कोरोमंडल एक्सप्रेस
कोरोमंडल एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी वाहतूक सेवा पुरवणारी गाडी आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासामध्ये सुरुवातीपासून भारताच्या पूर्व किना-यावरून हावडा (कलकत्ता) येथील हावडा रेल्वे स्थानक (एचडब्ल्यूएच) आणि चेन्नईमधील चेन्नई सेंट्रल (एमएएस) स्थानकादरम्यान ही दररोज धावणारी जलद गाडी आहे. बंगालच्या उपसागरासह भारताच्या पूर्व किना-याला कोरोमंडल किनारा असे म्हणतात आणि म्हणून या गाडीला कोरोमंडल असे नामकरण केलेले आहे. ही गाडी पूर्ण कोरोमंडल किना-याला आरपार रस्त्याने जोडलेली आहे. ही गाडी दक्षिण पूर्व रेल्वे क्षेत्राद्वारे चालवली जाते व ती हावडा−चेन्नई रेल्वेमार्गावरून धावते.
इतिहास
संपादनतामीळमध्ये चोला राजघराण्याच्या जमीनीला चोलामंडलम किंवाचोलाचे राष्ट्र असे म्हणतात. भारतीय व्दिपकल्पाच्या दक्षिणपूर्व किना-याला कोरोमंडल असे नांव दिलेले आहे.
वेळ
संपादन१२८४१ आणि १२८४२ असे या गाडीचे क्रमांक आहेत. १२८४१ क्रमांकाची गाडी हावडयावरून १४.५० वाजता निघून चेन्नई मध्य येथे दुस-या दिवशी १७.१५ वाजता पाहोचते. १२८४२ क्रमांकाची गाडी चेन्नई मध्य वरून 8.45 वाजता निघून हावडा येथे दुस-या दिवशी १२ वाजता पाहोचते.[१] वरील प्रवासामध्ये ही गाडी १६६२ कि. मी. इतके अंतर कापते.
लोको लिंक्स
संपादनरेल्वे मंडळाकडून प्रमाणित केलेल्या लोको लिंक्सद्वारे - डब्ल्यू ए पी-4 क्लास इलेक्ट्रिक लोकोमोटीव्हस मार्फत ही ट्रेन हावडा ते विशाखापट्टण्णम पर्यंत आणि त्यानंतर चेन्नईला जाणा-या रोयापुरम आधारीत लोकोलिंक्सद्वारे खेचली जाते. दक्षिण पूर्व रेल्वे विभागाचा इलेक्ट्रिक लोको शेड 5000 एचपी लोकामोटीव्हसकडे १३० कि.मी.प्रति तास इतका प्रवास करण्याची क्षमता आहे, परंतु विभागीय वेगाची मर्यादा असल्यामुळे कोरोमंडल एक्स्रपेसला ११० ते १२० कि.मी.प्रति तास इतकाच प्रवास करण्याची परवानगी आहे. इलेक्ट्रिकरण झाल्यानंतर लगेचच ही ट्रेन सिकंदराबाद (लालागौडा) आधारीत डब्लयू ए पी – ४ लोको चेन्नईवरून हावडापर्यंत खेचून नेण्यात आली परंतु विशाखापट्टणम लोकोपासून परत उलट प्रवास करण्यास जास्तीचा वेळ लागत असल्याकारणाने संत्रगंजी आधारीत लोको हावडयावरून विशाखापट्टणम आणि परत विशाखापट्टणम वरून चेन्नईपर्यंत इरोड आधारीत लोकोपर्यंत प्रवास करण्यात येतो. रोयापूरम शेड चेन्नईजवळ तयार झाला त्यावेळी रोयापूरम आधारीत लोको विशाखापट्टणमपासून चेन्नईपर्यंत वापरात आणला गेला.
वेग
संपादन१६६२ कि.मी.इतका प्रवास १२० कि.मी./प्रति तास या वेगाने २७ तास ५ मिनीटे इतक्या कमी कालावधीमध्ये प्रवास करणारी ही एकमेव ट्रेन आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासामध्ये सर्वांत जुनी ट्रेन म्हणून ओळखली जाते. ही गाडी सर्वसामान्यपणे भारतीय रेल्वेच्या मार्गावरील सर्वांत वेगवान गाडी असल्यामुळे या गाडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.[२] हावडा ते चेन्नई आणि चेन्नई ते हावडा असा प्रवास करण्यासाठी राजधानी एक्सप्रेस, दुरान्तो एक्स्रपेस, शताब्दी एक्स्रप्रेस आणि इतर वेगवान गाडयांनंतरदेखील या गाडीचे महत्त्व अबाधित आहे.[३]
रचना
संपादनया गाडीला १२ शयनयान असून ६ वातानूकुलीत डबे (प्रथम, व्दितीय, तृतीकोरोमंडेल एक्सप्रेस मार्ग नकाशा य वर्ग वातानुकूतील ), खानपानाचा एक डबा, 3 सर्वसाधारण डबे आहेत. २००८ पासून हावडा-चेन्नई गाडीच्या डब्यांबरोबर या गाडीचे डबे जोडलेले आहेत.
मार्ग
संपादनचेन्नई आणि विजयवाडा दरम्यान ४३२ कि.मी. इतके अंतर विनाथांबे साडेसहातासात धावते. त्यानंतर ती विशाखापट्टणमपर्यंत धावते. विजयवाडा आणि विशाखापट्टणमपर्यंत धावतांना तीचा वेग इतर वेगवान गाडयांच्या (रत्नाचल एक्सप्रेस / फलकनुमा एक्सप्रेस) तुलनेत अतिशय कमी होत जातेा. परंतु दक्षिण पूर्व विभागात या गाडीला सर्वाधिक मान्यता मिळालेली आहे.
पूल
संपादनभारतामधील काही महत्त्वपूर्ण नदयांवरून ही गाडी धावते.
- विजयवाडामध्ये कृष्णा नदी- वेग ११० किमी./तास
- राजमुंढरीमध्ये गोदावरी नदी – २.७४ कि.मी. वेग ११० कि.मी./तास
- कटकमध्ये महानदी : २.१ कि.मी. वेग ११० कि.मी./तास
- कटकमध्ये काथजोरी वेग - १०० कि.मी./तास
- कटकजवळ कुआकाई : वेग - १०० कि.मी./तास
- बलसोराजवळ सुभामारेखा : वेग - ७० किमी./तास
- ब्राम्हणी वेग- ७० कि.मी./तास
- यूनोर चेन्नईजवळ समुद्राकालवा वेग - ५० कि.मी./तास
- नेल्लोरजवळ पेन्नार वेग - ६० कि.मी./तास
- बॅगनान जवळ दामोदर वेग - ५० कि.मी./तास
- कोलघाटजवळ रुपनारायण वेग- ५० कि.मी./तास
अपघात आणि दुर्घटना
संपादन- १३ फेब्रुवारी, २००९ रोजी ओडिशामधील भुवनेश्वर पासून १०० कि.मी.अंतरावर जजपूर रोड जवळ या गाडीचे डबे घसरल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला आाणि काही जण अत्यंत गंभीर जखमी झाले.
- २ जून, २०२३ रोजी ओडिशाच्या बालासोर शहराजवळ हावरा-यशवंतपूर सुपरफास्ट एक्सप्रेस आणि एक मालगाडी यांच्यातील तिहेरी अपघातात सुमारे ३०० व्यक्ती मृत्यू पावला.
संदर्भ
संपादन- ^ "इंडियन रेल्वेज रिझर्वेशन इन्क्वायरी वेबसाईट" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "कोरोमंडेल एक्सप्रेस १२४८२". 2014-07-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-11-10 रोजी पाहिले. Unknown parameter
|पाहिले=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य) - ^ "कोरोमंडेल एक्सप्रेस १२४८१".