परमवीर चक्र पुरस्कार
(परमवीरचक्र पुरस्कार या पानावरून पुनर्निर्देशित)
परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्य सैन्य पुरस्कार असून युद्धकाळात गाजवलेल्या अतुलनीय कामगिरी बाबत हा पुरस्कार देण्यात येतो. आतापर्यंत २१ परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले असून त्यातले १४ पुरस्कार हे मरणोत्तर आहेत. एकवीसपैकी वीस पुरस्कार भारतीय सैन्य तर एक वायुसेनेच्या सदस्यांस प्रदान केले गेले आहेत.
परमवीर चक्र | ||
| ||
पुरस्कार माहिती | ||
---|---|---|
प्रकार | युद्ध कालीन वीरता पुरस्कार | |
वर्ग | राष्ट्रीय बहादुरी | |
स्थापित | १९५० | |
प्रथम पुरस्कार वर्ष | १९४७ | |
अंतिम पुरस्कार वर्ष | १९९९ | |
एकूण सन्मानित | २१ | |
सन्मानकर्ते | भारत सरकार | |
रिबन | ||
प्रथम पुरस्कारविजेते | मेजर सोमनाथ शर्मा (मरणोत्तर) | |
अंतिम पुरस्कारविजेते | कॅप्टन विक्रम बत्रा (मरणोत्तर) | |
पुरस्कार क्रम | ||
नाही ← परमवीर चक्र → महावीर चक्र |
ग्रेनेडियर्स रेजिमेंट आणि गोरखा रायफल्स या पथकांना प्रत्येकी ३, शीख रेजिमेंट, कुमाऊॅं रेजिमेंट, जम्मू काश्मीर रायफल्स आणि द पूना हॉर्सेस या पथकांना प्रत्येकी २ पुरस्कार दिले गेले. हा पुरस्कार मिळवणाऱ्यांपैकी लेफ्टनंट अर्देशर तारापोर हे सगळ्यात वरच्या पदाचे अधिकारी होते.
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने १९८३-८५ दरम्यान पंधरा तेलवाहू जहाजे विकत घेतली. यांना त्यावेळच्या १५ परमवीरचक्र विजेत्यांची नावे दिली गेली.
विजेते
संपादनअधिक वाचन
संपादन- परमवीर गाथा भाग १ ते ८. (मूळ लेखक - रचना बिश्त-रावत आणि मेजर जनरल शुभी सूद; मराठी अनुवाद - भगवान दातार)
- शौर्यगाथा (मूळ लेखक - रचना बिश्त-रावत आणि मेजर जनरल शुभी सूद; मराठी अनुवाद - भगवान दातार)
संदर्भ
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |