पावनखिंड (चित्रपट)
पावनखिंड (इंग्रजी: Pawankhind ) हा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित, ए.ए. फिल्म्स (A A Films) प्रस्तुत आणि अॅलमंड्स क्रिएशन्स (Almonds Creations) निर्मित मराठी भाषेतील ऐतिहासिक घटनेवर आधारित चित्रपट आहे. मराठा योद्धा बाजी प्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात त्यांच्या पवित्र रक्तानं पावन झालेल्या घोडखिंडीचा इतिहास 'पावनखिंड' सिनेमात दाखवला आहे.
पावनखिंड (मराठी चित्रपट) | |
---|---|
चित्र:पावनखिंड.jpg | |
दिग्दर्शन | दिगपाल लांजेकर |
निर्मिती |
अजय आरेकर अनिरुद्ध आरेकर भाऊसाहेब आरेकर |
कथा | दिगपाल लांजेकर |
प्रमुख कलाकार |
चिन्मय मांडलेकर मृणाल कुलकर्णी समीर धर्माधिकारी अजय पुरकर अंकित मोहन |
छाया | अमोल गोले |
संगीत | देवदत्त मनीषा बाजी |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | फेब्रुवारी १८ २०२२ |
वितरक | ए ए फिल्म्स |
अवधी | २ तास ३३ मिनिटे |
एकूण उत्पन्न | ६० कोटी |
'पावनखिंड' सिनेमाचे लेखक-दिग्दर्शन अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, वैभव मांगले, हरीश दुधाडे, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना,शिवराज वायचळ, संतोष जुवेकर, राजन भिसे, विक्रम गायकवाड, आदी कलाकारांच्या 'पावनखिंड' चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. १८ फेब्रुवारी २०२२ मध्ये हा चित्रपट संपुर्ण महाराष्ट्रात तसेच भारतात काही ठिकाणी प्रदर्शित करण्यात आला आहे.[१]
विशेष
संपादनदिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांच्या शिव चरित्रावरील आधरित आठ चित्रपटांच्या मालिकेतील फर्जंद आणि फत्तेशिकस्त या दोन चित्रपटा नंतर बाजीप्रभू देशपांडे व बांदल सेनेच्या घोडखिंडीतील पराक्रमावर हा तिसरा चित्रपट.
कथानक
संपादनआदिलशाहीचा सरदार सिद्दी जौहरने शिवाजी महाराजांस साखळदंडात बांधून विजापुरास नेण्यासाठी पन्हाळगढास वेढा देऊन महाराज व महाराजांच्या सैन्यास गडावर कोंडल्यानंतर, वेढ्यातुन बाहेर निघण्यासाठी शिवाजी महाराज विशाळगढाकडे निघतात तेव्हा शिवाजी महाराज हे विशाळगढावर सुखरूप पोहचवण्यासाठी बाजीप्रभु देशपांडे आणि ३०० बांदल सैनिकांचा पराक्रम ह्या चित्रपटात दाखवला आहे. १३ जुलै १६६० मध्ये कोल्हापुरजवळील विशाळगढाच्या परिसरातील घोडखिंडीतील लढाईतील मावाळ्यांचे शोर्य या चित्रपटाच्या माध्यमातून आपणास पाहण्यास मिळते.
कलाकार
संपादन- चिन्मय मांडलेकर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत
- मृणाल कुलकर्णी - राजमाता जिजाऊच्या भूमिकेत
- अजय पूरकर - बाजी प्रभू देशपांडेच्या भूमिकेत
- रुची सावर्ण - मातोश्री सोयराबाईच्या भूमिकेत
- प्राजक्ता माळी - श्रीमंत भवानीबाई बांदलच्या भूमिकेत
- सुरभी भावे - मातोश्री सोनाई देशपांडेच्या भूमिकेत
- क्षिती जोग - ताजुल मुखद्दिरात बडी बेगमच्या भूमिकेत.
