चारी तर्फे जामशेत
चारी तर्फे जामशेत हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.
?चारी तर्फे जामशेत महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | ०.२७४ चौ. किमी |
जवळचे शहर | डहाणू |
जिल्हा | पालघर जिल्हा |
लोकसंख्या • घनता |
४६४ (२०११) • १,६९३/किमी२ |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | वारली |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४०१६०२ • +०२५२८ • एमएच/४८ /०४ |
भौगोलिक स्थान
संपादनडहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ७३ ने हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ३१ किमी अंतरावर आहे.
हवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
संपादनहे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १२५ कुटुंबे राहतात. एकूण ४६४ लोकसंख्येपैकी २३० पुरुष तर २३४ महिला आहेत. गावाची साक्षरता ३८.२४ टक्के आहे.पुरुष साक्षरता ४६.४९ आहे तर स्त्री साक्षरता ३०.६९ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ७७ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १६.५९ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर,कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते.येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत.
नागरी सुविधा
संपादनगावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात.
जवळपासची गावे
संपादननिंबापूर, फणसवाडी, शेणसरी, बापुगाव, पावण, धरमपूर, मणिपूर, देवगाव, सोमनाथ, गणेशबाग, दहीगाव ही जवळपासची गावे आहेत.डाह्याळे समूह ग्रामपंचायतीमध्ये चारी तर्फे जामशेत,डाह्याळे, पावण ही गावे येतात.
संदर्भ
संपादन१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036