मृणाल कुलकर्णी

मराठी चित्रपट अभिनेत्री

मृणाल देव-कुलकर्णी ह्या ख्यातनाम भारतीय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका, लेखिका आहेत. मराठी व हिंदी चित्रपट, नाटक आणि दूरदर्शनच्या जगतात त्या एक हरहुन्नरी, प्रतिभासंपन्न अशा मनस्वी कलावंत म्हणून ओळखल्या जातात. त्या विख्यात साहित्यिक गो.नी. दांडेकरांच्या नात आहेत.

मृणाल कुलकर्णी
जन्म मृणाल देव
२१ जून, १९७१ (1971-06-21) (वय: ५१)
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम अवंतिका, गुंतता हृदय हे
आई वीणा देव
पती
रुचिर कुलकर्णी (ल. १९९०)
अपत्ये विराजस कुलकर्णी

अभिनयाची सुरुवातसंपादन करा

त्यांनी अभिनयाची सुरुवात अल्पवयातच मराठी दूरदर्शनवरील स्वामी या मालिकेपासून केली. तेव्हा त्या बारावीत शिकत होत्या. स्वामीमधे त्यांनी माधवराव पेशवे यांच्या पत्‍नी रमाबाईंची भूमिका साकारली. या मालिकेमुळे मृणाल कुलकर्णी यांचे नाव घरोघरी पोचले. त्यानंतर त्यांनी श्रीकांत आणि द ग्रेट मराठा या मालिकाही केल्या. नंतर द्रौपदी, हसरते, मीराबाई, टीचर, खेल, स्पर्श, सोनपरी इत्यादी मालिकांमधून त्यांचा सकस अभिनय बहरत गेला.[१] अल्फा मराठी वाहिनीवरील अवंतिका या मालिकेतील त्यांच्या अभिनयाला फार वाहवा मिळाली.

दिग्दर्शनाची सुरुवातसंपादन करा

मृणाल देव-कुलकर्णी यांनी प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं (२०१४) या चित्रपटापासून चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले,या चित्रपटानंतर त्यांनी श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित रमा माधव या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं (२०१४) आणि रमा माधव या दोन्ही चित्रपटात त्यांनी दिग्दर्शनासोबातच अभिनय देखील केला आहे.

लेखनसंपादन करा

मृणाल देव-कुलकर्णी यांनी 'मेकअप उतरवल्यानंतर' नावाचे मराठी पुस्तक लिहिले आहे.

चित्रपट प्रवाससंपादन करा

त्यांनी विविधरंगी, बहुढंगी असे अनेक प्रकारचे मराठी तसेच हिंदी चित्रपट केले. [२] त्यामध्ये ऐतिहासिक, सामाजिक, प्रणयरम्य अशा अनेक विषयांचा अंतर्भाव होतो.

चित्रपटसंपादन करा

  • कुछ मीठा हो जाये (२००५)
  • क्वेस्ट (२००६)
  • छोडो कल की बातें (२०१२)
  • देह
  • प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं (२०१४)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • बायो
  • यलो (२०१४)
  • रमा माधव (२०१४)
  • रास्ता रोको
  • रेनी डे
  • वीर सावरकर

[३]

दूरचित्रवाणी मालिकासंपादन करा

कौटुंबिक व खाजगी आयुष्यसंपादन करा

प्रसिद्ध साहित्यिक गो.नी.दांडेकर हे मृणाल कुलकर्णी यांचे आजोबा होत. साहित्यिक वीणा देव त्यांच्या आई आहेत. त्यांचे वडील डॉ. विजय देव पुण्यातील स.प. महाविद्यालयाचे प्राचार्य होते. व्यवसायाने वकील असलेल्या श्री रुचिर कुलकर्णी यांच्याशी मृणाल यांचा विवाह झाला आहे. मृणाल यांचा मुलगा विराजस हा सुद्धा अभिनेता असून त्यानी नुकतीच अभिनेत्री शिवानी रांगोळे हिच्यासोबत लग्नगाठ बांधली.

पुरस्कारसंपादन करा

  • साहित्य कलावंत प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा वाग्‌यज्ञे पुरस्कार (२६-१२-२०१६)
  • दैनिक लोकमततर्फे 'महाराष्ट्रियन ऑफ द इयर' म्हणून निवड (१०-४-२०१७)
  • रोटरी क्लब ऑफ चिंचवडचा कलागौरव पुरस्कार (२२-१-२०१८)

ब्रॅंड ऍम्बॅसॅडरसंपादन करा

मृणाल कुलकर्णी ह्या वयम्च्या ब्रॅंड ऍम्बॅसॅडर देखील आहेत.

संदर्भसंपादन करा

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2014-12-24. 2021-11-20 रोजी पाहिले.
  2. ^ http://www.justmarathi.com/mrinal-dev-kulkarni/
  3. ^ http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/Rama-Madhav-houseful/articleshow/43523893.cms
  4. ^ http://www.imdb.com/title/tt2354568/