विक्रम बत्रा
माजी भारतीय लष्कर अधिकारी परमवीर चक्राने सन्मानित
(विक्रम बात्रा या पानावरून पुनर्निर्देशित)
कॅप्टन विक्रम बत्रा (९ सप्टेंबर १९७४ - ७ जुलै १९९९) हे भारतीय सेनादलातील एक अधिकारी होते. ६ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्धात पॉइंट ५१४०, पॉइंट ४८७५, कारगिल (काश्मीर) येथील कारवाई दरम्यान दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीरचक्र हा मरणोत्तर प्रदान करण्यात आला. ते भारतीय स्थल सेनेतील १३ वी बटालियन, जम्मू काश्मीर रायफल्स मध्ये कॅप्टन पदावरील अधिकारी होते.[ संदर्भ हवा ]
विक्रम बत्रा | |
---|---|
मातृभाषेतील नाव | विक्रम बत्रा |
टोपणनाव | शेरशाह |
जन्म | ९ सप्टेंबर, १९७४ |
मृत्यू |
७ जुलै, १९९९ (वय २४) कारगिल क्षेत्र |
Allegiance | |
सैन्यशाखा | भारतीय सेना |
हुद्दा | कॅप्टन |
सैन्यपथक | १३ वी बटालियन, जम्मू काश्मीर रायफल्स |
लढाया व युद्धे | कारगिल युद्ध |
पुरस्कार | परमवीरचक्र |
विक्रम बत्रा यांचे काही निवडक उद्गार
संपादन- बत्रा यांचे युद्धभूमीवरील शेवटचे उद्गार होते - जय माता दी ![ संदर्भ हवा ]
- विक्रम जेव्हा पॉइंट ५१४०ला पोहोचले तेव्हा शत्रू कमांडरशी झालेल्या रेडियो संभाषणात शत्रू कमांडर म्हणाला, तू का आला आहेस, शेर शहा? (शेर शहा हे विक्रम यांचे सैन्यातील टोपणनाव होय) तू आता मागे जाऊ शकत नाहीस. त्यावेळी विक्रम यांनी प्रत्युत्तर दिले, आपण एका तासात पाहूच, वरती (शिखरावर) कोण उरते.[ संदर्भ हवा ]
- जखमी झालेल्या लेफ्टनंट नवनीत यांना सुरक्षित ठिकाणी आणताना लेफ्टनंट यांनी विक्रम यांच्यासमोर जखमी अवस्थेतही लढण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा विक्रम म्हणाले, तुमची बायकामुले घरी आहेत, त्यामुळे तुम्ही मागे हटा; मी आहे.[ संदर्भ हवा ]
- बत्रा यांचे एक प्रसिद्ध वाक्य म्हणजे एकतर तिरंगा फडकवून येईन नाहीतर तिरंगा लपेटून येईन (शहीद होऊन) पण नक्की येईन.[ संदर्भ हवा ]
- एका पाकिस्तान्याने एकदा असा टोमणा मारला की जर तुम्ही माधुरी दीक्षित आम्हाला दिलीत तर आम्ही काश्मिरमधून निघून जाऊ. त्यावर विक्रमनी त्याला एक गोळी घालून मारून टाकले व म्हणाले, फ्रॉम माधुरी, विथ लव्ह.[ संदर्भ हवा ]
चित्रपटात
संपादन२००३ साली प्रदर्शित झालेल्या एलओसी कारगिल या कारगिल युद्धावरील चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन याने कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली आहे.[ संदर्भ हवा ] २०२१ साली प्रदर्शित झालेल्या शेरशाह या कारगिल युद्धावरील चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मलहोत्रा याने कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली आहे.