शेवगा

मॉरिंगा प्रजातीची वनस्पती

शेवगा (शास्त्रीय नाव: Moringa oleifera, मॉरिंगा ऑलिफेरा ; इंग्लिश: Drumstick, ड्रमस्टिक ;) ही मॉरिंगेशिए कुळातल्या मॉरिंगा प्रजातीतील सर्वाधिक आढळणाऱ्या जातीची वनस्पती असून उष्ण कटिबंधीयसमशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणारा हा वृक्ष १० मी. उंचीपर्यंत वाढतो. याच्या फुले, पाने तसेच शेंगांचा पाककृती बनवण्यासाठी वापर होतो.याला विदर्भातील झाडीप्रांतात मुंगना असं म्हणतात.

शेवग्याच्या शेंगा

वनस्पतीची रचना

संपादन
 
शेवग्याच्या झाडाला आलेला फुलोरा व पाने

उपयोग

संपादन

वाळलेल्या शेवग्याच्या बियांचे चूर्ण पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरले जाते.[] तसेच शेवग्याच्या बियांपासून निघणारे तेल, म्हणजे बेन ऑइल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंत तसेच घड्याळात वंगण म्हणून वापरतात. या तेलाचा उपयोग अत्तरात करतात.

शेवग्याच्या पानांमध्ये ब जीवनसत्त्व हे तत्त्व विपुल प्रमाणात असते. त्यामुळे 'तोंड येणे' या आजारात शेवग्याच्या पानांचे आहारातून सेवन लाभदायक आहे.[ संदर्भ हवा ] शेवग्याची मुळे जंतनाशक असतात.[ संदर्भ हवा ] शेवगाची पाने आरोग्य वर्धक आहेत.

चित्रदालन

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  1. ^ "शेवगा बियांच्या साह्याने पाणी शुद्धीकरण झाले सोपे". विकासपीडिया. ४ ऑगस्ट २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६ सप्टेंबर २०२३ रोजी पाहिले.