उत्तर प्रदेश
भारतातील एक राज्य.
(यूपी या पानावरून पुनर्निर्देशित)
उत्तर प्रदेश हे भारताचे उत्तरेकडील एक प्रमुख राज्य आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या १९,९५,८१,४७७ एवढी आहे. लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेश भारताचे पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरते. उत्तर प्रदेशाचे क्षेत्रफळ २,४०,९२८ वर्ग किमी एवढे आहे. हिंदी व उर्दू ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. लखनौ ही उत्तर प्रदेशाची राजधानी तर कानपूर हे तेथील सर्वात मोठे शहर आहे. उत्तर प्रदेशाची साक्षरता ७९.१२ टक्के आहे. तांदूळ, गहू, मका व डाळ ही येथील प्रमुख पिके आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वात जास्त ८० जागा आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्याही हे राज्य अतिशय महत्त्वाचे समजले जाते. उत्तर प्रदेशात सर्व धर्मांची अनेक पवित्र स्थळे आहेत, त्यामुळे हे राज्य अतिशय संवेदनशील आहे.
उत्तर प्रदेश | |
भारताच्या नकाशावर उत्तर प्रदेशचे स्थान | |
देश | भारत |
स्थापना | २६ जानेवारी १९५० |
राजधानी | लखनऊ |
सर्वात मोठे शहर | आगरा |
जिल्हे | ७५ |
लोकसभा मतदारसंघ | ८० |
क्षेत्रफळ | २,४०,९२८ चौ. किमी (९३,०२३ चौ. मैल) (४ था) |
लोकसंख्या (२०११) - घनता |
१९,९२,८१,४७७ (पहिला) - १३० /चौ. किमी (३४० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०) |
प्रशासन - राज्यपाल - मुख्यमंत्री - विधीमंडळ (जागा) - उच्च न्यायालय |
आनंदीबेन पटेल योगी आदित्यनाथ विधानसभा व विधान परिषद (४०४+१००) अलाहाबाद उच्च न्यायालय |
राज्यभाषा | इंग्लिश, उर्दू, गारो |
आय.एस.ओ. कोड | IN-UP |
संकेतस्थळ: http://www.up.gov.in/ |
इतिहास
संपादनभूगोल
संपादनराज्यचिन्ह-प्राणी | बाराशिंगा | |
राज्यपक्षी | सारस क्रौंच | |
राज्यवृक्ष | साल (वृक्ष) | |
राज्यपुष्प | पळस | |
राज्यनृत्य | कथक | |
राज्यखेळ | हॉकी |
जिल्हे
संपादनउत्तर प्रदेश राज्यात ७० जिल्हे आहेत.
चित्रदालन
संपादन-
उत्तर प्रदेशातील ग्रामस्थ
-
उत्तर प्रदेशातील ग्रामस्थ
-
उत्तर प्रदेशातील ग्रामस्थ
बाह्य दुवे
संपादन- उत्तर प्रदेश सरकारचे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर) Archived 2007-02-02 at the Wayback Machine.
- उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागाचे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर) Archived 2019-08-18 at the Wayback Machine.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |