कृष्ण राष्ट्रकूट पहिला

मन्याखेतच्या राष्ट्रकूट घराण्यातील एक महान शासक, ज्याने सुमारे 756 मध्ये त्याचा पुतण्या दंतिदुर्गाच्या मृत्यूनंतर वयाच्या 45 व्या वर्षी सिंहासनावर आरूढ झाला आणि चालुक्य सम्राट कीर्तिवर्माची सत्ता संपवून दक्षिण भारताची मुख्य राजकीय सत्ता बनण्यात यशस्वी झाला.

राष्ट्रकूट (इ.स. ७५७ - इ.स. ९७४) -

बदामीच्या चालुक्यानंतर महाराष्ट्रावर राष्ट्रकूट घराण्याची सत्ता स्थापन झाली. या घराण्याने इ.स. ७५७ पासून इ.स. ९७४ पर्यंत दक्षिण भारतावर राज्य केले. वेरूळ, कंधार व मान्यखेट या राष्ट्रकूटांच्या राजधान्या होत्या. दंतिदुर्ग हे या घराण्याचे संस्थापक व मूळ पुरुष आहेत. त्यांची राजधानी वेरूळ होती. त्यांच्यानंतर त्यांचे चुलते कृष्ण पहिला (इ.स. ७५७ इ.स. ७७३) हे सत्तेवर आले. त्यांनी नांदेड जिल्ह्यातील कंधार या नगराची स्थापना इ.स. ७५८ मध्ये केली व त्यास राजधानीचा दर्जा दिला. कंधारचा किल्ला, जगतुंग समुद्र व वेरूळचे कैलास मंदिर त्यांच्याच काळात निर्माण झाले. गोविंद तिसरा (इ.स. ७७३ इ.स. ८१४) हे कर्तबगार राजे होते. त्यांनी जगतुंगदेव असे बिरुद धारण केले होते. अमोघवर्ष पहिला (इ.स. ८१४ - इ.स. ८८०) आणि कृष्ण दुसरा (इ.स. ८८० - इ.स. ९१४) हे दोघेही कर्तबगार राजे होते. त्यांच्या काळात साम्राज्याचा चौफेर विस्तार झाला होता. त्यांनी जैन धर्माला आश्रय दिला होता. जिनसेन हे अमोघवर्षाचे व गुणभद्र हे कृष्ण दुसरा यांचे गुरू होते. कृष्ण दुसऱ्यानंतर त्यांचे नातू व जगतुंगाचे पुत्र इंद्र तिसरा (इ.स. ९१४ - इ.स. ९२७) सत्तेवर आले. बोधन हे त्यांच्या राजधानीचे ठिकाण होते. यानंतर गोविंद चौथा (इ.स. ९३० - इ.स. ९३६), कृष्ण तिसरा (इ.स. ९३९ - इ.स. ९६८) व कर्क दुसरा (इ.स. ९६८ - इ.स. ९७४) हे राजे होऊन गेले. कृष्ण तिसरा हे शेवटचे कर्तबगार राजे होते. त्यांची राजधानी नांदेड जिल्ह्यातील कंधार होती. सौदंतीच्या रट्टाच्या हन्नेकिरी शिलालेखात त्यांचा उल्लेख कंधारपुरवराधीश्वर या बिरुदावलीने केला आहे. कृष्ण तिसरा यांच्या कारकिर्दीतील एक शिलालेख इ.स. १९५९ मध्ये कंधार येथे मिळाला आहे. कर्क दुसरा हे शेवटचे राष्ट्रकूट राजे असून त्यांचा पराभव करून तैल दुसरा यांनी करून कल्याणीच्या चालुक्य घराण्याची सत्ता स्थापन केली.[]

असा उल्लेख डॉ.अनिल कठारे यांच्या आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास या राज्यसेवा(पुर्व)/पी.एस.आय./ए.एस.ओ.,(Combine) नवीन अभ्यासक्रानुसार आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेल्या ८ वी सुधारीत आवृत्ती मधीलपा क्र.४१ वर आहे.

  1. ^ थापा Thapa, दिब्या श्री Dibya Shree (2022-03-06). "नेपाली नदी प्रणाली तथा गढी, किल्ला : एक सामरिक महत्व (Nepali river system and fortress, fort: a strategic importance)". Unity Journal. 3 (01): 331–349. doi:10.3126/unityj.v3i01.43336. ISSN 2717-4751.