- माधवी निमकर - मातोश्री गौतमाई देशपांडे यांच्या भूमिकेत
- समीर धर्माधिकारी - सिद्दी जोहरच्या भूमिकेत
- उज्ज्वला जोग - बाजीप्रभूंच्या आई बयोबाई देशपांडे यांच्या भूमिकेत
- आस्ताद काळे - सिद्दी मसूदच्या भूमिकेत
- रिषी सक्सेना - रुस्तमेजमानच्या भूमिकेत
- सुश्रुत मंकणी - फाज़लखानच्या भूमिकेत
- अंकित मोहन - श्रीमंत रायाजीराव बांदलच्या भूमिकेत
- दिप्ती केतकर - श्रीमंत दिपाईआऊ बांदलांच्या भूमिकेत
- हरीश दुधाडे - बहिर्जी नाईकच्या भूमिकेत
- अक्षय वाघमारे - श्रीमंत कोयाजी बांदलच्या भूमिकेत
- अजिंक्य ननावरे - नरवीर शिवा काशीदच्या भूमिकेत
- बिपीन सुर्वे - शंभूसिंह जाधव राव यांच्या भूमिकेत
- वैभव मांगले - गंगाधरपंतांच्या भूमिकेत
- सुनील जाधव - फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत
- सचिन भिलारे - अगिन्याच्या भूमिकेत
- विक्रम गायकवाड - नेताजी पालकरच्या भूमिकेत
- शिवराज वायचळ - हरप्याच्या भूमिकेत
संगीत
संपादनचित्रपटाचा संगीत देवदत्त मनीषा बाजी यांनी संगीतबद्ध केला असून दिग्पाल लांजेकर यांनी गीते लिहिली आहेत. हरिदास शिंदे व अवधूत गांधी यांनी गायलेल्या "युगत मंडळी" या गाण्याचा व्हिडिओ डिसेंबर २०२१ मध्ये रिलीज झाला.[२]
गाणे | |||
---|---|---|---|
क्र. | शीर्षक | गायक | अवधी |
१. | "युगत मांडली[३]" | अवधूत गांधी ,हरिदास शिंदे | ३:१० |
२. | "राजं आलं[४]" | अवधूत गुप्ते | ३:२२ |
३. | "श्वासात राजं ध्यासात राजं[५]" | देवदत्त मनीषा बाजी | २:०२ |
४. | "रणी निघता शूर" | देवदत्त मनीषा बाजी | ४:२३ |
एकूण अवधी: |
१२ः४७ |
निर्मिती
संपादन'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' नंतर १५ नोव्हेंबर २०१९ रोजी 'जंगजौहर' या ऐतिहासिक चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आला होता. १० फेब्रुवारी २०२० ला जंगजौहर या चित्रपटाचा किल्ले रायगडावर ढोल-ताशांच्या गजरात व मंत्रोच्चाराच्या जयघोषात मुहूर्त पार पडला.[६] १९ मार्च २०२० ला चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले.[७] फेब्रुवारी २०२१ मध्ये चित्रपटाचं नाव बदलून पावनखिंड करण्यात आलं.[८][९]
या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. अजय आरेकर, अनिरुद्ध् आरेकर आणि भाऊसाहेब आरेकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट अॅलमंड्स क्रिएशन्स (Almonds Creations) च्या बॅनरखाली निर्मित तर ए.ए. फिल्म्स (A A Films) च्या बॅनरखाली प्रस्तुत करण्यात आला.
प्रदर्शन
संपादनपावनखिंड हा चित्रपट १० जून २०२१ लाच प्रदर्शित होणार होता.[१०] परंतु कोरोना महामारीमुळे प्रदर्शन हे पुढे ढकलण्यात आले. नंतर हा चित्रपट ३१ डिसेंबर २०२१ ला प्रदर्शित करण्याचे ठरवले असता ओमिक्रॉन या कोरोना विषाणूमुळे दुसऱ्यांदा ह्या चित्रपटाची प्रदर्शन तारीख बदलण्यात आली.[११][१२] अखेर हा चित्रपट १८ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित झाला.
प्रतिसाद
संपादनसमीक्षकांच्या प्रतिक्रिया
संपादनपावनखिंडला समीक्षकांची वाहवा मिळाली. द टाईम्स ऑफ इंडिया मधील मिहिर भानगे यांनी चित्रपटाला ५ पैकी ३.५ स्टार्स, आणि असे म्हणले की "पावनखिंड कथाकथनात उत्कृष्ट आहे, तांत्रिक बाबी जरी चांगल्या असल्या तरी अधिक चांगल्या केल्या जाऊ शकल्या असत्या. काही महत्त्वाच्या दृश्यांमध्ये पार्श्वसंगीत संवादांवर मात करते, काही साहस दृश्यांमध्ये कट करण्यात अयशस्वी. तरिही, चित्रपटाच्या माध्यमातून सर्व काही सांगितले आणि केले, संपूर्ण टीमने ह्यला मोठ्या पडद्यावरील अनुभव बनवण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला आहे. कदाचित मोठ्या बजेटसह, लांजेकरांच्या मालिकेच्या पुढील चित्रपटांमध्ये या गोष्टीं सुधारल्या जातील."[१३] Cinestaan.com मधील श्रीराम अय्यंगार यांनी लिहिले की "नक्कीच, नाटकाचा स्तर अधिक उंचावला आहे. