रेगन्सबुर्ग (जर्मन: Regensburg) हे जर्मनीच्या बायर्न राज्यामधील एक शहर आहे. रेगन्सबुर्ग जर्मनीच्या आग्नेय भागात व बायर्नच्या पूर्व भागात डॅन्यूब नदीच्या काठावर वसले आहे. सुमारे १.४ लाख लोकसंख्या असलेले रेगन्सबुर्ग म्युनिक, न्युर्नबर्गआउग्सबुर्ग खालोखाल बायर्न राज्यातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

रेगन्सबुर्ग
Regensburg (जर्मन)
जर्मनीमधील शहर


चिन्ह
रेगन्सबुर्ग is located in जर्मनी
रेगन्सबुर्ग
रेगन्सबुर्ग
रेगन्सबुर्गचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 49°1′N 12°5′E / 49.017°N 12.083°E / 49.017; 12.083

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य बायर्न
क्षेत्रफळ ८०.७६ चौ. किमी (३१.१८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ९९१ फूट (३०२ मी)
लोकसंख्या  (३१ डिसेंबर २०१३)
  - शहर १,४०,२७६
  - घनता १,७०० /चौ. किमी (४,४०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
www.regensburg.com

११३५ ते ११४६ दरम्यान रेगन्सबुर्गमध्ये डॅन्यूब नदीवर एक दगडी पूल बांधण्यात आला ज्यामुळे उत्तर युरोपव्हेनिसदरम्यान व्यापाराला चालना मिळाली व रेगन्सबुर्गचे महत्त्व वाढले. मध्य युगातील पवित्र रोमन साम्राज्यकाळात रेगन्सबुर्ग हे एक स्वायत्त शहर होते. १५४२ साली रेगन्सबुर्गने प्रोटेस्टंट सुधारणांचा अंगिकार केला. इ.स. १८०३ साली रेगन्सबुर्गची स्वायत्तता संपुष्टात आली व १८१० साली ते बायर्नच्या राजतंत्रामध्ये सामावून घेण्यात आले.

२००६ साली रेगन्सबुर्गला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीमध्ये स्थान देण्यात आले.

संदर्भ संपादन करा

हे सुद्धा पहा संपादन करा

बाह्य दुवे संपादन करा

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: