मराठी साहित्य

मराठी भाषेतील साहित्य प्रकार
(प्राचीन मराठी वाड्मयाचा इतिहास या पानावरून पुनर्निर्देशित)

मराठी भाषेत निर्माण केल्या गेलेल्या मौखिक आणि लिखित स्वरूपातील साहित्याला मराठी साहित्य म्हणतात.

मराठी साहित्य

संपादन

इतर भाषांशी तुलना केली असता काही साहित्य प्रकार हे फक्त मराठीत आढळून येतात असे दिसते. उदा. ओव्या, अभंग, कीर्तन पोवाडे, लावण्या, इत्यादी.

अभिजात मराठी साहित्य

संपादन

कादंबरी

कथा

कविता

ललित लेख (कविता )

नाटक

लोक साहित्य

बाल साहित्य

कथा

विनोद

अग्रलेख। संपादकीय। स्तंभलेख।

समीक्षा

चारोळी

गझल

ओवी

अभंग

भजन

कीर्तन

पोवाडा

लावणी

भारूड

बखर

पोथी

आरती

लोकगीत

गोंधळ

उखाणे

मराठीमधील साहित्यविषयक नियतकालिके

संपादन
  • अंतर्नाद
  • अभिधानंतर
  • अक्षरगाथा
  • अक्षर वाङ्‌मय
  • आपला परममित्र
  • आमची श्रीवाणी
  • ऊर्मी
  • कवितारती
  • केल्याने भाषांतर
  • खेळ
  • ग्रंथसखा
  • दक्षिण मराठी साहित्य पत्रिका
  • नवभारत
  • नावाक्षर दर्शन
  • परिवर्तनाचा वाटसरू
  • प्रबोधन प्रकाशन ज्योती
  • भाषा आणि जीवन
  • भूमी
  • महा अनुभव
  • मुक्त शब्द
  • मुराळी
  • ललित
  • शब्दवेध
  • सर्वधारा
  • साधना
  • साहित्यक्षुधा

मराठी साहित्याचा इतिहास

संपादन

पुणे महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठी वाङ्मयाचा इतिहास सात खंडांत प्रकाशित केला आहे. हा वाङ्मय इतिहास ई-बुक आणि मोबाइल ई-बुकच्या माध्यमांतही वाचायला मिळतो. १९८४ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली. शं.गो. तुळपुळे, स.गं. मालशे, रा.श्री. जोग, गो.म. कुलकर्णी, व.दि. कुलकर्णी, प्रा. रा.ग. जाधव यांच्या सारख्या दिग्गजांनी या खंडांचे संपादन केले आहे. याचबरोबर 'भाषा व साहित्य : संशोधन' (खंड १, २ आणि ३ संपादक : डॉ. वसंत जोशी, म. ना. अदवंत), 'हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर' (खंड १ आणि २ संपादक : राजेंद्र बनहट्टी आणि डॉ. गं. ना. जोगळेकर), 'महाराष्ट्र साहित्य पत्रिका सूची' (सूचीकार : मीरा घांडगे), माधव राजगुरू लिखित 'सुगम मराठी शुद्धलेखन पुस्तिका' अशी मसापची १९ प्रकाशने ई-बुक आणि मोबाइल ई-बुक रूपात उपलब्ध झाली आहेत. वाङ्मय इतिहासाच्या सातव्या खंडातील भाग १ ते ४ चे संपादन प्रा. रा.ग. जाधव यांनी केले आहे. ई-बुक आणि मोबाइल ई-बुक त्यांच्या स्मृतीला अर्पण केले आहे.

मराठीतील आक्षिप्त साहित्य

संपादन

भारतावरच्या इंग्रजी राजवटीदरम्यान ब्रिटिशांनी सुमारे १५० ते २१० मराठी पुस्तकांतील मजकुरावर आक्षेप घेऊन ती पुस्तके जप्त केली. या पुस्तकांपैकी बऱ्याच पुस्तकांची यादी 'मराठी वाङ्मयाचा इतिहास' या ग्रंथाच्या ६व्या खंडाच्या 'मराठीतील जप्त वाङ्मय' ह्या परिशिष्टात दिली आहे. त्या यादीतील काही नावे :-

  • अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर (वि.दा. सावरकर)
  • कीचकवध (नाटक, १९०७, कृ.प्र. खाडिलकर)
  • निबंधमाला (आमच्या देशाची स्थिती या शेवटच्या निबंधाबद्दल, १८७४)
  • रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले (कविता, कवी गोविंद) . (या कवितेतील एक कडवे मृत्युंजय नाटक सुरू होण्याआधी गायले जाई. ही कविता प्रसिद्ध करण्याच्या अपराधाकरता बाबाराव सावरकर यांना जन्मठेप झाली होती.)
  • लोकमान्यांचा निरोप (राजद्रोहाची शिक्षा सुनावल्यानंतर टिळकांनी कोर्टात केलेले भाषण, १९०८)

स्वातंत्रोत्तर काळात भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने अनेक पुस्तकांवर ती न वाचताच विनाकारण बंदी घातली; अशी काही पुस्तके :-

संदर्भ

संपादन
  • आक्षिप्त मराठी साहित्य (प्रबंध व पुस्तक, डाॅ. गीतांजली घाटे)

शब्दकोश

संपादन





बाह्य दुवे

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन