शेवळे
शेवळे अथवा शेवळा (शास्त्रीय नाव: ॲमोरपोफॅलस कम्युट्यॅटस, इंग्रजी नाव:एलिफंट फूट याम, ड्रॅगन स्टॉक याम) ही एक रानभाजी आहे.
याला जंगली सुरण, रान सुरण किंवा अरण्य सुरण असेही म्हणतात.
भारतात ही वनस्पती महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, गोवा, गुजरात या राज्यात आढळते.
शेवळाच्या कंदापासून तसेच पानांपासून भाजी करतात.