निःस्वार्थीपणा

सद्गुण
(नि:स्वार्थीपणा या पानावरून पुनर्निर्देशित)

परार्थ (pronounced: साचा:Pron-en) म्हणजे इतरांच्या कल्याणा बाबत निस्वार्थी भाव असणे. हा बऱ्याच संस्कृतींत पारंपारिक सद्गुण, आणि यहुदी,ख्रिस्ती. इस्लाम,हिंदू,जैन,बौद्ध,कन्फ्युशियास,शीख आणि बऱ्याच इतर धर्मांत गर्भित पैलू आहे. परार्थ हा स्वार्थाच्या विरुद्ध आहे.

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.



Giving alms to the poor is often considered an altruistic action in many cultures and religions.

निष्ठा आणि कर्तव्या पेक्षा परार्थ भिन्न आहे. परार्थ इतरांना मदत करण्याच्या किंवा चांगलेक्रिये मागील 'हेतुंवर' लक्ष केंद्रित करतो, तर कर्तव्य विशिष्ठ व्यक्ती (उ.दा.देव,राजा), विशिष्ठ संस्था (उ.दा.सरकार,राज्य) किंवा अमूर्त संकल्पनेप्रत (उ.दा. राष्ट्रभक्ती ई.) नैतिक बंधनावर लक्ष केंद्रित करते. काही व्यक्तींमध्ये परार्थ आणि कर्तव्य, दोन्हीपैकी एक किंवा दोन्हीची भावना असू शकते. शुद्ध परार्थ म्हणजे परतफेडीच्या संपूर्ण निरपेक्षेने देणे.

"परार्थ" ह्या संज्ञेचा संधर्भ तत्त्वाशी असू शकतो, ज्याप्रमाणे व्यक्तींवर इतरांचा भलं करण्याची नैतिक बांधिलकी असते.

परार्थाचा समज

संपादन

तात्त्विक आणि नैतिक विचारधारांमध्ये परार्थाला बराच इतिहास आहे, आणि अलीकडच्या काळात हा विषय जास्तंकरून मानसशास्त्रज्ञ (विशेषकरून उत्क्रांती विषयक मानसशास्त्राचे अभ्यासक), समाजशास्त्रज्ञ, उत्क्रांती विषयक जीवशास्त्रज्ञ, आणि प्राणी वर्तणूक शास्त्रज्ञ (ethologist) ह्यांचा विषय झाला आहे. जरी एका क्षेत्रातल्या परार्थाबद्दलच्या कल्पनांचा इतर क्षेत्रांत परिणाम होऊ शकतो, तरी विविध पद्धती आणि केंद्रीकरणे परार्थाप्रत विविध दृष्टीकोनांना जन्म देतात.

शास्त्रीय दृष्टीकोन

संपादन

वर्तनविषयक सिद्धांत

संपादन

प्राणीवर्तन शास्त्राच्या (ethology) (प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र), आणि सर्वसाधारण सामाजिक उत्क्रांती(social evolution)च्या अभ्यासात, परार्थ म्हणजे एखाद्या व्यक्तीचे असे वर्तन ज्यामुळे दुसऱ्या व्यक्ती किंवा व्यक्तींच्या (जगण्याच्या) पात्रतेत वाढ होईल पण कर्त्याच्या पात्रतेत घट होईल.[] प्राण्यांमधील अभिकथित परार्थी वर्तनाच्या अभ्यासाकांचा, समाजशास्त्रीय सामाजिक डार्विनवादी 'सगळ्यात चांगल्यांचे अस्थित्व' ह्या नवा खाली वापरलेल्या 'सगळ्यात योग्यतेचे अस्थित्वा'च्या संकल्पनांना विरोध आहे - इथे जीवशास्त्रीय डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताशी गोंधळ करू नये. प्राण्यांमध्ये अश्या परार्थी वर्तनाचा अग्रह रशियन प्राणीजीवशास्त्रज्ञ आणि अराज्यवादी पीटर क्रोपोत्कीन ह्यांच्या १९०२ सालच्या "Mutual Aid: A Factor of Evolution" ह्या पुस्तकात सर्वप्रथम प्रकाशित झाला.