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की चित्रपट बहुसंख्यांक जनांच्या पूर्वाग्रहामुळे रंगला आहे. तरीही लोकनाट्यकारांची ती नेहमीचीच शैली होती. ते प्रेक्षकांना अनुरूप होईल अशी टोन बदलू शकत होते. सिनेमा वेगळा नसल्याचा दावा करू शकतो. शेवटच्या अॅक्शन सीक्वेन्समध्ये असे काही क्षण आहेत जेव्हा व्हीएफएक्स मधल्या चुका दिसतात, परंतु त्या कथेला कोणत्याही प्रकारे अडथळा आणत नाहीत."[१४] महाराष्ट्र टाइम्सचे कल्पेश कुबाल लिहितात की "तांत्रिक बाजू काहीशी ढासळलेली दिसते; पण त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. चित्रपटाच्या संपूर्ण कथेत दिग्दर्शकाने विविध शूरवीरांना अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे."[१५] "दिग्दर्शक आणि कलाकारांची मेहनत पडद्यावर पाहायला मिळते. एक अभूतपूर्व इतिहास अनुभवण्यासाठी तुम्ही या चित्रपटगृहाला भेट द्यावी आणि एकदा तरी तो पहावा" अशी लोकमतच्या समीक्षांची प्रतिक्रिया आहे.[१६]
बॉक्स ऑफिस
संपादनमहाराष्ट्रामध्ये चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक सिनेमागृहासमोर हाऊसफुलचे फलक ही पाहण्यास मिळाले. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रयोगांची संख्या देखील वाढवण्यात आली होती.[१७] पावनखिंड या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यावर पहिल्या आठवड्यात ₹१२.१७ कोटी कमावले. १६ मार्च २०२२ पर्यंत, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ₹३९.६५ कोटींची कमाई केली आहे.[१८]
बाह्य दुवे
संपादनसंदर्भ
संपादन- ^ टीम, एबीपी माझा वेब (2022-02-18). "'पावनखिंड' सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, लागला हाऊसफुल्लचा बोर्ड". marathi.abplive.com. 2022-02-18 रोजी पाहिले.
- ^ "Pawankhind Song-Yugat Mandali". timesofindia.indiatimes.com. 5 December 2021.
- ^ https://www.youtube.com/watch?v=dEfzQkfb60E
- ^ https://www.youtube.com/watch?v=LMgVnhNpcFc
- ^ https://www.youtube.com/watch?v=7svhUsjZbbY
- ^ "'जंगजौहर'मधून पावनखिंडीचा रणसंग्राम रुपेरी पडद्यावर, नुकताच पार पडला मुहूर्त!". लोकमत.
- ^ "'Jungjauhar': Chinmay Mandlekar wraps up the shoot amidst Coranovirus outbreak - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-04-23 रोजी पाहिले.
- ^ "'जंगजौहर' नाही आता 'पावनखिंड' म्हणा, ऐतिहासिक चित्रपटाचं नाव बदललं". महाराष्ट्र टाइम्स. 2022-04-23 रोजी पाहिले.
- ^ "'जंगजौहर'च्या नावात झाला बदल, 'पावनखिंड' नावाने प्रदर्शनासाठी सज्ज". लोकमत.
- ^ "हर हर महादेव! 'पावनखिंड'चा थरार चित्रपटगृहातच". Maharashtra Times. 2022-04-21 रोजी पाहिले.
- ^ "Movie Pavankhind : 'पावनखिंड' ३१ डिसेंबरला रुपेरी पडद्यावर". पुढारी (इंग्रजी भाषेत). 2021-11-25. 2022-04-21 रोजी पाहिले.
- ^ Marathi, TV9 (2021-11-25). "बाजीप्रभूंच्या अजोड स्वामीनिष्ठेची कथा, मोठ्या पडद्यावर दिसणार 'पावनखिंड'चा अजरामर इतिहास!". TV9 Marathi. 2022-04-21 रोजी पाहिले.
- ^ "Pawankhind Movie Review : An epic retelling of an interesting chapter from Maratha history".
- ^ Iyengar, Shriram. "Pawankhind review: Another entertaining folktale from the Maratha cinematic universe". Cinestaan. 2022-02-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-23 रोजी पाहिले.
- ^ "पावनखिंड". Maharashtra Times. 2022-04-23 रोजी पाहिले.
- ^ "Pawankhind Marathi Movie Review : पावनखिंड- थक्क करणारा अनुभव".
- ^ "Pushpa के बाद Pawankhind की बॉक्स ऑफिस पर धूम, मराठा शूरवीरों के बलिदान की दास्तां है फिल्म". आज तक (हिंदी भाषेत). 2022-03-17 रोजी पाहिले.
- ^ "Pawankhind Day 28 Box Office Collection - Sacnilk". www.sacnilk.com (इंग्रजी भाषेत). 2022-03-17 रोजी पाहिले.