असणारी भारतातील ही एक सर्वात लांब रेल्वे ठरली. पुढे या विशाखापट्टणम ते हैदराबाद लोहमार्गाचे विद्युतीकरण झाले व WAP 4 नावाच्या विजेच्या इंजिनावर ही रेल्वे धावू लागली. सन २०००मध्ये ही गाडी, प्रथम वर्गाचे ६ वातानुकूलित डबे असणारी दक्षिण मध्य रेल्वेची पहिली रेल्वे ठरली. सन २०११मध्ये ही रेल्वे "गरीब रथ दुरन्तो ट्रेन" ह्या नावाने ओळखली जाऊ लागली आणि काही काळानंतर हिचे नाव गोदावरी (सुपरफास्ट) एक्सप्रेस झाले.

प्रस्थान व आगमन वेळा

संपादन

विशाखापट्टणम ते हैद्राबाद दरम्यान ही आगगाडी रोज धावते. या रेल्वेच्या वेळा खालीलप्रमाणे आहेत.[]

ठिकाण गाडी क्रं. प्रस्थानाची वेळ आगमनाचे ठिकाण आगमनाची वेळ (दुसरा दिवस)
विशाखापट्टणम १२७२७ संध्याकाळी ५.३० हैद्राबाद सकाळी ६.४५
हैद्राबाद १२७२८ संध्याकाळी ५.१५ विशाखापट्टणम सकाळी ६.४५

मार्ग व स्थानक

संपादन

विशाखापट्टणम ते हैद्राबाद दरम्यान एकीण १८स्थानके आहेत.

विजयवाडा जंक्शन
राजमहेंद्री
सिकंदराबाद जंक्शन
खम्माम
वरंगळ
काझीपेट
दुव्वडा
अनाकपल्ली
इलामणचिल्ली
१० नरसीपट्टणम
११ तुनी
१२ अन्नावरम
१३ पिठापुरम
१४ समळकोट जंक्शन
१५ अनापार्टी
१६ निदादाओलू जंक्शन
१७ तडेपल्लीगुदेम
१८ इलुरू


टीप : ही आगगाडी १ व २ क्रमांकाच्या स्थानकांत प्रत्येकी ५ मिनिटे, ३ऱ्या, ४थ्या व ५व्या क्रमांकाच्या स्थानकांवर प्रत्येकी २ मिनिटे व त्यापुढील सर्व स्थानकांवर प्रत्येकी १ मिनिट थांबते.[][]

इतर सेवा

संपादन
  1. शयनयान बोगीत चादरी, उशा व गरम कांबळी मोफत पुरविल्या जातात.
  2. IRCTC मार्फत तिकिटाची ऑनलाईन बुकिंग व्यवस्था आहे.
  3. प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणी वातानुकूलित बोगी आरामदायक, आवाजरहित, व स्वच्छ आहेत.
  4. गाडीमध्ये ५० रु.त जेवण, तसेच १०रु.त चहा, दूध, कॉफी मिळते.

दुर्घटना

संपादन
  1. सन 2011च्या दरम्यान, जुलै व ऑगस्ट मध्ये या रेल्वेच्या वातानुकूलित बोगीत दरोडा पडला होता.
  2. 6 क्रमांकाच्या बोगीत बॉम्ब आहे अशी अफवा पसरवली होती.
  3. वरंगळ जवळ घाणापुर येथे ही रेल्वे घसरली होती.

यामुळे रेल्वेने या गाडीच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केलेली आहे.

बोगींची रचना

संपादन

या रेल्वे गाडीला WAP 7[] विद्युत इंजिनसह २४ बोगी, त्यांतील ६ वातानुकूलित.

लगेज कम स्लीपर व्हॅन 2
अनरिझर्व्हड जनरल बोगी 2
जनरल रिझर्व बोगी 2
त्रि-टायर श्रेणी बोगी 3
द्वि-टायर श्रेणी बोगी 2
प्रथम श्रेणी बोगी 1
क्लासिक स्लीपर वर्ग बोगी 12

रेल्वेचे प्रवास भाडे

संपादन

दि. २-४-२०१२पासून या रेल्वेचे प्रवास भाडे दर खालील प्रमाणे आहेत[] :

लगेज कम स्लीपर कार, अनरिझर्व्हड सामान्य बोगींचे प्रवास भाडे वेळोवेळी कमी-जास्त होत असते.
क्लासिक स्लीपर वर्ग रु. 297/- (USS 4.70)
तृतीय श्रेणी स्लीपर वातानुकूलित बोगी रु. 779/- (USS 12)
द्वितीय श्रेणी वातानुकूलित रु. 1170/- (USS 18)
प्रथम वर्ग रु. 1990/- (USS 31)

संदर्भ

संपादन
  1. ^ "गोदावरी सुपरफास्ट एक्सप्रेस वेळापत्रक" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "गोदावरी एक्सप्रेस स्थानके विशाखापट्टणम ते विजयवाडा दरम्यान" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "गोदावरी एक्सप्रेस" (इंग्लिश भाषेत). 2014-08-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-04-25 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "एलजीडी WAP 7 गोदावरी एक्सप्रेसचा नवीन पोशाख" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "रेल्वेचे प्रवास भाडे वाढ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)