जीवनाच्या उगमाच्या उत्र्कांतीच्या सिद्धांताशी सुसंगत सिद्धांत मांडण्याच्या गरजेपोटी दर्शनी-परार्थाच्या सिद्धांतांची वाढ होत गेली. Two related strands of research on altruism have emerged out of traditional evolutionary analyses, and from game theory respectively.

प्रस्तावित यंत्रणांपैकी मुख्य म्हणजे:

जानुकात्मक उत्क्रांतीच्या अभ्यासात वापरले जाणाऱ्या जॉर्ज आर. प्राईसच्या प्राईस समीकरणाच्या निर्मितीला परार्थाच्या अभ्यासातून प्रारंभी चालना मिळाली. ह्याचे मनोवेधक उदाहरण डायक्ट्योस्टेलीयमम्युकोरॉइड्स(Dictyostelium mucoroides) सारख्या पेशियुक्त स्लाईम मोल्ड(slime moulds) मध्ये सापडते. हे प्रोटिस्ट उपासमार होई पर्येंत व्यक्तिगत अमिबाच्या रूपात राहतात, ज्यानंतर ते एकत्र येऊन एक बहुपेशीय देह तयार करतात ज्यात काही पेशी, देहातल्या इतर पेशींच्या अस्थित्वासाठी बलिदान देतात. जीवाणूच्या विविध (पेशी,जनुकांसारख्या)अंगांमध्ये देवाणघेवाणी आणि, सामाजिक वर्तन आणि परार्थ, ह्याच्या बरीच साम्ये आहेत परंतु शेजाऱ्यांच्या गरजे शिवाय अमर्याद प्रजोत्पादनाची व्यक्तीची क्षमता ह्या दोन्हीत फरक दर्शवतो.

मज्जातंतूशास्त्र(Neurology)

संपादन

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ आणि लॅब-डी किंवा हॉस्पिटल नेटवर्क(जे.एम.) मधील मज्जातंतूशास्त्रज्ञ जॉर्ज मोल (Jorge Moll) आणि जॉर्डन ग्राफमन(Jordan Grafman), ह्यांनी कार्यात्मक चुंबकीय चित्रीकरणा(functional magnetic resonance imaging)द्वारे सामान्य स्वस्थ स्वयंसेवकांमध्ये परार्थी दानाची चैतनी आधारावर सर्वप्रथम साक्ष पुरवली. ऑक्टोबर २००६ च्या प्रोसिडिंग्स ऑफ नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेस युएसए [] मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या अभ्यासात त्यांनी दाखवले की, शुद्ध धनात्मक बक्षिसे आणि धर्मादाय देणग्यांनी मेसोलीम्बिक रिवॉर्ड पाथवे सक्रीय होतात, जे मेंदूतील प्रर्तामिक भाग आहे आणि जे खाद्य आणि लैंगिक गतीविधीतही सक्रीय होतात. तथापि स्वयंसेवक जेंव्हा, उदार मनाने धर्मदाय देणग्यादेऊन स्वतःच्या आधी इतरांच्या हिताला स्थान देतात, तेंव्हा मेंदूतील आणखी एक परिक्रम निवडकपणे सक्रीय होतो: ज्याला सबजेनुअल कॉर्टेक्स/सेप्टल प्रभाग असे म्हणतात. ह्या रचनांचा सामाजिक आपुलकी आणि नातेसंबंधांशी घनिष्ट नातं आहे. ह्या प्रयोगानुसार, परार्थ ही मुलभूत स्वार्थी इच्छांना दाबणारी वरिष्ठ नैतिक कार्यप्रवृत्ती नसून ती स्वतःच मेंदूतील मुलभूत, मूळजोडणीतली आणि सुखदायी प्रवृत्ति आहे.[]

जानुकात्मकता (Genetics)

संपादन

अमेरिकेतील न्यू मेक्सिकोतील सांता फे इन्स्टिट्यूट मधल्या सम्यूएल बॉवेल्सच्या अभ्यास, हा काहींच्या मते परार्थाचा गट निवडीचा नवनिर्मित नमुना आहे, ज्याला "सगळ्यात चांगल्याचे अस्थित्व" असे संबोधले जाते. बॉवेल्सनी तात्कालीन चरणाऱ्या गटांचे जनुकात्मक विश्लेषण केले, ज्यात ऑस्ट्रेलियाच्या आदिवासी, सैबेरियाच्या स्थानिक, इंन्युईट आणि आफ्रिकी जमातींचा समावेश होता. ३०एक व्यक्तींच्या शिकाऱ्यांचे समुह पूर्वी समजल्यागेल्या पेक्षा अधिक संबंधित असल्याचे आढळून आले. अश्या परिस्थितींत, मध्य आणि उच्च पेलीयोलीथिक (Paleolithic), समूहाच्या इतर सदस्यांप्रत परार्थ एकूण सामूहिक योग्यता सुधारत असणार. परंतु समावेशक योग्यतेचे रूप आहे - जनुकांचे एक वाहन सारखे जनुक असणाऱ्या दुसऱ्या वाहनास मदत करत असू शकते.

स्वतः मरणाची जोखीम पत्करून किंवा प्रजोत्पादनाची योग्यता धोक्यात घालून, जर एखादी व्यक्ती समूहाचे संरक्षण करत असेल, तर जे जनुक त्या व्यक्ती आणि संरक्षित व्यक्तींमध्ये(समूहाच्र सदस्य) समान असतील त्यांची वारंवारता वाढेल (त्यांच्या प्रजोत्पादनाच्या संरक्षणामुळे). अशी मदतकार्यांना जर अन्न किंवा लैंगिक परवानगीचे किंवा इतर लाभांचे बक्षीस मिळाले तर परार्थाचा सरासरी "खर्च" नाहीसा होऊ शकतो. बॉवेल्सनी जनुकात्मक, वातावरणणात्मक, पुरातत्त्वीय, वांशभौगोलिक आणि प्रायोगिक माहिती गोळा करून, प्राचीन मानवी सहकार्याच्या जमा-खर्चाची तपासणी केली. त्याच्या नमुन्यात, परार्थास कारणीभूत जनुक असलेल्या व्यक्ती तेंव्हा परार्थ निवडतात जेंव्हा - स्वतःच्या प्रजोत्पादनाच्या संध्या मर्यादित - करण्याच्या खर्चाचा अन्न आणि माहितीच्या लाभाच्या स्वरूपात परतफेड होते. जर त्यांच्या कृतीने समूहाची सरासरी (अस्थित्वाच्या) योग्यतेत सुधार होत असेल, आणि जोवर समूहाचे सदस्य समूहांतर्गत नाती टिकवतात किंवा वाढवतात (समूहांतर्गत मिलन) तोवर परार्थाची वाढ होते. अश्या परार्थी मानवांचे गट मग केवळ स्वसंरक्षणाकरता नाही तर इतर संसाधने मिळवण्यासाठी आक्रमक कृत्येही करू शकतात.[]

संकेत सिद्धांत आणि त्याच्याशी निगडीत अडथळ्याच्या तत्त्वाचे जनक अमोत्झ झाहावी(Amotz Zahavi) ह्यांनी अरेबियन बॅबलर(Arabian Babbler) नामक आश्चर्यजनक (अभिकथित) परार्थी वर्तनाकरता प्रसिद्ध असलेल्या पक्ष्याच्या निरीक्षणावरून, उत्क्रांती विषयक जीवशास्त्रात परार्थाचे सिद्धांत मांडले.

धार्मिक दृष्टीकोण

संपादन

जगातील जवळ जवळ सगळे धर्म परार्थ हे अतिशय महत्त्वाचे नैतिक मूल्य असण्यावर भर देतात. यहुदी,हिंदू,इस्लाम,ख्रिस्ती,बौद्ध आणि सिख ई. धर्म परार्थी नैतिकतेवर विशेष भर देतात.

ख्रिस्ती

संपादन

येशूच्या शिकवणींमध्ये परार्थाला प्रमुख महत्त्व आहे, विशेष करून सर्मन ऑन दी माउंट(Sermon on the Mount) आणि सर्मन ऑन दी प्लेन(Sermon on the Plain) ह्या दैववाणींत(gospel). बायबली ते मध्ययुगीन ख्रिस्ती परंपरा पाहता, स्वहित आणि इतरांचे हित ह्या मधील ताण-तणावांबाबत "निरपेक्ष प्रेम" ह्या मथळ्या खाली वादविवाद आढळून येतो, जसे पॉलीन(Pauline) बोधवाक्य "प्रेम स्वहित बघत नाही"("love seeks not its own interests"). इनडॉक्ट्रीनेशन ऍन्ड सेल्फ-डिसेप्शन नामक पुस्तकात रॉड्रीक हेन्द्रीने, विश्वसनीय स्वहित आणि परार्थेच्या तोतया कर्त्यांमध्ये वैधर्म्य दाखवून, स्वतःच्या उत्पादक व्यक्तीकरणात इतरांच्या हिताच्या बिश्लेषणा वरून, आणि काहींप्रत प्रेमा विरुद्ध अनेकांप्रत प्रेमात वैधर्म्य दाखवून अश्या तणावांवर प्रकाश टाकला आहे. जे प्रेम इतरांचे स्वातंत्र्य कायम करते, गुप्तं नितींना आणि मुखवट्यांना टाळते, त्याच्या अस्थित्वाची खातरजमा अखेरीस केवळ इतरांच्या घोषणेनेच होत नाही तर, प्रत्येक व्यक्तीच्या अंतरानुभवातून निश्चित होतो. जसे व्यावसाईक कलांसारखे, प्रेमाचा अर्थ आणि अस्थित्व केवळ शब्द आणि विचारांत मर्यादित न राहून, कृतींत दिसून येतो.

जरी येशूच्या शिकवणींमध्ये परार्थाला प्रमुख स्थान असल्या बद्दल शंका नसली तरी, ख्रिस्तं धर्माचा एक महत्त्वाचा आणि प्रभावी मुद्दा ह्याला अपवाद दर्शवतो. संत थॉमस ऍकिना सुमा थियोलॉजिकल मध्ये म्हणतो की आपण शेजाऱ्यापेक्षा स्वतःवर जास्तं प्रेम करावे. त्याच्या मते पौलीनचा अर्थ असा आहे की आपण खाजगी चांगुलपणापेक्षा सामाईक चांगुलपणचा शोध घेतला पाहिजे कारण सामाईक चांगुलपणा वैयक्तिक हिताचे ठरते. लेटेविकस १९ आणि मॅथिव २२ मधल्या 'तुम्ही तुमच्या शेजाऱ्यावर स्वतः प्रमाणे प्रेम केले पाहिजे'चा अर्थ संत थॉमस स्वतः बद्दलचे प्रेम हे इतरांवरच्या प्रेमाचे आदर्श उदाहरण असल्याचा अर्थ लावतात. मात्र त्यांच्या मते, आपण देवावर स्वतः आणि शेजाऱ्यांपेक्षा जास्तं प्रेम केलं पाहिजे, कारण तेच आपल्या शारीरिक आयुष्यापेक्षा पूर्णत्व आहे, कारण शेजाऱ्यावर प्रेम करण्याच्या मागचे अंतिम ध्येयं ते शाश्वत सौंदर्य वाटून घेणे आहे जे ह्या ऐहिक विश्वाच्या पलीकडले आहे.कॉम्टे बहुदा ह्याच, कॅथोलिक धर्मात मुख्यप्रवाहात असलेल्या थॉमसी धर्मतत्त्वाचा, विरोध करत होता जेंव्हा त्याने परार्थाला इंग्रजीत "Altruism" ही संज्ञ तयार केली.

थॉमस जे उर्डने आपल्या बऱ्याच पुस्तकात परार्थ हे एकमेव प्रेमाचे रूप असल्याचे म्हणले आहे. आणि परार्थी कृती नेहेमीच प्रेमळ असेल असं नाही. उर्डच्यानुसार परार्थ इतरांच्या हितासाठीची क्रिया होय, आणि स्त्रीमुक्तीवाद्यांशी सहमत आहे ज्यांच्या मते कधीकधी प्रेमासाठी स्वहितासाठी कृती करावी लागते जेंव्हा इतरांच्या अपेक्षा एकूण कल्याणाच्या विपरीत असते.

शीख (Sikhism)

संपादन

परार्थ हे शीख धर्मातील आवश्यक अंग आहे. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात, गुरू गोबिंद सिंह जी(शीख धर्मातील १०वे गुरू), मोगलशासाकांशी विविध धर्मांतील लोकांच्या संरक्षणार्थ लढत होते जेंव्हा, एक शीख भाई कन्हैया, शत्रूच्या जमावात हजर होता. तो युद्ध भूमीवर जखमी झालेल्या दोन्ही, मित्र आणि शत्रूंना, पाणी देत होता. शत्रूपक्षांतल्या काही जणांनी लढाई पुन्हा सुरू केली, आणि काही शीख योद्ध्यांना भाई कन्हैयाचा राग आला कारण तो शत्रूलाही मदत करत होता. त्यांनी भाई कन्हैयाला गुरू गोबिंद सिंहजींच्या समोर आणले आणि त्याच्या कृत्याने आपल्या लढ्यात बाधा होत असल्याची तक्रार केली. "तू काय करत होतास? आणि का?" असे गुरूंनी विचारले. भाई कन्हैया ने उत्तर दिले, "मी जखमींना पाणी देत होतो कारण मला त्या सगळ्यांत तुम्ही दिसत होता". ह्यावर गुरू म्हणाले "मग तू त्यांच्या जखमांची मलमपट्टीही करायला हवी होतीस. गुरूच्या घरातली शिकवणच तू आचरणात आणत होतास".

गुरूंच्या मार्गदर्शनात भाई कन्हैयानी परार्थी स्वयंसेवकांच्या संस्थेच स्थापन केलं. ही संस्था आजतागायत इतरांच्या कल्याणाचं आणि नवीन स्वयंसेवकांना ह्याची शिकवण देण्याचं काम करते.[]

काब्बालः (Kabbalah)

संपादन

काब्बालः मध्ये परार्थ म्हणजे उत्पतीचे मुख्य ध्येय आहे. काब्बाली रावअब्राहम कूक ह्यांनी म्हणले आहे की प्रेम हा मानवाचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे.[१०] त्याला बेस्टोवल, किंवा दान म्हणतात, जो परार्थाचा मुख्य हेतु आहे. ह्याचा अर्थ संपूर्ण मानवतेप्रत परार्थ ज्यातून श्रुष्टीच्या निर्मात्याप्रतदेवाप्रत परार्थ असा होऊ शकतो. काब्बालः मध्ये देण्याच्या शक्तीचे अस्थित्व म्हणजेच देव होय. राबाय मोशे चैम लुझ्झाटो ह्यांनी 'निर्मितीच्या हेतूवर', आणि देव ह्या श्रुष्टीला ह्या उच्च शक्तीचा समावेश करून कसे आदर्श करत असल्यावर भर दिला.[११]

आधुनिक काब्बालःचे निर्माते राबाय येहुदा ऍशलॅग, त्यांच्या भविष्यातील पिढ्यांबाबतच्या लिखाणांत, परार्थावर आधारित सामाजिक चौकट तयार करण्यावर भर देतात.[१२] अशी चौकट हीच निर्मितीचं हेतु असून, जे काही घडते ते परार्थाच्या आणि एकमेकांच्या प्रेमाच्या पातळीवर मानवतेला उंचावण्यासाठीच घडत असल्याचे ऍशलॅग ह्यांनी प्रस्तावित केले आहे. समाजाचा ईश्वराशी असलेला संबंध ह्यावर ऍशलॅग ह्यांचे केंद्रस्थान होते.[१३]

इस्लाम आणि सुफीपंथ

संपादन

सुफीपंथात, ई'थर (परार्थ)ची संकल्पना म्हणजे 'स्वतः पेक्षा इतरांना पसंती देणे'. सुफिंच्या मते ह्याचा अर्थ, स्वतःला पूर्ण विसरून इतरांसाठी स्वतः अर्पण करणे. उच्च कल्याणाकरत बलिदान देण्यात महत्त्व आहे; इस्लाम मध्ये ई'थरचे आचरण हे सर्वोच्च उदारातेचे पालन होय.[१४] हे युरोपीय बहाद्दुरी(चीवॅल्री) सारखे आहे, फक्तं इथे अस्थित्वात असलेल्या सगळ्या गोष्टींवर जास्तं भर आहे. अल्लाहच्या निरंतर भक्तीने इतर मनुष्य, प्राणी आणि जगातील इतर गोष्टींप्रत प्रेमवृत्ती निर्माण होते.[१५] राबिया अल्-अडविय्या सारख्या सुफी गुढवाद्यांचा ह्या संकल्पनांवर भर आहे, ज्यांनी अल्लाहला समर्पण आणि समाजाला समर्पण ह्यातल्या फरकावर लक्ष केंद्रित केलं. १३व्य शतकातील तुर्की सुगी कवी युनूस इम्रे ह्यांनी ह्या तत्त्वज्ञाचे स्पष्टीकरण "Yaradılanı severiz, Yaradandan ötürü" अर्थात "आम्ही निर्मात्यासाठी निर्मितीवर प्रेम करतो" असे केले आहे.

बौद्ध (Buddhism)

संपादन

बौद्ध धर्मात परार्थ मोठ्याप्रमाणात आढळतो. प्रेम आणि करुणा बौद्धांच्या सर्व प्रकारांत महत्त्वाचे घटक आहेत, आणि दोन्हीचा सर्व साजीवांवर समान भर आहे: सर्व सजीव सुखी असण्याची मनोकामना(प्रेम) आणि सर्व सजीव दुःखा पासून विरहित असण्याची मनोकामना(करुणा). "बरेच रोग केवळ प्रेम आणि करुणेच्या एका औषधाने बरे केले जाऊ शकतात. हे गुणधर्म मानवी सुखाचे अंतिम गुणधर्म आहेत, आणि त्यांची गरज हे आपल्या अस्थित्वाच्या गाभ्याशी निगडीत आहे"(दलाई लामा[१६]).

"सर्व सजीवां"मध्ये सर्व व्यक्ती येत असल्याने, प्रेम आणि करुणा हे स्व विरुद्ध इतर विरोधाच्या पलीकडे आहे. असही म्हणले आहे की स्वतः आणि इतर असा भेदच अपल्या दुखाचे मूळ कारण आहे. परंतु व्यावहारिक दृष्ट्या, आपल्यात उपजत स्वकेंद्रित वृत्ती असल्याने, बौद्ध धर्मात इतरांवरील प्रेम आणि करुणेला उत्तेजन देतो, ज्याला "परार्थ" म्हणता येईल. बौद्ध धर्म म्हणजे इतरांप्रत दया ह्या दलाई लामांच्या म्हणण्याशी बहुतेकजण सहमत होतील.

तरी, अश्या दृष्टीकोनानी परार्थाचा मूळ समजात बदल केला आहे, कारण ह्या मागील विचार असा आहे की अश्या वर्तनाने स्वतःच्या सुखात वाढ होते: "आपण इतरांच्या सुखाचा जितकी जास्तं काळजी घेऊ, तितके आपले कल्याण होते".(दलाई लामा[१६]).

नैतिक वर्तन आणि निवड्यांच्या उच्च तात्त्विक संवादांत मात्र, बौद्ध धर्मात अशी श्रद्धा आहे की ऋणं(दुःखी) परिणाम हे शिक्षा किंवा नैतिक आधारावर केलेल्या सुधारांवर अवलंबून नसून कर्माच्या नियामांवरून ठरतात जो कारण आणि परिणामांचा नैसर्गिक नियम आहे. ह्या कारण आणि परिणामाचं एक साधं उदाहरण म्हणजे, मी ज्या गोष्टीश कारणीभूत असतो तीच मला अनुभवास येते: जर मी भोगनिर्मिती करत असेन तर, परिणामी मलाही ते भोगायला लागतील, जर मी आनंद निर्माण करत असेन तर परिणामी मला ही आनंद अनुभवास येईल.

बौद्ध धर्मात कर्म (पाली कम्म) हे vipāka म्हणजे "फल" किंवा "परिणाम" पेक्षा निश्चितपणे वेगळे आहे. कर्माचं वर्गीकरण कारणांच्या (पाली हेतू) कारण आणि परिणामांच्या साखळ्यांत होतं, ज्यात "ऐच्छिक कृत्यांच्या" (पाली संखर) आणि "कृत्ये" (पाली भाव) समावेश होतो. कोणतेही कृत्य "बी" पेरत असल्याचे समजले जाते ज्यातून योग्य परिस्थितींत योग्य परिणाम (पाली विपक) उगवू शकतो. चांगल्या किंवा वाईट परिणामाची बहुतेक कर्मे, कर्त्याला संसाराच्या चक्रात अडकवून ठेवतात, आणि काही इतर निवडक कर्मे कर्त्याला निर्वाण प्राप्त करून मुक्ती देतात.

बौद्ध धर्म कर्माचा संबंध त्यामागील हेतुंशी प्रत्येक्ष संबंध जोडतो. साधारणतः हेतु "चांगल्या" आणि "वाईटा"तील फरक ठरवतो, परंतु हेतु मध्ये अज्ञानाचा पैलूही समाविष्ट आहे; तद्नुसार चांगल्या हेतूनी प्रेरित कर्म देखिल अज्ञानी मनानी केल्यास "वाईट" ठरू शकते ज्यामुळे "कर्त्या"ला अप्रिय परिणाम अनुभवास मिळू शकतो.

बौद्ध धर्मात, कर्म केवळ सगळ्याचं कारणंच नाही. मौखिक परंपरेत, श्रुष्टीवर शासन करणाऱ्या कारण यंत्रणेचे प्राचीन ग्रंथांच्या शिकवणीत पाच गटात वर्गीकरण केले आहे, ज्यांना नियम धम्मं असे म्हणतात:[१७][१८]

  • कम्म नियम — कर्माचे परिणाम
  • ऋतू नियम — ऋतू आणि हवामानातील बदल
  • बीज नियम — अनुवंशिकतेचे नियम
  • चित्त नियम — मनाची इच्छाशक्ती
  • धम्मं नियम — आदर्श उत्पत्तीची नैसर्गिक वृत्ती

वेदांत

संपादन

वेदांतात बौद्ध,जैन आणि इतर हिंदू दृष्टीकोनांशी असहमती आहे, ज्यांत कर्म केवळ कारण आणि परिणामांचा नियम नसून, त्याउपर कर्मात इश्वरची मध्यस्ती होत असल्याचे ही मानले जाते.

