राष्ट्रकूट राजघराणे

प्राचीन क्षत्रिय मराठा राजवंश

राष्ट्रकूट हे इ.स. ७५३ - इ.स. ९८२ या कालखंडादरम्यान भारतीय उपखंडाच्या दक्षिण, मध्य व काही अंशी उत्तरेकडील भूभागावर पसरलेल्या साम्राज्यावर राज्य करणारे क्षत्रिय होते. या कालखंडात राष्ट्र कुटांनी आंतरसंबंधित, परंतु स्वतंत्र असणाऱ्या विविध कुळशाखांमधून राज्य केले. राष्ट्रकूट राजघराणे याच्या भरभराटीच्या काळात राष्ट्र कुटांचे सत्ता ही विध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत पसरलेली होती दंतिदुर्ग हा या घराण्यातील प्रथम सत्ताधीश त्याची सत्ता महाराष्ट्रामध्ये होती कृष्णराजा पहिला याने वेरुळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदले.

राष्ट्रकूट साम्राज्य
ರಾಷ್ಟ್ರಕೂಟ
इ.स. ७५३इ.स. ९८२


राजधानी मान्यखेट
शासनप्रकार राजतंत्र
अधिकृत भाषा कन्नड ,, संस्कृत
क्षेत्रफळ १७ लक्ष चौरस किमी
राष्ट्रकूट राजे (७५३-९८२)
दंतिदुर्ग (७३५-७५६)
कृष्ण राष्ट्रकूट पहिला (७५६-७७४)
गोविंद राष्ट्रकूट दुसरा (७७४-७८०)
ध्रुव धरावर्ष (७८०-७९३)
गोविंद राष्ट्रकूट तिसरा (७९३-८१४)
अमोघवर्ष (८१४-८७८)
कृष्ण राष्ट्रकूट तिसरा (८७८-९१४)
इंद्र राष्ट्रकूट तिसरा (९१४-९२९)
अमोघवर्ष दुसरा (९२९-९३०)
गोविंद राष्ट्रकूट चौथा (९३०-९३६)
अमोघवर्ष तिसरा (९३६-९३९)
कृष्ण राष्ट्रकूट तिसरा (९३९-९६७)
खोट्टिग अमोघवर्ष (९६७-९७२)
कर्क राष्ट्रकूट दुसरा (९७२-९७३)
इंद्र राष्ट्रकूट चौथा (९७३-९८२)
तैलप दुसरा
(पश्चिम चालुक्य)
(९७३-९९७)

राष्ट्रकूट राजा अमोघवर्षाच्या काळात जैन धर्माचा प्रसार झाला. अजिंठा-वेरूळ येथील लेणी राष्ट्र कुटांच्या काळात कोरण्यात आली. गोविंद राष्ट्रकुट पहिला हा राष्ट्रकूट साम्राज्याचा प्रभावी राजा होऊन गेला त्याने साम्राज्य विस्तारासाठी मोठे प्रयत्न केले. राष्ट्र कुटांच्या कालखंड हा महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये वैभव संपन्न असा कालखंड होता या काळामध्ये सांस्कृतिक दृष्ट्याही महाराष्ट्राचे मोठी प्रगती घडून आली. राष्ट्रकूट घराण्यातील दंतिदुर्ग हा पहिला पराक्रमी शासक होता राष्ट्रकूट घराण्याची सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत पसरलेली होती दंतिदुर्ग यानंतर त्याचा चुलता कृष्ण पहिला हा गादीवर आला त्याने चालुक्यांची सत्ता समुळ नष्ट केली कृष्ण पहिला या राजाने वेरुळचे प्रसिद्ध कैलास मंदिर खोदले त्यानंतर आलेल्या राष्ट्रकूट राजांनी उत्तर भारतात आपला प्रभाव निर्माण केला अमोघवर्ष हा राष्ट्रकूट घराण्यातील कर्तबगार राजा होता त्यांनी रत्नमालिका व कवी राजमार्ग या दोन ग्रंथांची रचना केली त्याने सोलापूर जवळ मानखेड किंवा मालखेड हे नवे नगर वसवले परमार आणि कल्याणीचे चालुक्य यांनी केलेल्या आक्रमणाने राष्ट्रकूट घराण्याचा रास झाला

हे सुद्धा पहा

संपादन