योगेंद्र सिंग यादव
सुभेदार योगेंद्र सिंग यादव (१० मे, इ.स. १९८०:बुलंदशहर, उत्तर प्रदेश, भारत - ) हे भारतीय सेनादलातील एक सैनिक आहेत. ४ जुलै, इ.स. १९९९ रोजी कारगिल युद्धात टायगर हिलच्या लढाईत दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना परमवीरचक्रहा भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. यादव भारतीय सेनेच्या १८ ग्रेनेडियर्समधील घातक प्लाटूनमध्ये तैनात होते.
योगेंद्र सिंग यादव | |
---|---|
योगेंद्र सिंग यादव आपल्या परमवीर चक्र पुरस्कारासह | |
मातृभाषेतील नाव | योगेंद्र सिंग यादव |
जन्म |
१० मे, १९८० बुलंदशहर जिल्हा, उत्तर प्रदेश |
Allegiance | |
सैन्यशाखा | भारतीय सेना |
हुद्दा | सुबेदार |
सैन्यपथक | घातक प्लाटून, १८ ग्रेनेडियर्स |
लढाया व युद्धे | कारगिल युद्ध, ऑपरेशन विजय, टायगर हिलची लढाई |
पुरस्कार | परमवीरचक्र |
पार्श्वभूमी
संपादनयादव यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला.त्यांचे वडील सुद्धा काही काळ लष्करात होते.घरच्या साधारण आर्थिक परिस्थितीमुळे वडील आजारी पडल्यावर यादव आणि त्यांचा भाऊ लहानपणापासूनच शिक्षणाबरोबरच घरची शेती आणि गुरे सांभाळत असत.मोठा भाऊ लष्करात भरती झाल्यावर काही काळाने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी यादव भारतीय लष्करात भरती झाले. तेव्हा त्यांचे शिक्षण ११ वी इतकेच झालेले होते.
कारगिल युद्धातील कामगिरी
संपादनकारगिल युद्धादरम्यान टायगर हिल या शिखरावर पाकिस्तानी सैन्याने कब्जा केला होता. हे शिखर ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या २१ जणांच्या तुकडीतील सर्व जण शत्रूच्या माऱ्याच्या टप्प्यात आल्यामुळे धारातीर्थी पडले. त्यातील यादव हे एकटेच वाचले. एका हाताची हाडे तुटलेली असताना आणि १६-१७ गोळया लागलेल्या असताना पुढचा हल्ला अधिक सुनियोजितपणे करता यावा आणि या हल्ल्याप्रमाणे प्राणहानी होऊ नये म्हणून शत्रूच्या ठिकाणाची माहिती सांगण्यासाठी ते आपल्या युनिटपर्यंत पोचले. या माहितीमुळे पुढचा हल्ला योग्य प्रकारे चढवून टायगर हिल हे मोक्याचे ठिकाण ताब्यात घेण्यास लष्कराला यश मिळाले आणि जीवितहानी टळली. या कामगिरीबद्दल त्यांना परमवीरचक्र देण्यात आले. भारतीय सेनेतील परमवीर चक्र मिळवणारे ते सर्वांत तरुण सैनिक आहेत.[१]त्यांना पुढे एक वर्षाहून अधिक काळ रुग्णालयात उपचारार्थ घालवावा लागला. बरे झाल्यावर त्यांनी बी.ए.बी.एड.असे शिक्षण पूर्ण केले. आता ते सैन्यात प्रशिक्षक म्हणून काम करतात.
चित्रपटात
संपादन२००३ साली प्रदर्शित झालेल्या एलओसी कारगिल या कारगिल युद्धावरील चित्रपटात अभिनेता मनोज बाजपाई याने सुभेदार यादव यांची भूमिका साकारली आहे. लक्ष्य या चित्रपटात अशीच भूमिका हृतिक रोशनने केली आहे.
- ^ तळवलकर, अनिल (२०१८). परमवीर चक्र विजेते. पुणे: भालचंद्र कुलकर्णी. pp. ८७. ISBN 978-93-95456-00-8 Check
|isbn=
value: checksum (सहाय्य).