अद्वैत् विद्वान स्वामी शिवानंद, ब्रम्ह सूत्राच्या संश्लेषणाच्या वेदिक ग्रंथात ह्याचाच पुनरुच्चार करतात. ब्राम्ह सुत्राच्या ३ऱ्या अध्यायात, शिवानंद म्हणतात की कर्म अचेतन आणि अल्पायुषी असते, ज्याचे अस्थित्व कृत्या बारोबरच संपते. त्यामुळे कर्म क्रियेची फळे कर्त्याच्या गुणवत्तेनुसार भविष्यात समर्पण करू शकत नाही. त्याहून पुढे, कर्म फल देणारे अपूर्व किंवा पुण्याची निर्मिती करू शकत नाही. अपूर्व अचेतन असल्याने ईश्वराच्या क्रिये शिवाय घडू शकत नाही. ते स्वतंत्रपणे फल किंवा भोग निर्मिती करू शकत नाही.[१९]

हे सुद्धा पहा

संपादन

लेखात प्रयूक्त संज्ञा

संपादन

शब्दाचा विशेष संदर्भ/अर्थ छटा

संपादन

संदर्भ

संपादन

नोंदी

संपादन
  1. ^ Bell, Graham. Selection: the mechanism of evolution. Oxford. pp. 367–368.
  2. ^ Dawkins, R (2006). The God Delusion. Bantam Press, London, UK. ISBN 0-593-05548-9
  3. ^ Brown, S.L. & Brown, R.M. (2006). Selective investment theory: Recasting the functional significance of close relationships. Archived 2009-03-25 at the Wayback Machine. Psychological Inquiry, 17, 1-29.
  4. ^ Zahavi, A. (1995). Altruism as a handicap - The limitations of kin selection and reciprocity. Avian Biol. 26: 1-3.
  5. ^ Herbert Gintis (2000). "Strong Reciprocity and Human Sociality". Journal of Theoretical Biology. 206 (2): 169–179. doi:10.1006/jtbi.2000.2111. Unknown parameter |month= ignored (सहाय्य)
  6. ^ Human fronto–mesolimbic networks guide decisions about charitable donation, PNAS 2006:103(42);15623-15628)
  7. ^ "If It Feels Good to Be Good, It Might Be Only Natural". May 2007.
  8. ^ Fisher, Richard (7 December 2006) "Why altruism paid off for our ancestors" (NewScientist.com news service) [१] (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  9. ^ The great gurus of the Sikhs, pg, 253. New Delhi.
  10. ^ Kook, Abraham Isaac. Abraham Isaac Kook: The lights of penitence, The moral principles, Lights of holiness, essays, letters, and poems. pp. 135–136.
  11. ^ Luzzatto, Moshe Ḥayyim. The way of God. pp. 37–38.
  12. ^ Ashlag, Yehuda. Building the Future Society. Thornhill, Canada. pp. 120–130.
  13. ^ Ashlag, Yehuda. Building the Future Society. Thornhill, Canada. pp. 175–180.
  14. ^ M. Key concepts in the practice of Sufism: emerald hills of the heart. Rutherford, N.J. pp. 10–11.
  15. ^ Neusner, Jacob Eds. Altruism in world religions. Washington, D.C. pp. 79–80.
  16. ^ a b "Speech by the Dalai Lama". 2009-10-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-21 रोजी पाहिले.
  17. ^ Caroline Augusta Foley Rhys Davids, Buddhism. Reprint by Read Books, 2007, [२].
  18. ^ Padmasiri De Silva, Environmental philosophy and ethics in Buddhism. Macmillan, 1998, page 41. [३].
  19. ^ Sivananda, Swami. Phaladhikaranam, Topic 8, Sutras 38-41.

बाह्य दुवे

संपादन

साचा:Wiktionary

साचा:Defence mechanisms साचा:Philosophy topics साचा:Charity