विकिपीडिया:दिनविशेष/ऑगस्ट १९
- १६६६ - दुसरे अँग्लो-डच युद्ध-होम्सची होळी - रियर अँडमिरल रॉबर्ट होम्सने नेदरलँड्सच्या टेर्शेलिंग बेटावर हल्ला चढवून १५० व्यापारी जहाजे जाळली.
- १९१९ - अफगाणिस्तानला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९५३ - सी.आय.ए.ने इराणमध्ये मोहम्मद मोसादेघचे सरकार उलथवून शाह मोहम्मद रझा पहलवीला सत्तेवर बसवले.
- १९५५ - हरिकेन डायेनने अमेरिकेच्या ईशान्य भागात २०० बळी घेतले.
- १९८० - सौदी अरेबियातील रियाध शहराच्या किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौदिया फ्लाईट १६३ हे लॉकहीड एल-१०११ ट्रायस्टार प्रकारचे विमानचे आपत्कालीन परिस्थीतीत उतरले. नंतर लागलेल्या आगीत ३०१ ठार.
- २००३ - इराकमधील संयुक्त राष्ट्रांच्या दूतावासावर आत्मघातकी हल्ला. राजदूत सर्जियो व्हियैरा डि मेलोसह २२ ठार.
जन्म:
- १९०३ - गंगाधर देवराव खानोलकर, मराठी लेखक.
- १९२२ - बबनराव नावडीकर, मराठी गायक.
- १९४६ - बिल क्लिंटन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- १९८७ - आयलीना डिक्रुझ, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू:
- १४ - ऑगस्टस सीझर, (चित्रीत) रोमन सम्राट.
- १४९३ - फ्रेडरिक तिसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १६६२ - ब्लेस पास्कल, फ्रेंच गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी.
- १९४७ - ऍल्सिदे दि गॅस्पेरी, इटलीचा पंतप्रधान.
- १९७६ - केन वॉड्सवर्थ, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.