डॅन्यूब नदी
(डॅन्युब नदी या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
डॅन्यूब ही मध्य युरोपामधील एक प्रमुख व वोल्गाखालोखाल युरोप खंडामधील लांबीने दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. ही नदी जर्मनी देशामधील बाडेन-व्युर्टेंमबर्ग राज्यातील काळ्या जंगलाच्या डोनाउसिंगेन या गावाजवळ उगम पावते. जर्मनी, ऑस्ट्रिया, स्लोव्हाकिया, हंगेरी, क्रोएशिया, सर्बिया, रोमेनिया, बल्गेरिया, मोल्दोवा व युक्रेन ह्या दहा देशांमधून वाहणारी २,८६० किमी लांबीची ही नदी त्रिभुज प्रदेशामध्ये काळ्या समुद्राला मिळते.
डॅन्यूब नदी | |
---|---|
रोमेनिया-सर्बिया सीमेवरील डॅन्यूबचे पात्र | |
इतर नावे | Donau, Dunaj, Dunărea, Donava, Duna, Dunav, Дунав, Tuna |
उगम | श्वार्झवाल्ड |
मुख | डॅन्यूबचा त्रिभुज प्रदेश, काळा समुद्र |
पाणलोट क्षेत्रामधील देश | जर्मनी, ऑस्ट्रिया, स्लोव्हाकिया, हंगेरी, क्रोएशिया, सर्बिया, रोमेनिया, बल्गेरिया, मोल्दोव्हा व युक्रेन |
लांबी | २,८६० किमी (१,७८० मैल) |
उगम स्थान उंची | १,०७८ मी (३,५३७ फूट) |
सरासरी प्रवाह | ६,५०० घन मी/से (२,३०,००० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | ८,१७,००० |
उपनद्या | ब्रिगाख, ब्रेग |
मोठी शहरे
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- एन्कार्टावरील नकाशा( Archived 2010-03-03 at the Wayback Machine. 2009-10-31)
- पाणलोट क्षेत्राचा नकाशा