यदुनाथ सिंह

(यदुनाथ सिंग या पानावरून पुनर्निर्देशित)

नायक जदुनाथ सिंग, पीव्हीसी (२१ नोव्हेंबर, १९१६:काजुरी, शाहजहानपूर जिल्हा, उत्तर प्रदेश) - ६ फेब्रुवारी, १९४८) हे भारतीय सैनिक होते. त्यांना मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते. इ.स. १९४७ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यानच्या त्यांनी दाखवलेल्या साहसासाठी भारताचा सर्वोच्च सैन्य पुरस्कार त्यांना देण्यात आला.

नायक
जदुनाथ सिंग
पी वी सी
चित्र:Jadunath Singh PVC.jpg
जन्म २१ नोव्हेंबर, १९१६ (1916-11-21)
खजुरी, शाहजहांपूर, (आता उत्तर प्रदेश)
मृत्यू ६ फेब्रुवारी, १९४८ (वय ३१)
ताईन धर, नौशेरा, जम्मू आणि काश्मीर
Allegiance
  • ब्रिटिश भारतीय साम्राज्य
  • भारत
सैन्यशाखा
  • ब्रिटिश भारतीय साम्राज्य
  • भारतीय सैन्य
सेवावर्षे १९४२ – १९४८
हुद्दा नायक
सेवाक्रमांक २७३७३ []
सैन्यपथक राजपूत रेजिमेंट
लढाया व युद्धे

दुसरे महायुद्ध

  • अरकान मोहीम १९४२ – १९४३
१९४७ चे भारत-पाकिस्तान युद्ध
पुरस्कार परमवीर चक्र

जदुनाथ हे १९४१ मध्ये ब्रिटिश भारतीय सैन्यात दाखल झाले. दुसऱ्या महायुद्धात बर्मामध्ये जपानी लोकांविरुद्ध लढले. नंतर त्यांनी भारतीय सैन्य दलातून १९४७ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भाग घेतला. ६ फेब्रुवारी १९४८ रोजी नौशहरच्या उत्तरेस ताईन धर येथे दाखवलेल्या साहसासाठी त्यांना परमवीर चक्र देण्यात आले. सिंग यांनी नऊ जणांच्या फॉरवर्ड सेक्शन पोस्टवर ड्युटी होती. पाकिस्तानी सैन्य त्यांच्या जागेवर फार मोठ्या संखेने हल्ला करायला आले येऊन ठेपले होते. नायक जदुनाथ सिंग यांच्याकडे कमी सैन्य असूनही त्यांनी पाकिस्तानी सैन्याचे तीन प्रयत्न हाणून पाडले. दुसऱ्या हल्ल्यात ते जखमी झाले होते. स्टेन गन हातात घेऊन त्यांनी पाकिस्तानी सैन्याला माघार घेण्यास भाग पाडले. हे करताना त्यांचा प्राण तिसऱ्या हल्लात गेला. शाहजहांपूरमधील क्रीडा स्टेडियम आणि कच्च्या तेलाचे टॅंकर सिंग यांच्या नावावरून ठेवले.

सुरुवातीचे आयुष्य

संपादन

नायक यदुनाथ सिंह यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९१६ रोजी उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूरच्या खजुरी गावात झाला. [] त्यांचे वडील बीरबलसिंग राठोड आणि आई जमुना कंवर होते. त्यांचे वडील शेतकरी होते. त्यांच्या पालकांना एकूण ७ अपत्ये होती, सात मुले व एक मुलगी. आठ मुलांमध्ये ते तिसरे होते. [][][]

यदुनाथ यांनी आपल्या गावातल्या स्थानिक शाळेत चौथी पर्यंतचे शिक्षण घेतले. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना पुढे शिक्षण सुरू ठेवता आले नाही. त्यांनी आपले बहुतेक बालपण शेताचे काम करून कुटुंबासाठी मदत करण्यात घालवले. करमणुकीसाठी त्यांनी कुस्ती शिकायला सुरुवात केली आणि ते त्यांच्या गावचे कुस्ती विजेते बनले. त्यांच्या चारित्र्यामुळे त्यांना "हनुमान भगत बाल ब्रह्मचारी" असे टोपणनाव देण्यात आले. हे नाव त्यांना अविवाहित असलेल्या हिंदू देवता हनुमान यावरून दिले होते. यदुनाथ यांनी कधीही लग्न केले नाही. []

सैनिकी कारकीर्द

संपादन

दुसऱ्या महायुद्धात सिंह हे २१ नोव्हेंबर १९४१ रोजी फतेहगड रेजिमेंटल सेंटर येथे ब्रिटिश भारतीय सैन्याच्या ७ व्या राजपूत रेजिमेंटमध्ये भरती झाले. प्रशिक्षण संपल्यानंतर सिंह यांना रेजिमेंटच्या पहिल्या बटालियनमध्ये दाखल केले गेले. इ.स. १९४२ च्या उत्तरार्धात ही बटालियन अराकान प्रांतात तैनात केली गेली.[a] येथे बर्मा मोहिमेदरम्यान त्यांनी जपानी लोकांशी लढा दिला होता. ही बटालियन ४७ व्या इंडियन इन्फंट्री ब्रिगेडचा एक भाग होती. १९४२ च्या उत्तरार्धात आणि १९४३ च्या सुरुवातीच्या काळात मेयू रेंजच्या भोवतालच्या हल्ल्यांमध्ये त्यांनी युद्ध केले आणि अक्यब बेटावर कब्जा करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून डूबबाईकच्या दिशेने मयु द्वीपकल्पावरून हल्ल चढविला. डिसेंबर १९४२ मध्ये राजपूतांना कोंडण नावाच्या खेड्यांभोवती रोखले होते, तरी पुढे हळू हळू डॉनबाईकच्या दिशेने त्यांनी कूच केले. तिथेच ब्रिगेडच्या हल्ले थांबवण्याचे ठिकाण होते आणि त्यानंतर फेब्रुवारी १९४३ मध्ये त्यांना ५५ व्या भारतीय पायदळ ब्रिगेडने मुक्त केले. एप्रिलच्या सुरुवातीच्या काळात जपानी लोकांनी पलटवार केला.

परमवीर चक्र

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ a b Chakravorty 1995, पाने. 56–57.
  2. ^ Rawat 2014, पान. 45.
  3. ^ a b Reddy 2007, पान. 24.
  4. ^ "Param Vir Chakra winners since 1950". Indiatimes News Network. 25 जानेवारी 2008. 18 ऑक्टोबर 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 सप्टेंबर 2016 रोजी पाहिलेThe Times of India द्वारे.


चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.