रोहित शर्मा

भारताचा क्रिकेट खेळाडू
(रोहीत शर्मा या पानावरून पुनर्निर्देशित)

रोहित गुरुनाथ शर्मा (एप्रिल ३०, १९८७, नागपूर, महाराष्ट्र - ) हा भारताकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताचा फलंदाज असून अधूनमधून तोच उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो. तो इंडियन प्रीमियर लीगच्या मुंबई इंडियन्स या संघात खेळतो. इंडियन प्रीमियर लीगमध्ये रोहित सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ ५ वेळेस इंडियन प्रीमियर लीगचा कप जिंकला आहे.रोहितच्या नावावर आयपीयलमध्ये हँट्रिक आणि दोन शतक देखील आहे. असे करणारा तो पहिला आयपीयलमधील खेळाडू आहे. त्याने वयाच्या २० व्या वर्षी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. २०१३ मध्ये त्याने भारतीय संघाचा एक सलामीचा फलंदाज म्हणून खेळायला सुरुवात केली.

रोहित शर्मा
भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव रोहित गुरूनाथ शर्मा
जन्म ३० एप्रिल, १९८७ (1987-04-30) (वय: ३७)
भारत
उंची ५ फु ९ इं (१.७५ मी)
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफब्रेक

भारतीय संघाचा कर्णधार

आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (४४) ६ नोव्हेंबर २०१३: वि वेस्ट इंडीज
शेवटचा क.सा. १२ मार्च २०२२: वि श्रीलंका
आं.ए.सा. पदार्पण (२२८) २३ जून २००७: वि आयर्लंड
शेवटचा आं.ए.सा. १७ जुलै २०२२: वि इंग्लंड
एकदिवसीय शर्ट क्र. ४५
आं.टी२० पदार्पण १९ सप्टेंबर २००७ वि इंग्लंड
शेवटचा आं.टी२० १० नोव्हेंबर २०२२ वि इंग्लंड
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००६/०७ - सद्य मुंबई
२००८-२०१० डेक्कन चार्जर्स (संघ क्र. ४५)
२०११-सद्य मुंबई इंडियन्स (संघ क्र. ४५)
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.आं. टी२०प्र.श्रे.
सामने ४५ २३३ १४८ १०६
धावा ३,१३७ ९३७६ ३,८५३ ८०३३
फलंदाजीची सरासरी ४६.१३ ४८.५८ ३२.८२ ५४.६४
शतके/अर्धशतके ८/१४ २९/४५ ४/२९ २५/३४
सर्वोच्च धावसंख्या २१२ २६४ ११८ ३०९*
चेंडू ३८३ ५९३ ६८ २१५३
बळी २४
गोलंदाजीची सरासरी ११२.० ६४.३७ ११३.०० ४८.०८
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी १/२६ २/२७ १/२२ ४/४१
झेल/यष्टीचीत ४५/- ७८/- ५८/- ८९/-

१० नोव्हेंबर, इ.स. २०२२
दुवा: [रोहित शर्मा क्रिकइन्फो वर] (इंग्लिश मजकूर)

शर्मा ने त्याच्या पदार्पणातल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात सलग दोन शतके केली. त्यातील वेस्ट इंडीज विरुद्धच्या नोव्हेंबर २०१२ मधील ईडन गार्डन, कोलकाता येथे झालेल्या कसोटीत १९९ धावा करून त्याचे पहिले व वेस्ट इंडीज विरुद्धच्या वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत नाबाद १११ धावा करून त्याचे दुसरे शतक पूर्ण केले. २ नोव्हेंबर २०१३ रोजी बंगलोर येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात रोहितने २०९ धावा करून आपले पहिले द्विशतक पूर्ण केले. याच सामन्यात त्याने १६ षटकार मारले, व एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. त्यानंतर १३ नोव्हेंबर २०१४ मध्ये ईडन गार्डन्स, कोलकाता येथे एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेविरूद्ध विश्वविक्रमी २६४ धावा करून त्याने जगात सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. रोहितने १ ऑक्टोबर २०१७ रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात एक सलामीचा फलंदाज म्हणून भारताकडून सर्वात जलद ४००० धावा पूर्ण केल्या.रोहितने आत्तापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन द्विशतके केली आहेत. आणि २०-२० मध्ये ४ शतके केली आहेत. त्याने २०१७ डिसेंबरमध्ये श्रीलंका विरुद्ध टी२० मध्ये ३७ बॉल मध्ये जलद शतक ठोकणारा तो जगात दुसरा क्रिकेट खेळाडू ठरला.त्यांने जगाकडून "हिटमॅन" नावाची पदवी मिळवली. रोहित शर्मा हा एकदिवसीय सामन्यामध्ये तीन द्विशतक करणारा जगातील अव्वल खेळाडू आहे.आणि हा खेळाडू महाराष्ट्रीयन आहे याचा महाराष्ट्रातील लोकांना अभिमान आहे. तसेेेच आयपीएलमध्येही त्याची खूप मोठी कामगिरी आहे. २००८ व २००९ या २ मोसमात रोहित शर्मा हा डेक्कन चार्जर्स या संघाकडून खेळला. २००८ मध्ये १ल्याचं मोसमात डेक्कन कडून त्याने ३ चेंडूत ३ बळी घेण्याचा विक्रम केला. व याच वर्षी त्याला "एमर्जन्सी प्लयेर ऑफ द यिअर" हा अवॉर्ड देण्यात आला. तर २००९ साली डेक्कन चार्जर्स या संघाचं कर्णधार पद मिळालं. व या सीझन मध्ये त्याने सलग ४ अर्धशतके झळकावली. तर अनेकवेळा "सामनावीर" या कितबाने गौरवले. व डेक्कनचा संघ यावर्षी रोहितने फायनल पर्यंत पोहोचवला. आणि अंतिम सामन्यात आरसीबी वर २२ धावांनी मात करून डेक्कनला १ ले विजेतेपद मिळवून दिलं. . या कामगिरीमुळे २०१० साली मुंबई इंडियन्स संघाने त्याला खरेदी केले.पुढे २०१२ साली कोलकत्ता विरुद्ध इडन गार्डन वर (४६)१०९* धावांची खेळी करून आयपएलचे १ ले शतक झळकावले.

त्याला मुंबई इंडियन्स संघाने कर्णधार पद दिले.२०१३ ला रोहितने मुंबईला १ल विजेतेपद मिळवून दिलं.

पुढे ,२०१५ ,२०१७,२०१९ आणि २०२० एकूण ५ विजेतेपद मिळवून दिली..

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
  भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.